Site icon InMarathi

RRR च्या आधी साऊथचा तडका असलेले राजामौलींचे हे ९ सिनेमे नक्की बघा!

rajamouli featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली ३ वर्षे बनवला जात असणारा राजामौली यांचा most awaited चित्रपट RRR प्रदर्शित होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. ना केवळ दक्षिणेकडे पण संपूर्ण जगभरात या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

बाहुबली या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांची राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून RRR चे पोस्टर पाहता ही उत्सुकता तसेच अपेक्षा रास्त आहे असे लक्षात येते.

 

 

राजामौली हे नेहमीच त्यांच्या दैदीप्यमान आणि भन्नाट कल्पनाशक्ती, उत्तम पटकथा, काळजाला हात घालणारे ऍक्शन सीन्स आणि कायम स्वरूपी प्रभाव टाकणाऱ्या पात्रांसह चित्रपट साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वत:च्या कथानकामध्ये प्रेक्षकांना मानसिकरीत्या गुंतवून ठेवण्याची ताकद असलेले एसएस राजामौलीं हे भारतातील उत्कृष्ट कथाकारांपैकी एक आहेत. त्यांनी केलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींची व आपली ओळख करून देण्यासाठी केलेला हा शब्द प्रपंच:

१. स्टुडेंट नं.१ :

 

 

स्टुडेंट नं.१ ही अप्रतिम कलाकृती राजामौलीसाठी दिग्दर्शक म्हणून आणि नट म्हणून ज्युनियर एनटीआरसाठी उल्लेखनीय ठरली. यामध्ये ज्युनियर एनटीआर व गजला यांनी सुंदर अभिनय करून हाती आलेल्या कामाचे सोने केले.

२. सिंहाद्री :

 

 

राजामौली यांचे दिग्दर्शक म्हणून जन्माला घातलेले पहीले लेकरू स्टुडंट नंबर १ मध्ये चांगले यश मिळविल्यानंतर, त्यांनी प्रकाश कोवेलामुडी सोबत एक काल्पनिक चित्रपट दिग्दर्शित करण्याचे ठरविले परंतु बजेटची कमतरता आणि इतर कारणांमुळे, प्रकल्प रखडला आणि अखेरीस, एक-जुन्या चित्रपट दिग्दर्शकाने सिंहाद्रीसाठी ज्युनियर एनटीआरला नियुक्त केले.

२००३ मध्ये रिलीज झालेल्या, अॅक्शन-ड्रामाने तेलुगू सिनेमातील सर्वच्या सर्व रेकॉर्ड मागे टाकून तिकीट काउंटरवर अभूतपूर्व यश मिळवले.

भूमिका चावला आणि अंकिता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने राजामौली यांची व्यावसायिक चित्रपट निर्माते म्हणून विलक्षण चुणूक दाखवली. सिंहाद्रीने तेलुगू सिनेमात तारक आणि जक्कन्ना या दोघांचा मजबूत पाया घालून दिला.

३. एगा :

 

 

चित्रपटनिर्मिती मध्ये लागणार्‍या अनेक बाबींचा विचार करता राजामौली हे प्रशंसनीय तेव्हा झाले जेव्हा त्यांनी एगा या चित्रपटासाठी साठी एका सामान्य घरमाशीचा बदला घेणारा हीरो म्हणजे नायक बनवले.

समंथा आणि सुदीप यांच्या विश्वासार्ह कामगिरीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नायक बनलेल्या घरमाशी ने तर चित्रपटाला चार चाँद लावले.

या चित्रपटाने व्यावसायिक रिसेप्शन व्यतिरिक्त, व्हिज्युअल एक्स्ट्राव्हॅगान्झाने ‘सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स’ आणि ‘तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट’ या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार व समीक्षकांची प्रशंसा यांना जिंकून घेतले.

४. साई :

 

भावनिक आणि व्यावसायिक रीतीने प्रेक्षकांची वाढत चाललेली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजामाऊली यांनी ‘साई’ या चित्रपटामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि माफिया गट यांच्यातील वादाची पार्श्वभूमी रंगवण्यासाठी रग्बी हा दुर्लक्षित खेळ उचलला.

चित्रपट पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी, एक इराणी रग्बी प्रशिक्षक नियुक्त करून आणि सर्व कलाकारांना दोन महिने कठोर प्रशिक्षण दिले गेले. एमएम कीरावानीची उत्तुंग पार्श्वभूमी, सेंथिल कुमारचे आकर्षक कॅमेरा-वर्क, यांच्या सह ‘साई’ मधील रग्बीच्या खेळाने आनंदी मुली, घामाघूम शरीरे आणि रक्ताळलेल्या चेहऱ्यांसह एक ऍथलेटिक जादू तयार केली ज्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.

२००४ च्या या सुपरहिट चित्रपटात निथीन, जेनेलिया डिसूझा आणि प्रदीप रावत यांनी त्यांची भूमिका उत्तम प्रकारे सादर केली. आजपर्यंत रग्बीवर आधारित भारतात बनवलेला हा पहिला आणि एकमेव चित्रपट आहे.

५. मगधीरा :

 

 

काळजावर घाव घालणारे अॅक्शन,उत्तमोत्तम शैलीत सादर केलेले संवाद, आणि पुनर्जन्म थीम यांमुळे, ‘मगधीरा’ ने सर्व विक्रम मोडीत काढत दक्षिण चित्रपटसृष्टीत नाव गाजवले आणि वर्षानुवर्षे वरच्या नंबरचा दर्जा प्राप्त केला.

मुख्य भूमिकेत असणारे राम चरण आणि काजल अग्रवाल, राजामौली दिग्दर्शित व नयन रम्य चित्रीकरणात दिवंगत अभिनेता श्रीहरी यांची ही एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

चरण (कालभैरव) १०० योद्ध्यांसह लढतो आणि त्याची राणी (काजल) पुन्हा सिंहासनावर बसवण्याच्या प्रयत्नात मरण पावतो या महादृश्याने थिएटरमध्ये संतापाची लाट निर्माण झाली.

पुनर्जन्मानंतरचा सिनेमा मात्र डोळ्यांची पारणे फेडतो. अन्यायावर न्यायाने केलेली मात कथानकामधे उत्कृष्टरित्या गुंफलेली दिसायला मिळते.

६. मर्यादा रमन्ना :

 

 

राजामौली यांचा उत्कट स्क्रिप्ट, मनाला पटवून देणाऱ्या भावना, मेहनती अभिनेते आणि नवनवीन तंत्रज्ञानावर विश्वास आहे. तेलुगू सिनेमातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणाऱ्या ‘मगधीरा’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, त्यांनी विनोदी अभिनेता सुनील यांची ‘मर्यादा रमन्ना’ ची नायक म्हणून घोषणा करून अविश्वसनीय निर्णय घेतला.

बस्टर कीटनच्या मूक-कॉमेडी ‘आवर हॉस्पिटॅलिटी’ याची प्रेरणा घेऊन तयार केलेल्या या चित्रपटाने दक्षिण राज्यांमध्ये पारंपरिक नसलेल्या कथानकाला आकर्षक पद्धतीने दाखवल्याबद्दल दिग्दर्शकाला पुर्ण अंकांनी पास करत विजयश्री मिळवून दिली .

‘मर्यादा रमन्ना’ हिंदी, तमिळ, मल्याळम आणि बंगाली सारख्या सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये पुनर्निर्मित करण्यात आला.

७. छत्रपति :

 

 

या चित्रपटाने एसएस राजामौली आणि प्रभास यांच्यातील नात्याचा पहिल्यांदा श्री गणेशा केला आणि दोघांनीही प्रेक्षकांना निराश केले नाही. या फूल ऑफ एक्शन – सिनेमाने बॉक्स-ऑफिसवर अमर्याद नाव कमावले आणि प्रभासला लोकांमध्ये मजबूत फॉलोअर्ससह उदयोन्मुख सुपरस्टार म्हणून उदयास आणले.

एका रागीट तरुण अवतारात, ४० वर्षांच्या वृद्धाने त्याच्या कच्च्या पण दमदार आणि बेफिकीर कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. १४ वर्षांनंतरही, छत्रपती ही फिल्म त्याच्या दमदार संवादांसाठी, तडफदार अ‍ॅक्शन सीक्वेन्स आणि उत्तेजक पार्श्वभूमी साठी स्मरणात ठेवली जाते.

८. विक्रमकुडू :

 

 

रवी तेजा आणि अनुष्का शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, ‘विक्रमकुडू’ हा सर्व सामान्यांनासाठी एक परिपूर्ण व्यावसायिक चित्रपट व वैचारिक खाद्य म्हणून उभा राहिला.

२००६ साली अॅक्शन, कॉमेडी, भावना, वीरता आणि एक जबरदस्त फ्लॅशबॅक भाग यासारख्या मिश्र घटकांसह या चित्रपटाने तिकीट काउंटरवर उत्कृष्ट यश संपादन केले. सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये या चित्रपटाची पुनर्निर्मिती करण्यात आली.

९. बाहुबली :

 

 

हा एक भारतीय महाकाव्य ऐतिहासिक चित्रपट आहे जो प्रभास राणा कृष्णन सत्यराज नस्सर आदिवी शेष तनिकेल्ला भरणी आणि सुदीप आदि कलाकारांनी साजरा केला आहे.

एक उत्तम कथा, अभिनंदनिय दिग्दर्शन उत्तम संगीत तगडा स्क्रीन प्ले आणि अद्भुत दृश्य इत्यादि दागिन्यांनी या चित्रपटाला अक्षरशः नटवले आहे. बाहुबली हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version