सदर लेखावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा असल्यास आमच्या फेसबुक पेज – facebook.com/InMarathi.page वर मेसेज करावा. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल.
===
हे भारिय राव.. मुळात याआधीही हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आंदोलन केलेलं ते देवस्थान समितीच्यावतीने, तेव्हाही त्यात घुसून आपला स्वार्थ साधून घेऊन त्यानी आंदोलनातील हवा काढून घेतली. तेच लोक आज श्रीपूजकांनी घागरा चोळीचा पेहराव महालक्ष्मीला केला म्हणून आकांडतांडव करत आहेत, वर श्रीपूजकाना मारहाण करून रेल्वेचे नाव बदलण्याचा पोरकटपणा करत आहेत.
अर्थात यांचा हेतू, उद्देश काही साफ नाही, हे सर्वांनाच माहीत आहे, तरीही यांच्या समर्थकांनी यातही आमचा हेतू जातीयवादाचा दिव्य शोध लावला, याबद्दल त्यांना नोबेल मिळायलाच हवे.
मुळात इथेही चूक श्रीपूजकांची आहेच, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अरेरावी करायला नकोच होती, शांतपणे म्हणणं मांडलं असत तरी विषय शांततेत संपून, या प्रकरणाचा मुद्दा करून, या वादाचे भांडवल करून राजकीय, आर्थिक स्वार्थ साधणाऱ्या लोकांना चाप बसवता आला असता.
थोडक्यात यात कोणतीही बाजू सरळ आणि साधी नाही, त्यामुळेच कोण्या एकाची बाजू घेणे योग्य ठरणार नाही. तरीही श्रीपूजक भंपक आहेत म्हणून थेट अंबाबाई की महालक्ष्मी वाद नव्याने उकरून काढून, थेट रेल्वेचे नाव बदलायला जाणे हा काय कमी भंपकपणा आहे? याचं तर्काने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आर्थिक घोटाळे करतात, याचा निषेध म्हणून सांगलीचे नाव बदलायला जाल.. हा बलिशपणा नव्हे काय?
हा बलिशपणा आहेच आहे, तरीही याचे समर्थन केले जातेय, म्हणजे हा प्रति जातीयवाद नव्हे काय? बाकी कोणतेही देवस्थान आणि देवस्थान कमिटी ही राजकारणमुक्त किंवा भ्रष्टाचारमुक्त नाहीच. सर्वच ठिकाणी या अपप्रवृत्तीचा शिरकाव झालेला आहे.
याला रोखायचे असेल तर पहिली गोष्ट देवस्थान कमिटी मध्ये अराजकीय लोकांचीच वर्णी लागायला हवी, दुसरी गोष्ट म्हणजे वंशपरंपरागत वगैरे फालतू गोष्टी बंद करून सरसकट वेदपाठशाळेत ज्याना धर्मिकतेत रस आहे, आयुष्यभर हे कर्म एक कर्तव्य म्हणून करायचे आहे अशाच लोकांना मग ते कोणत्याही जातीचे का असेनात? त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन पुजारी म्हणून नेमावे. यातून फायदे दोन, एक म्हणजे देवाच्या ठिकाणी, देवाच्या नावावर होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसेल तो बसेलच, दुसरी बाब म्हणजे देवस्थानातून धार्मिकतेचे आणि एक सुसंस्कृत, राष्ट्राला अनुकूल असे समाजजीवन निर्माण व्हावे हाही एक एक उद्देश आहे, तोही बऱ्याच प्रमाणात साधता येईल.
हे न करता ज्याना केवळ या मुद्द्याचे जातीय राजकारण किंवा अर्थकारण करायचे आहे, किंवा यांना समर्थन द्यायचे आहे त्यांना द्यायचं असेल तर देउद्यात, आम्हाला जातीयवादी ठरवायचं असेल तर जरूर ठरवू द्यात. काय फरक पडतो? त्यातून हाती काहीच लागणार नाही, हे आम्हाला समजतं, भरीव बदल करायला हवेतच, पण राजकारण, अर्थकारण बाजूला ठेऊन…बाकी सर्वच सुज्ञ आहेत..!
लेखक: योगेश देशपांडे
===
सदर लेखावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा असल्यास आमच्या फेसबुक पेज – facebook.com/MarathiPizza वर मेसेज करावा. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येईल.
—
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page