आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रत्येकाला आपले घर स्वच्छ व सुंदर हवे असते आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही परिश्रम घेत असतो. घर म्हटलं की घरातली प्रत्येक वस्तू आलीच. घराची स्वच्छता म्हटली की घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ हवाच परंतु बऱ्याच वेळा तुम्ही निरीक्षण केले असेल की आपल्या घरात असलेले पाण्याचे नळ स्वच्छ करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करूनही बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळांवर खाऱ्या पाण्याचे डाग तसेच राहतात.
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही साधे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही नळावरील खारट पाण्याचे डाग सहज काढू शकता. यामुळे तुमचे बाथरूम आणि स्वयंपाकघरातील नळ काचासारखे स्वच्छ दिसायला लागतील.
नळ गंजणे ही एक सामान्य बाब आहे आणि ते गंजण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या नळामध्ये येणारे क्षारयुक्त पाणी. तसेच लोखंडी वस्तूवर सतत पाणी राहिल्यास त्यावर गंज चढतो. चला तर जाणून घेऊया नळावर पडलेले खराब डाग काढून त्याला स्वच्छ करण्याचे साधे सोपे घरगुती उपाय.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
● लिंबू किंवा विनेगर.
नळावरील खारट पाण्याचे डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी नळावर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर स्प्रे करा आणि १५-२० मिनीट त्याला तसेच राहू द्या. यानंतर एखाद्या ब्रशच्या मदतीने ते घासून स्वच्छ करा. यानंतर एखादे स्वच्छ आणि कोरडे कापड घ्या आणि त्याने नळ पूर्णपणे पुसून टाका. लिंबू आणि व्हिनेगर एकत्र करूनही तुम्ही याचा वापर करू शकता.
यासाठी तुम्हाला लिंबू आणि व्हिनेगर समान प्रमाणात घ्यावे लागेल आणि हे मिश्रण नळावर सोडावे लागेल आणि नंतर ब्रश ने घासून, एखाद्या स्वच्छ कापडाने पुसावे लागेल. या उपायाने आपला नळ एकदम नवीन दिसेल.
● बेकिंग सोडा.
बेकिंग सोडा हा आम्लयुक्त असतो. यामुळे डाग आणि काजळी सहज निघून जातात. स्वयंपाकघरातील नळ स्वच्छ करण्यासाठी १ कप पाण्यात ३-४ चमचे बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. यानंतर संपूर्ण नळावर ही पेस्ट लावा. पेस्ट लावून झाल्यावर ४-५ मिनिटे ती पेस्ट तसेच राहू द्या. यानंतर एखाद्या स्क्रबरच्या मदतीने डाग नीट घासून घ्या. ही पेस्ट रात्रभर नळाला लावून ठेवल्यास सकाळी आपल्याला उत्तम परिणाम मिळतील.
● मीठ.
मीठ हे नळावरील डाग काढण्यासाठी सर्वांच्या घरात उपलब्ध असलेला सर्वात उत्तम पर्याय आहे. डाग असलेल्या ठिकाणी मीठ शिंपडा आणि त्याला ३-४ मिनिटे तसेच राहू द्या. परंतु डाग हर अधिकच चिवट असतील तर मग तुम्हाला किमान ४ तासासाठी मीठ शिंपडावे लागेल. यानंतर डाग घासण्यासाठी स्पंज किंवा स्क्रब पॅड वापरा. यानंतर नळ कोमट पाण्याने धुवून काढा. गरम पाणी आणि मिठाचे वापर केल्याने डाग हमखास निघतील.
–
- उन्हाळा आला, म्हणजे AC तर हवाच… नवा AC घेण्याआधी या गोष्टी माहित आहेत का?
- टॉयलेट मध्ये फोन कशासाठी नेताय, वाचा, या वाईट गोष्टींपासून वेळीच सावध व्हा
–
● गव्हाचे पीठ.
सर्व प्रथम, नळाला अशा प्रकारे कोरडा करा की त्यावर एक थेंब ही पाणी राहणार नाही. यानंतर नळावर पीठाने घासा व त्याला ५ मिनीट तसेच सोडून द्या. हे केल्याने नळावरील कोणतीही घाण, वंगण किंवा काजळी काढून टाकण्यास मदत होते. आता एखाद्या मऊ कापडाच्या मदतीने नळाला पीठ घासून टाका. या उपायाने देखील तुमचे नळ चमकण्यास मदत होईल.
● स्टेनलेस स्टील क्लीनर.
बाजारात उपलब्ध असलेल्या स्टेनलेस स्टीलच्या क्लिनरनेही तुम्ही स्वयंपाकघरातील नळ स्वच्छ करू शकता. यासाठी टॅपमध्ये क्लिनर फवारणी करा आणि ५ मिनिटांनंतर स्क्रब पॅडने स्वच्छ करा.
तर या आहेत काही पद्धती ज्याने आपण गंजलेला, खराब झालेला नळ स्वच्छ करु शकतो.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.