' कधी डोळे उघडे ठेऊन, तर कधी पोहताना झोपतात शार्क? वाचा, नेमकी भानगड काय – InMarathi

कधी डोळे उघडे ठेऊन, तर कधी पोहताना झोपतात शार्क? वाचा, नेमकी भानगड काय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शार्कचे नाव ऐकलं की, आपल्या डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे भयंकर आणि विशालकाय आकाराचा सागरी मासा, जो अतिशय धोकादायक मानला जातो.

व्हाईट शार्क, ब्लॅक शार्क, व्हेल शार्क, किलर शार्क, टायगर शार्क, ड्वार्फ लँटर्न शार्क, बुल शार्क, रिव्हर शार्क अशा एकूण ४६५ प्रजाती आहेत, परंतु यात सगळ्यात जास्त लोकप्रिय शार्क म्हणजे व्हाईट शार्क, टायगर शार्क, ब्लू शार्क, माको शार्क इ. आहेत.

 

sharks IM

 

शार्क हे साधारणपणे सर्व महासागर आणि सागरांमध्ये आढळतात. शार्क हे इतर मासोळ्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहेत. चला तर जाणून घेऊया शार्क बद्दल काही अनोखे तथ्य.

शार्क डोळे उघडे ठेवून झोपतो का?

अनेक शास्त्रज्ञांना अनेक दशकांपासून एका प्रश्नाने गोंधळात टाकले होते ते म्हणजे शार्क डोळे उघडे ठेवून झोपतात की बंद करून? शार्क इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे झोपत नाहीत हे शास्त्रज्ञांना आधीच माहीत होते, पण आता एका संशोधनाद्वारे त्यांना असे आढळून आले आहे की शार्क हे कधीकधी दोन्ही डोळे उघडे ठेवून झोपतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मेलबर्नमधीलला ट्रोब युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस आणि न्यूझीलंडच्या ऑकलंड युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्सेसच्या या दोन्ही संस्थेद्वारे सुरु असलेल्या संयुक्त अभ्यासात असे दिसून आले आहे की, शार्कच्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये आणि इतर सस्तन प्राण्यांच्या झोपण्याच्या पद्धतींमध्ये जमीन-आसमानचे फरक आहे.

 

sharks 2 IM

 

तसे तर शास्त्रज्ञांना आधीच माहित होते की शार्कच्या काही प्रजाती झोपतांना पोहतात ज्यामुळे त्यांच्या गिलांमधून(जलचरांची श्वसनप्रणाली) ऑक्सिजनयुक्त पाणी वाहते. अभ्यासादरम्यान, ईशान्य न्यूझीलंडमधील हौराकी खाडीतून सात शार्क मासोळ्यांना एकत्र करण्यात आले.

बाहेरील मत्स्यालयात ठेवल्यानंतर त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि रेकॉर्डिंग करण्यात आले. पोहताना आणि विश्रांती घेतांना शार्क माशांचे डोळे नेहमी उघडे असतात असे शास्त्रज्ञांनी आपले मत नोंदवले. यादरम्यान काही वेळा तर शार्कचे डोळे पांच मिनीटासाठी बंद व्हायचे, हे गाढ झोपेचे लक्षण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे.

झोपण्याच्या एकूण वेळेपैकी ३८% वेळ त्यांचे डोळे उघडेच राहायचे. वैज्ञानिकांनी नमूद केले आहे की झोपेच्या वेळी डोळे बंद करणे दिवसा अधिक सामान्य होते.

या अभ्यासात असे आढळून आले की कमी चयापचय दर आणि शरीराची सपाट स्थिती शार्कमध्ये झोप दर्शवते. मात्र डोळे बंद करून झोपणे हे शार्कसाठी वाईट लक्षण असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे याप्रकारचा अभ्यास यापूर्वी कधीही झालेला नाही. याचप्रकारे डॉलफिन, मगर, वटवाघुळ, पेंग्विन डोळे उघडे ठेवून झोपतात.

 

crocodile bat IM

शार्क बद्दल अजुनही काही रोचक तथ्य :-

● शार्क आणि मासे यांच्यातील एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे, शार्कचे सांगाडे हे माशांप्रमाणे हाडांचे नसून उपास्थि(Cartilage) आणि स्नायूंचे बनलेले असतात. यामुळे यांचे वजन हाडांपेक्षा खूपच कमी असते. हेच कारण आहे की शार्क खूप लवचिक असतात आणि या लवचिकतेमुळे त्यांना जास्त वेगाने पोहता येते.

● शार्कचा आकार ६ इंच ते ४६ फूट असू शकतो. वेगवेगळ्या प्रजातींच्या शार्कचे आकार वेगवेगळे असतात.जसे की सर्वात लहान शार्क ड्वार्फ लँटर्न शार्क आणि पिग्मी शार्क या आहेत, ज्यांचा आकार फक्त २० सेमी म्हणजेच ६ इंच आहे. तर सर्वात मोठा शार्क व्हेल शार्क आहे, ज्याचा आकार ४६ फूट आणि वजन २८ टनच्या जवळपास असतो. हे वजन अंदाजे ४ हत्तींच्या वजनाएवढे आहे.

● माणसाला संपूर्ण आयुष्यात फक्त दोनदाच नवीन दात फुटतात, पण शार्कच्या बाबतीत असे होत नाही. त्यांचे दात तुटत राहतात आणि नवीन दात येत राहतात. दांत तुटण्याची व नवीन दांत येण्याची ही प्रक्रिया आयुष्यभर चालत असते. शार्कला त्याच्या आयुष्यात सुमारे ३०,००० दात येतात.

 

sharks 3 IM 3

 

● शार्कची त्वचा खूप जाड असते. जेथे मानवी त्वचेची जाडी ०.५ मिमी ते ४ मिमी असते, तेथे शार्कच्या त्वचेची जाडी ७ इंचांपर्यंत असू शकते.

● शार्क त्यांची शिकार शोधण्यासाठी डोळ्यांचा नव्हे तर वासाचा वापर करतात. जर १ लिटर पाण्यात फक्त १ मिलीग्राम रक्त असेल तरी शार्क याचे वास घेवू शकतो. हेच कारण आहे की जखमी प्राणी अगदी सहजपणे शार्कचे बळी होतात. शार्कची दृष्टी स्वच्छ पाण्यात माणसांपेक्षा १० पटीने अधिक असते.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?