जेव्हा खुद्द शाहरुख क्षणाचाही विलंब न करता कश्मिरी कुटुंबाच्या मदतीला धावून आला..!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
निव्वळ ११ दिवसांत २०० करोडची कमाई करून ‘द कश्मिर फाईल्स’ने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. कोणतंही प्रमोशन नाही, कोणीही मोठा स्टार या सिनेमात नाही, तरी हा सिनेमा लोकांनी एवढा उचलून धरलाय की खुद्द बॉक्स ऑफिस स्टार अक्षय कुमारलासुद्धा याने धूळ चारली आहे.
सिनेमाविषयी बरीच मंतमतांतरं आपल्याला पाहायला मिळाली आहेत, त्याबद्दल बराच मोठा वादही सोशल मिडियावर रंगला आहे. फिल्म इंडस्ट्रीने या सिनेमाकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केलं हेदेखील आपण पाहिलं आहे.
खानावळीपैकी कुणीही याविषयी काहीच बोललं नाही, नुकतंच आमीर खानने सिनेमाचं कौतुक केलं आहे, पण तेदेखील देखल्या देवा दंडवत असंच आहे. मेनस्ट्रीम मीडिया आणि इंडस्ट्रीतल्या सगळ्याच लोकांनी या सिनेमावर भाष्य करणं टाळलं आहे. पण आता सोशल मीडियावर या विषयाला धरून शाहरुखची चर्चा होत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शाहरुख हा तसा गेली काही वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी सतत कसल्या ना कसल्या वादामुळे तो चर्चेत होता, आता मात्र तो एका चांगल्या गोष्टीसाठी चर्चेत आहे.
शाहरुखने एका कश्मिरी पंडित कुटुंबाला मदत केली होती आणि त्यासंदर्भातलं दिग्दर्शक अशोक पंडित यांचं एक जुनं ट्विट सध्या व्हायरल होत आहे. यामागची खरी गोष्ट काय तेच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!
ही घटना आहे २०१५ सालची आणि त्यावेळेस DNA च्या एका आर्टिकलमध्ये या घटनेचा उल्लेख केलेला आहे. १९९० मध्ये जेव्हा कश्मिरी हिंदूंचं पलायन झालं तेव्हा दीपक रैना हे त्यांच्या कुटुंबाला घेऊन दिल्लीत आले आणि इथेच स्थायिक झाले.
२०१५ मध्ये या कुटुंबाचा एक गंभीर अपघात झाला ज्यात दीपक यांच्या आईचा मृत्यू झाला, परंतु दीपक यांची पत्नी आणि २ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं!
कुटुंबातील एका सदस्याने माहिती दिल्याप्रमाणे दीपक यांची पत्नी कोमामध्ये होती आणि मुलीचा कंबरेखालचा भाग हा अधू झाला होता, उपचारासाठी लाखोंचा खर्च होता आणि या कुटुंबाला तो खर्च परवडणारा नव्हता.
दिग्दर्शक अशोक पंडित यांना जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्यांनी तातडीने मदतीसाठी शाहरुख खानकडे मागणी केली. त्यांच्या एका शब्दाखातर क्षणाचाही विलंब न करता शाहरुखने ३ लाखांचा चेक त्या कुटुंबाच्या उपचारासाठी पाठवला.
—
- ‘अल्लाह ओ अकबर’च्या घोषणा झाल्या आणि….’ काश्मीरमधला एक थरारक अनुभव
- सगळ्यांनी पाठ फिरवली, त्याचवेळेस बाळासाहेबांनी दिला विस्थापित काश्मिरी पंडितांना खंबीर आधार
—
शाहरुखच्या या कृत्याचे अशोक पंडित यांनी आभार मानले आणि तेच ट्विट सध्या व्हायरल होत आहे.
मदत ५ रुपयाची असो वा ५ करोडची, देण्याची दानत असली पाहिजे, शाहरुखस स्टार आहे म्हणून तो एवढी मदत करू शकतो हा तर्क लावणं अत्यंत चुकीचं आहे. कोणत्याही मदतीचं मोल पैशात कधीच तोलता येत नाही हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे.
सध्या काश्मिर फाईल्स चित्रपटामुळे अशाच अनेक काश्मिरी विस्थापितांच्या कहाण्या रोज आपल्या कानावर पडत आहेत. कशाप्रकारे इतकी वर्षं त्यांची कहाणी ऐकून घ्यायचा कुणी प्रयत्नदेखील केला नाही, कसे ते आपल्याच देशात कित्येक वर्षं निर्वासित म्हणून वागवले जात होते, हे या चित्रपटातून समोर आलं आहेच.
शाहरुखसारख्या अनेक लोकांनी स्टार्सनी अशी भरघोस मदत केली असेल जी आपल्यासमोर कधीच आली नाही, म्हणून सगळेच बॉलिवूड कलाकार निर्ढावलेले आहेत असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
सध्या काश्मिर फाईल्समधून मिळणारा पैसा काश्मिरी पंडितांसाठी वापरावा अशी मागणी जोर धरताना दिसत आहे, पण खरंच आता ३० वर्षांनी याचा काही फायदा होणार आहे का?
खरंतर आत्ता काश्मिरी पंडितांना कोणत्याही आर्थिक मदतीची नव्हे तर सहानूभूतीची गरज आहे, इतक्या वर्षांपासून त्यांच्या डोळ्यात साठलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याची गरज आहे, त्याच्या वेदना समजून घेण्याची सर्वात जास्त आवश्यक आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.