निर्बंधांमुळे तुटवडा निर्माण होईल या भीतीने रशियात कंडोमची विक्री १७०% ने वाढलीये!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध चालू होऊन आता जवळपास महिना उलटत आला आहे. गेल्या महिन्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धावरून त्यांच्याच देशात विरोध होत असल्याचे आता समोर येत आहे.
युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे रशियाला सर्व पाश्चिमात्य देशांकडून वेगवेगळ्या बाबतीत निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. रशियातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यामध्ये बॉश, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ऍपल या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व निर्बंधांमुळे कंडोमच्या मागणीवरही परिणाम झाला असून रशियामध्ये कंडोमची मागणी लक्षणीय वाढली आहे.
पाश्चात्य देशांच्या बंदीमुळे रशियात कंडोमच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. ड्युरेक्स आणि इतर ब्रँडचे कंडोम बनवणारी ब्रिटीश कंपनी रेकिटने रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू करूनही रशियामध्ये कंडोमची विक्री सुरू ठेवली आहे.
रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन रिटेलर वाइल्डबेरीजने कंडोमच्या किमतीत १७० टक्क्यांनी वाढ केली आहे. मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यांत कंडोमच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
रशियातील सर्वात मोठी फार्मसी चेन ३६.६ च्या कंडोमच्या विक्रीत २६ टक्के वाढ झाली आहे. रशियातील कंडोमच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण ३२ टक्के वाढ झाली आहे.
आरबीसीच्या अहवालानुसार सुपरमार्केटमध्ये कंडोमची विक्री ३० टक्क्यांनी वाढली आहे. प्रिजर्वेटीवयाना कंपनीच्या संचालिका येसेनिया शमोनिना म्हणतात की लोक भविष्यासाठी कंडोम खरेदी करत आहेत, आम्हाला याचे कारण माहित आहे आणि त्यानेच आम्हाला कंडोमच्या किमती वाढवण्यास भाग पाडले गेले.
—
- ४ दिवसांत युद्ध संपवणारा रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकला नाही, जाणून घ्या
- यूक्रेनकडे असलेली ‘ही’ गोष्ट येणाऱ्या काळात रशियाच्या विनाशाचं निमित्त ठरू शकेल!
—
वास्तविक रशियन चलन रुबलची किंमत पाश्चात्य देशांच्या चलनाच्या तुलनेत खूप कमी होत आहे.
रशियातील कंडोमच्या किमती वाढण्याचे गांभीर्य यावरून समजू शकते की पुतिन सरकारच्या उद्योग आणि व्यापार मंत्रिमंडळालाही या वृत्ताचे खंडन करावे लागले आणि ही समस्या फार काळ टिकणार नाही असे सांगावे लागले.
अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, कंडोमची कमतरता भासण्याची शक्यता नाही. थायलंड, भारत, दक्षिण कोरिया आणि चीन हे सर्वात मोठे कंडोम उत्पादक आहेत आणि या देशांनी रशियाला कंडोम निर्यात करणे थांबवलेले नाही.
रशिया दरवर्षी ६०० दशलक्ष कंडोम आयात करतो तर १०० दशलक्ष कंडोम तयार करतो. रेकिट कंपनीबद्दल बोलायचे झाले तर, रशियातील या कंपनीमध्ये सुमारे दीड हजार लोक काम करतात आणि दरवर्षी सुमारे ४०० दशलक्ष युरो कमावतात.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, परिस्थिती जसजशी पुढे जाईल, आम्ही त्यानुसार पावले उचलू, आम्ही आमच्या कर्मचार्यांच्या हितासाठी नेहमीच आवश्यक पावले उचलत आलो आहोत आणि पुढेही उचलू.
दुसरीकडे, सेक्सोलॉजिस्ट येवगेनी कलगावचुक यांनी रशियन नागरिकांना त्यांच्या मित्र देशांतील चांगल्या दर्जाचे कंडोम वापरण्याचे आवाहन केले आहे की रशियावर बंदी घालणाऱ्या पाश्चात्य देशांमध्ये बनवलेले कंडोम खरेदी करू नका.
व्यावसायिक तज्ञ पावेल स्पिचकोव्ह म्हणतात की रशियातील ९५ टक्के कंडोम कंपन्या परदेशी आहेत. रिकेट्स रशियामध्ये ६०% कंडोम पुरवतात. रिकेट्स रशिया सोडतील अशी शक्यता कमी असली, तरी तसे झाल्यास रशिया स्वतःच्याच देशात बनवलेल्या कंडोमला चालना देईल.
रशियन लोकांचा समज –
जसे लॉकडाऊन मध्ये अचानक सगळे बंद झाले तसे या युद्धात पाश्चात्य देश, नाटो आणि अमेरिकेने उडी मारल्यासही होऊ शकते, असा रशियन जनतेचा समज आहे. बऱ्याच लोकांनी घरात कंडोमची साठेबाजी करून ठेवली असल्याची शक्यता आहे.
जरी रशिया सर्वाधिक कंडोम आशियायी देशांकडून घेत असला तरी युरोपीय देशांत बनलेले कंडोम हे चांगल्या प्रतिचे असल्याचा समज रशियन जनतेचा आहे.
रशियन सरकारची भीती –
जर लॉक डाऊन सारखी जनता पुन्हा घरात कोंडली गेली तर लोकसंख्येचा विस्फोट होण्याची भीती रशियन सरकारला निश्चितच आहे.
युद्धाच रूपांतर महायुद्धात झाल्यास जनतेच्या अन्न पाण्याची सोय करणे देखील रशियन सरकारला अवघड जाणार आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.