प्रभू श्रीराम श्रेष्ठ की रामनाम? रामनामाचं महत्त्व सांगणारी पौराणिक कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भगवान श्रीराम यांचे परम भक्त श्रीहनुमान यांच्या बद्दल तर सगळ्यांचं ठाऊक आहे, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्याशी त्यांचेच परमभक्त श्रीहनुमान यांना युद्ध करावे लागले होते? चला तर जाणून घेऊया.
असे म्हटले जाते, की सुमेरु पर्वतावर एकदा संत सभेचे आयोजन झाले, कैवर्त देशाचे राजे सुकान्त या सभेमध्ये सर्व संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. वाटेत नारद मुनींची आणि त्यांची भेट झाली.
राजाने त्यांना नमस्कार केला व यात्रेचे कारण विचारले त्यावर संत सभेच्या आयोजनाबद्दल राजाने संगितले. संत दर्शनासाठी जाणे कधीही उत्तमच असे बोलून नारदमुनींनी राजाला मार्गक्रमण करण्याची आज्ञा दिली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ऋषी विश्वामित्रांचा अवमान
सुकान्त जसे जाण्यास निघाले तसे त्यांना आवाज देऊन मुनी म्हणाले, की सभेमध्ये सगळ्यांना नमस्कार करा, पण विश्वामित्रांना मात्र नमस्कार करू नका. कारण विचारल्यानंतर ‘ते आधी राजा होते, आता संत झाले आहेत आणि तू ही राजा आहेस’ असे उत्तर नारद यांनी दिले आणि सुकान्त वागले ही अगदी तसेच.
विश्वामित्र आणि श्री राम यांची भेट
संत सभा संपल्यावरती विश्वामित्र श्रीराम यांना भेटण्यास निघाले. संत सभेमध्ये माझा अपमान झाला असे सांगितल्यानंतर प्रभू श्री रामांनी त्यांना अपमान करणार्याचे नाव विचारले, नाव जाणून तू काय करणार असे विश्वामित्रांनी विचारल्यानंतर श्रीरामांनी ‘तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, की जे मस्तक तुमच्या समोर सभेमध्ये झुकले नाही ते धडा पासून वेगळे करीन, उद्या मी त्याचा वध करीन’ अशी प्रतिज्ञा केली.
सुकान्त पोहोचले नारदचरणी
जेव्हा राजा सुकान्त यांना श्री रामांच्या प्रतिज्ञेविषयी कळले तेव्हा जिवाच्या आकांताने त्यांनी नारदमुनी यांना शोधण्यास सुरुवात केली. मृत्यूच्या भयाने विलाप करत असलेल्या सुकान्ताला नारदांनी माता अंजनीस शरण जाण्यास सांगितले.
त्यांनी सुकान्ता कडून हे ही वचन घेतले, की अंजनी मातेला शरण जाण्याचा उपाय नारद मुनींनी सुचवला हे त्यांनी कोणाला सांगू नये.
माता अंजनी कडून मिळाले जीवनरक्षणचे वचन
दारी आलेल्या राजाच्या आकांतचे कारण जाणून घेण्यासाठी जेव्हा माता अंजनी गुफेच्या बाहेर आल्या, तेव्हा माझ्या प्रणाची रक्षा करा नाही तर विश्वामित्र माझे प्राण हरण करतील असे त्यांनी कथन केले.
दारी आलेल्या अतिथीचे कथन ऐकून माता अंजनी यांनी सुकान्तास प्राण रक्षणचे वचन दिले. ‘तुला काही ही होणार नाही’ असे त्याला वचन दिले.
—
- चौदा वर्षांच्या वनवासात प्रभू रामचंद्रांनी कुठे कुठे वास्तव्य केले, वाचा रंजक माहिती!
- रावणाबद्दलची माहिती सर्वच जाणून आहेत, पण पत्नी ‘मंदोदरी’ बद्दल किती माहिती आहे?
—
संध्यासमयी जेव्हा हनुमान आपल्या मातेचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांनी हनुमानास सर्व हकीकत सांगितली व राजा सुकान्त यांना बोलवण्याआधी हनुमानस शपथ घेण्यास संगितले. प्रभू श्रीरामचंद्रांची शपथ घेऊन सांगतो, की मी राजा सुकान्त याच्या प्राणांचे रक्षण करीन असे वचन हनुमान यांनी माता अंजनीस दिले.
राजाला भयाचे कारण विचारल्यानंतर प्रभू श्रीराम यांच्या पासून माझ्या जीवितास धोका आहे असे सुकान्ताने संगितले. हे ऐकून माता अंजनी आश्चर्य चकित झाली, पण आता हनुमान वचन देऊन बसले होते.
हनुमानाने सुकान्तास त्याच्या राजधानीत पोहोचवले, स्वतः श्रीरामांच्या दरबारात निघाले. तिथे पोहोचतच सुरू असलेली तयारी पाहून प्रभूस ‘कुठे निघालात असे विचारले, त्यावर राजा सुकान्त याचा वाढ करण्यासाठी निघालो आहे असे उत्तर मिळाले.
हनुमानाने विनम्रपणे असे करण्यास नकार दिला व विनंती केली की असे करू नये. त्यावर ‘मी माझ्या गुरु चरणी शपथ घेतली आहे, आता मागे फिरणे होणे नाही’ असे रामचंद्रांनी म्हणताच ‘मी त्याच्या प्राण रक्षणासाठी माझ्या इष्ट देवतेची म्हणजे आपली शपथ घेतली आहे असे हनुमान यांनी श्री रामास कळवले.’ तेव्हा श्री रामांनी ‘तू तुझे वचन पूर्ण कर, मी मात्र त्याला मारणारच ‘असे संगितले.
राजा सुकान्तला मारण्यासाठी प्रभू त्याला शोधू लागले, परंतु राजा मात्र पर्वतावर हनुमानासोबत राम नाम घेत बसला होता. पर्वतावर रामचंद्रांना बघून सुकान्त भीतीने थरथर कापू लागला.
श्रीराम त्याच्यावर बाण सोडू लागले, परंतु रामनामाच्या महिम्यामुळे सर्व बाण विफल होऊ लागले. हनुमान राम कार्यात अडथळा आणत आहेत असे वाटून बंधु लक्ष्मणाने हनुमानवर बाण चालवले, परंतु त्याने हनुमाना ऐवजी श्रीरामांची शुद्ध हरपली.
शुद्धीत आल्यावर त्यांनी हनुमानकडे धाव घेतली. हनुमानाची पीडा त्यांना असहणीय झाली. डोळे बंद करून ते कधी जखमेवर हात फिरवत तर कधी हनुमानाच्या डोक्यावर.
हे पाहून हनुमानाने सुकान्ताला मांडीवर बसवले आणि रामांनी सुकान्ताच्या डोक्यावर हात ठेवला. तेव्हा ‘ज्याच्या डोक्यावरती तुमचं हात आहे, त्याचे जीवन मरण तुमच्या हाती’ असे हनुमान म्हणाले.
‘ज्याला हनुमानाने मांडीवर बसवले, त्याच्या डोक्यावर मला हात ठेवावाच लागेल, परंतु गुरुदेवांना काय उत्तर देऊ’ असे राम म्हणाले. तेवढ्यात समोरून विश्वामित्र येताना दिसले, हनुमानाने राजा सुकान्ताला ‘तेव्हा नाही केला तरी आता नमस्कार करून ये असा सल्ला दिला.’ त्याप्रमाणे वागताच विश्वामित्र प्रसन्न झाले, व ‘मी यास क्षमा केली आहे, तू देखील याला प्राण दान दे’ असे विश्वामित्र रामास म्हणाले.
त्यांनी सुकान्तास ‘नमस्कार न करण्याचा सल्ला कुठल्या कुसंगती मध्ये मिळाला?‘ असा प्रश्न विचारताच नारदमुनी प्रकट झाले. त्यांनी सगळी घटना कथन केली, विश्वामित्रांनी असे वागण्याचे कारण विचारताच नारद म्हणाले, की ‘नेहमी लोक मला राम मोठे, की राम नाम मोठे असा प्रश्न विचारतात तेव्हा मी ही असा विचार केला, की अशी काहीतरी लीला घडवावी की लोकांना स्वतः च रामनामाचे महत्त्व समजेल.’
==
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.