आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
फ़िल्म इंडस्ट्री ही अशी जागा आहे जिथल्या नात्यांचे हिशोब वेगळे आहेत. इथे कोणी कोणाचा मित्रही नसतो आणि कोणी शत्रूही. या इंडस्ट्रीवर कायमच पुरुषी वर्चस्व राहिलं आहे.
—
—
अलिकडील काळात #Me TOO च्या निमित्तानं स्त्री कलाकारांवार होणार्या अन्यायाला किमान तोंड तरी फ़ुटलं. नाहीतर ‘चलता है’ उक्तीनं या इंडस्ट्रीत काहीही चालविण्याची आणि चालवेऊन घेण्याचीच पध्दत होती. अर्थात आताही परिस्थितीत फ़ार फ़रक पडला आहे असं नाहीच.
नेपोटिझम ते कास्टींच काऊच पासून अंमली पदार्थापर्यंत अनेक आरोपांसाठी इंडस्ट्री बदनाम आहेच. आज या चळवळीला मी टू असं नाव मिळालं असलं तरीही या अशा प्रकारच्या घटना खूप पूर्वीपासून घडत आलेल्या आहेत.
बलराज सहानी यांच्या आत्मचरित्रात असाच एका नामांकीत अभिनेत्रीच्या बाबतीत घडलेला एक मी टू किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा बलराज यांना नर्गिसचे बंधू अन्वर हुसैन यांनी बाजूबंदच्या चित्रीकरणादरम्यान सांगितला.
गप्पांच्या ओघात अन्वर यांनी एक असा किस्सा सांगितला ,की बलराज ऐकलेल्या गोष्टीवर विश्र्वास ठेवणं कठीण गेलं. हा किस्सा ज्या अभिनेत्रीच्याबाबतीत घडला तिचं नाव होत, मीना कुमारी. तमाम इंडस्ट्री जिला मीना आपा म्हणून लाडानं हाक मारायची त्या मीना आपांनादेखील मी टू सारख्या मानहानीकारक घटनेला सामोरं जावं लागलं होतं.
एक प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक मीना कुमारीला घेऊन चित्रपट बनवत होता. तो मीना कुमारीच्या सुरवातीच्या दिवसातला चित्रपट होता आणि दिग्दर्शकही नावाजलेला होता. जरी मीना नवखी असली तरीही ती स्वत:चा आब राखून होती. या दिग्दर्शकानं नेमकी नको ती चूक केली.
त्यानं जेवणाच्या टेबलवर मीना कुमारीच्या पावलावर आपलं पाऊल ठेवलं आणि दाबलं. चार लोकांतलं त्याचं हे धाडस बघून मीना संतापानं थरथरू लागली. तिनं त्या दिग्दर्शकाला खडे बोल सुनावत पाय बाजूला घ्यायला सांगितला आणि पुन्हा अशा प्रकारची गोष्ट खपवून घेणार नाही हे चार लोकांसमक्ष सुनावलं.
यामुळे दिग्दर्शक अर्थातच दुखावला गेला. मीना कुमारीचा उघडपणे बदला घेणं शक्य नव्हतं, मग त्यानं एक अशी गोष्ट केली जी नीचपणाचा कळस होती.
—
- आशा पारेखने स्पर्श केला आणि शत्रुघ्न सिन्हा ओरडले – “डेटॉल ला, डेटॉल!”
- गिनीज-बुक मध्ये नोंद झालेला हा बॉलीवूड सिनेमा बनवायला लागली तब्बल २३ वर्ष…
—
पुढे चित्रीकरण चालू झालं आणि या दिग्दर्शकानं एक प्रसंग असा घुसवला ज्यात नायक नायिकेला थोबाडीत मारतो. या सीनचे दिग्दर्शक रिटेकवर रिटेक घेऊ लागला. मीना कुमारीसामोर जो अभिनेता होता तो देखील त्या काळातला खूप लोकप्रिय अभिनेता होता.
त्याच्या लक्षात आलं, की दिग्दर्शक या सुमार सीनचे इतके रिटेक घेत आहे यामागे त्याचा हेतू चांगला नाही. मात्र पडद्यावर हिरोगिरी करणार्या या हिरोत एका नव्या पैशाची हिम्मत नव्हती, त्यामुळे त्यानं याला विरोध न करता मीना कुमारीला थोबाडीत मारणं चालू ठेवलं.
एक नाही दोन, दहा नाही तर तब्बल ३१ वेळा सीनचे रिटेक घेतल्यानंतर दिग्दर्शक शांत झाला आणि हा सीन ओके केला गेला. दुसर्या बाजूला मीना कुमारीलाही समजलं होतं, की दिग्दर्शकांच्या वाह्यात मागणीला होकार न दिल्याची ही किंमत आहे.
तिनंही तोंडातून ब्र न काढता प्रत्येक मार सहन केला. जेव्हा हा सीन ओके झाला आणि मेकअप रुममधे आली, तेव्हा मात्र तिचा बांध फ़ुटला आणि तिला रडू कोसळलं.
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.