Site icon InMarathi

‘हजार’चा संक्षिप्त उल्लेख करताना ‘K’ हे अक्षर का वापरतात…? जाणून घ्या…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण मराठी मध्ये १००० ला एक हजारच म्हणतो, पण इंग्रजीमध्ये मात्र हजारचा उच्चार जास्तकरून 1k असा केला जातो. आपण मराठी माणस देखील बऱ्याच वेळा बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या ओघात 2k, 5k, 10k असा उल्लेख करतो.

तर तुमच्याही मनात कधीना कधी हा प्रश्न आला असेलच की इंग्रजी मध्ये हजार म्हणजे Thousand म्हणजे ‘T’ हे अक्षर वापरायला हवे…

मग ‘K’ हे अक्षर वापरण्याचे कारण ते काय?

आज याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.

 


खरतरं K हे अक्षर आठ अक्षरी Thousand या शब्दाच्या बदल्यात वापरात आले. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे की हा बदल ग्रीक काळामध्ये घडला, म्हणजे अतिशय जुन्या काळात!

ग्रीकांच्या राज्यात हजाराला Thousand न म्हणता ‘chilioi’ म्हटले जायचे. Chilioi चा खरा अर्थ आहे- अनंत काळ, म्हणजेच पाहायला गेलं तर Chilioi चा शब्दश अर्थ ‘हजार’ असा होत नाही, पण त्या काळी ग्रीक हजार ही संख्या सर्वोच्च मानीत असतं, त्यामुळे त्यांनी अनंत काळा प्रमाणे अनंत संख्या या अनुषंगाने Chilioi हा शब्द Thousand साठी वापरण्यास सुरुवात केली.

 

 

कालांतराने हा Chilioi शब्द फ्रेंचांनी घेतला आणि त्याचे संक्षिप्त रूप ‘Kilo’ असे केले. फ्रेंचांनी पुढे मेट्रिक सिस्टम सुरु केल्यावर त्यांनी kilo (किलो) म्हणजे १००० अशी नवीन संकल्पना अमलात आणली. या Kilo चा फ्रेंच्यांच्या दृष्टीने अर्थ होता हजारामधील वाढ! उदा. 10k म्हणजे – 10*1000 = 10,000

 

व्यापाराच्या निमित्ताने जगभर पसरलेल्या फ्रेंच व्यापाऱ्यांमुळे ही संकल्पना हळूहळू सगळीकडे पसरत गेली. त्यानंतर किलोलीटर, किलोग्राम आणि किलोटन सारख्या संज्ञा अस्तित्वात आल्या. याच कारणामुळे हजारसाठी संक्षिप्त शब्द म्हणून Kilo मधील K हा शब्द वापरण्याची प्रथा सुरु झाली. आधुनिक युगाच्या अर्थशास्त्रामध्ये देखील K चा वापर असाच सुरु ठेवण्यात आला.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version