आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगण्यासाठीच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. आजच्या जगात या गरजा पूर्ण करायच्या तर त्यासाठी मूलभूतपणे कशाची गरज असेल, तर तो म्हणजे पैसा!
कुणी चार भिंतीच्या आत एसीत बसून, तर कुणी भर उन्हात मोलमजुरी करून रोजीरोटीसाठी पैसे कमावण्याचं काम करत असतो. हे काम करत असताना, नेहमी मिळतात त्याहून अधिक पैसे मिळावेत अशी अपेक्षा न ठेवणारा माणूस तर शोधूनही सापडणार नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
अगदी आपल्याला लॉटरी लागावी, अशी अपेक्षा सुद्धा कधी ना कधी प्रत्येकाने केलेली असते. इसाक मुंडा नावाच्या मजुराला अशीच एक लॉटरी लागली असं म्हणायला हवं. मजुरी करणारा हा माणूस चक्क लखपती झाला. ही लॉटरी लागली म्हणजे नेमकं काय, त्याची स्टोरी नेमकी काय आहे, ते जाणून घेऊया.
पोटातील आगडोंब या वाटेवर घेऊन आला…
भुकेमुळे पोटात पडणारा खड्डा, भुकेची जाणीव या गोष्टी माणसाला शांतपणे जगू देत नाहीत. इसाक मुंडा याची बाब काही फार वेगळी नव्हती. त्यालाही भुकेची ही जाणीव हैराण करून सोडायची.
या जाणिवेपासून दूर पाळण्यासाठी युट्युब व्हिडिओचा आधार त्याला मिळाला. मन दुसरीकडे गुंतवून ठेऊन भुकेल्या पोटाची फसवणूक तो करू लागला. मात्र हेच युट्युब पुढे त्याची भूक भागवण्याचं कारण ठरेल याची जाणीव त्यावेळी त्याला झाली नव्हती.
‘इसाक मुंडा इटिंग’ या त्याच्या युट्युब चॅनेलला आता तब्बल ७ लाखाहून अधिक स्बस्क्रायबर मिळाले आहेत. हा प्रवास त्याच्या नावाप्रमाणेच आगळावेगळा आहे असं म्हणायला हवं.
अशी झाली सुरुवात…
इसाकचं युट्युब चॅनेल २०२० च्या मार्च महिन्यापासून सुरु आहे. कुठलाही फार निराळा किंवा असाधारण विषय इसाक हाताळत नाही. अस्सल गावरान आणि गावाकडील पदार्थांचे व्हिडिओ बनवण्याचं काम तो करतो. मात्र लाखो लोकांना त्याचे हे व्हिडिओ पाहायला आवडतात. या चॅनेलच्या जोरावर त्याने पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी मोठ्या प्रमाणात मिळवल्या आहेत.
फिश करी, जंगली मशरूम, चिकन असे झणझणीत आणि चमचमीत पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ त्याच्या चॅनेलवर पाहायला मिळतात. ३०० हून अधिक व्हिडिओ आज त्याच्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत.
हिंदी आणि ओडिसामधील संबळपूरी या भाषांचा मिलाफ असलेलं त्याचं निवेदन या व्हिडिओजची रंगत वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
खरं तर त्याच्या या प्रवासाची सुरुवात एका सहज बघितलेल्या व्हिडिओमधून झाली आहे. भूक विसरण्यासाठी नेहमीप्रमाणे युट्युबचा आधार घेतलेला असताना, एका व्हिडिओमधून त्याला लक्षात आलं की या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवणं शक्य आहे.
—
- भारतातील १० करोडपती चहावाले, ज्यांनी या साध्या धंद्यातून कमावले ढिगाने पैसे!
- शेतकरी ते एअर इंडियाचे नवीन अध्यक्ष, एन. चंद्रशेखरन यांची प्रेरणादायी कथा
—
एका युट्युबर या माध्यमातून पैसा कमावला जाऊ शकतो हे सांगत आहे म्हणून त्याने अनेकदा हा व्हिडिओ पाहिला. यातूनच मग स्वतःसुद्धा अशीच एखादी सुरुवात करावी अशी प्रेरणा त्याला मिळाली.
गावातील छान रेसिपीजचे व्हिडिओ बनवण्याच्या बरोबरीनेच मासेमारीचे व्हिडिओ सुद्धा तो बनवत असतो. गावातल्या मुलांना गोळा करून झकास मासेमारी आणि पेटपूजा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस देऊन त्याचे व्हिडिओ बनवणं हेदेखील त्याचं महत्त्वाचं काम आहे.
आयुष्य बदलून गेलं
युट्युबवर प्रसिद्धी मिळाली आणि इसाकचं आयुष्य बदलून गेलं. २०२० च्या ऑगस्ट महिन्यात त्याने ५ लाखांची कमाई केली. यातून त्याने स्वतःच्या राहण्याचा प्रश्न सोडवला.
त्याची घरची आर्थिक स्थिती सुद्धा सुरळीत झाली. आर्थिक चाचणीतून बाहेर पडलेल्या इसाक मुंडाची स्थिती पुढे अधिकाधिक चांगली होत गेली. एक प्रसिद्ध आणि लोकांच्या आवडीचा युट्युबर म्हणून आता तो अधिक उत्तम आयुष्य जगत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.