Site icon InMarathi

अवघ्या ३ मिनिटांच्या मीटिंगमध्ये, कंपनीने झूम कॉलवर काढून टाकले ८०० लोकांना

ter im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खाजगी क्षेत्रात असणाऱ्या नोकरीत पैसा तर भरपूर आहे पण नोकरीची शाश्वती नाही. कधीकधी बॉस किंवा वरिष्ठांशी वाद घातल्यामुळे तर कधी कंपनी बुडाल्यामुळे, तर कधी इतर दुसऱ्या कारणामुळे या खाजगी क्षेत्रात नोकरी जाण्याची भिती असते. असेच काहीसे सध्या इंग्लडमधील एका कंपनीमध्ये घडले आहे, चला तर जाणून घेऊया नेमकं झाल तरी काय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही महिन्यांपूर्वी Better.com या कंपनीच्या सीईओ विशाल गर्गने एका झुम मीटिंगद्वारे तब्बल ९०० कर्मचाऱ्यांना एका क्षणात नोकरी वरुन काढून टाकले होते आणि हाच ‘वाईट’ ट्रेंड इतर कंपन्या फॉलो करत आहेत असे दिसून येत आहे.

 

 

आताकाही दिवसांपूर्वी एका ब्रिटीश फर्मने पुन्हा असेच केले आहे. ब्रिटनच्या शिपिंग कंपनी P&O फेरीनेही तीन मिनिटांची झूम मीटिंग घेतली आणि या छोट्याश्या मीटिंग मध्ये या फर्म ने ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, ज्यावर सर्व बाजूंनी टिकेची झोड उडाली आहे. कंपनीने दोन दिवसांपूर्वी या मोठ्या घोषणेबाबत आपल्या कर्मचाऱ्यांना व्हिडिओ संदेश पाठवला होता.

 

 

P&O फेरीचे प्रमुख त्यांच्या झूम कॉल दरम्यान म्हणाले, ‘मला कळविण्यास अत्यंत खेद होत आहे की तुम्हा सर्वांना त्वरित प्रभावाने नोकरी वरुन काढण्यात येणार आहे. आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस असणार आहे, कर्मचार्‍यांना त्यांचा आतापर्यंतचा पूर्ण पगार दिला जाईल.” असे अधिकार्‍याने सांगितले असले तरी, या घोषणेमुळे कर्मचार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.

 

 

● २ वर्षात २० कोटी पाउंड चे नुकसान.

अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आले आहे, परंतु कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे की, “कंपनीकडून या कर्मचाऱ्यांना ईमेल, पोस्ट, कुरिअर आणि मजकूर संदेशाद्वारे पूर्वसूचना देण्यात आली होती. दोन वर्षांत कंपनीला एकूण २०० दशलक्ष पौंडांचे नुकसान झाले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरी वरुन काढण्याशिवाय आमच्याकडे दूसरे कोणतेही पर्याय नव्हते.

 

hindustantimes.com

कंपनीच्या या निर्णयावर देशातील अनेक राजकारण्यांनीही जोरदार टीका केली आहे. ब्रिटीश खासदार कार्ल टर्नर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ‘कंपनीला दिलेले सर्व फंड परत घेतले पाहिजेत. सरकारने कंपनीला सांगितले पाहिजे की कंपनीने कामगार संघटनेशी बोलून यामधून काहीतरी मार्ग काढायला हवे.

● लॉकडाऊनमध्ये कंपनीला सरकारकडून 10 दशलक्ष पौंड मिळाले होते. कंपनीला कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान यूके सरकारकडून ११०० कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी £१० दशलक्ष फंड मिळाले होते. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले की गेल्या दोन वर्षात त्यांच्या कंपनीला £२०० दशलक्ष पाउंडचे नुकसान झाले आहे आणि आता निधीच्या कमतरतेमुळे त्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याने त्यांना नोकरी मधून काढण्यात येत आहे.

 

 

याआधी पण याप्रकारच्या घटना घडल्या आहेत. भारतीय वंशाचे Better.com चे बॉस विशाल गर्ग यांनी सुद्धा असेच काहीसे केले होते. गर्गने ख्रिसमसच्या निमित्ताने झूम कॉलवर ९०० कर्मचाऱ्यांना झटक्यात काढून टाकले होते. या ९०० कर्मचाऱ्यांमध्ये अमेरिका आणि भारतातील लोक होते. या झुम मीटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता आणि गर्गच्या या अश्या वागण्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांना काही दिवसांसाठी रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र, महिनाभरानंतर त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version