Site icon InMarathi

साधूंचे मृतदेह उचलताना करपात्री महाराजांनी दिला इंदिरा गांधींना ‘शाप’, जो ठरला खरा

indira gandhi im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाची नियत त्याला काही गोष्टी भोगायला लावते हे तर तुम्हाला माहितीच असेल. ‘प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे मिळतात’ अशीही एक म्हण आहे. आपण आपल्या अनेक पुराण कथांमध्ये चुकीची शिक्षा म्हणून मिळालेल्या शापाच्या कहाण्या देखील ऐकल्या वाचल्या असतील, पण जर तुम्हाला फक्त ६०/७० वर्षांपूर्वी घडलेली शापकथा समजली, तर तुमचं नक्कीच विश्वास बसणार नाही.

काय होती ती कहाणी? असे काय घडले होते, ज्यामुळे ही शापकथा जन्माला आली, चला पाहूया

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मित्रांनो, आपला भारत हा हिंदू संस्कृतीचा पाईक देश आहे. आपल्याकडे संस्कृतीनुसार निसर्ग आणि त्याच्या प्रतिकांची देव म्हणून पूजा अर्चना केली जाते. यातील एक आहे गाय. जिला आपण गोमाता म्हणतो.

 

 

हिंदू संस्कृतीत गायीला माता मानले जाते. ती पूजनीय आहे. पण काही ठिकाणी मात्र या गायींचे कत्तलखाने अगदी ब्रिटिशांच्या काळापासून सुरू ओते. अनेकदा मागणी करूनही ते बंद करण्यात आले नव्हते.

याच दरम्यान भारतीय राजकारणात अनेक उलथापालथी सुरू होत्या. नुकताच लाल बहादुर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता, देशात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी उदयाला आलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाने राजकारणाची बागडोर आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

यामध्ये वेगवेगळी आश्वासने देऊन अनेक प्रभावी व्यक्तींना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न देखील चालू होते. त्याचवेळी देशात विनोबाजी भावे आणि इतर साधू-संतांच्या नेतृत्वाखाली, गोहत्या थांबवण्यासाठी आणि गोरक्षणासाठी कठोर कायदे आणण्यासाठी देशात मोठे आंदोलन झाले.

हा तो काळ होता जेव्हा इंदिरा गांधी वाराणसी मधील ‘धर्मसम्राट कर्पात्री महाराजांचा’ खूप आदर करत होत्या. मात्र, तो निवडणुकीचा काळ होता. असे म्हटले जाते, की इंदिराजींनी महाराजांना वचन दिले होते की जर आपण निवडणुका जिंकल्या तर त्या सर्व गोहत्येचे अड्डे ( जे ब्रिटिश राजवटी पासून सुरू होते ) बंद करतील.

 

 

त्या निवडणूक जिंकल्या, पण दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या वागल्या नाहीत. त्यांनी संसदेत गोहत्या बंदी विधेयक मांडले नाही. तसेच त्यावर काही चर्चा ही करण्यात आली नाही. अनेकदा मागणी करून तसेच स्मरण करूनही इंदिरा गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

करपात्री महाराज हे स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य होते. तसेच ते गोरक्षणाचे खंबीर समर्थक देखील होते. गोरक्षण कायद्याच्या आश्वासनानंतरच त्यांनी इंदिराजी यांना पाठिंबा दिला होता. निवडून आल्यावर जेव्हा इंदिराजी या संदर्भात टाळाटाळ करायला लागल्या, तेव्हा त्यांना आठवण करून देण्यासाठी करपात्री महाराजांना आंदोलन करावे लागले होते.

 

 

गोहत्याबंदी आणि गोरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा व्हावा या मागणीसाठी देशभरातील लाखो साधू-संत, गोरक्षक यांनी दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढला व संसदेबाहेर धरणे धरले. ती तारीख होती- ७ नोव्हेंबर १९६६. तेव्हा करपात्री महाराज रामचंद्र वीर यांच्यासोबत होते, रामचंद्र वीर ज्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती.

करपात्री महाराज आणि इतरांच्या नेतृत्वाखाली संत संसदेकडे कूच करत होते, तेव्हा महिलाही मोठ्या संख्येने होत्या. संसदेबाहेर धरणे देऊन आपल्या मागणीसाठी ते सारेजण खूपच आग्रही दिसत होते.

आपल्याकडे दुर्लक्ष केले जातेय हे लक्षात आल्यावर हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील तत्कालीन जनसंघाचे खासदार स्वामी रामेश्वरानंद यांनी आंदोलनकारी संतांना सांगितले, की संसदेत प्रवेश करा आणि खासदारांना बाहेर काढा, मगच गोहत्या थांबवण्यासाठी काहीतरी कायदा केला जाईल.

त्यांचा मोर्चा संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. या संपूर्ण घटनेनंतर इंदिराजींनी जमावावर गोळीबाराचे आदेश दिल्याचे सांगितले जाते.

 

 

अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, ज्यात शेकडो संत आणि गोरक्षकांना प्राण गमवावे लागले. अगदी राजधानीत संचारबंदी लागू झाली होती. अनेक संतांना तुरुंगात टाकले गेले.

एका वृत्तानुसार, तत्कालीन गृहमंत्री गुलजारी लाल नंदा यांना वाटले, की ते चर्चेतून परिस्थिती हाताळतील, परंतु प्रकरण हाताबाहेर गेले आणि गोळीबारापर्यंत पोहोचले.या घटनेनंतर नंदा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

काही लोक या घटनेमागे तत्कालीन राजकारणालाही जबाबदार धरतात. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधींनी सत्ता हाती घेऊन अवघ्या काही दिवसांचा कालावधी लोटला होता. इतर अनेक पक्षांचे नेते तसेच काँग्रेसचे काही लोक त्यांच्या नेतृत्वाबद्दल अस्वस्थ होते, त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने इंदिरा सरकार अस्थिर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला.

अनपेक्षितपणे झालेल्या गोळीबारामुळे आणि इंदिरा गांधी यांच्या विश्वासघाताने करपात्री महाराज व्यथित झाले. आपल्या अनेक सहकार्‍यांना मृत्यूमुखी पडलेले पाहून ते उद्विग्न झाले आणि त्यांनी इंदिरा गांधी यांना शाप दिला,की “ज्याप्रमाणे तू या साधू संतांवर गोळीबार करून त्यांची हत्या केलीस तशीच हत्या तुझीही होईल.”

यानंतर विनोबाजी भावे व करपात्री महाराज दोघेही डिप्रेशनमध्ये गेले. साधूंच्या हत्येचा आघात त्यांना सहनच झाला नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी करपात्री महाराजांनी शाप दिला होता तो दिवस गोपाष्टमीचा होता आणि ज्या दिवशी इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून केली तो दिवस देखील गोपाष्टमीचाच होता…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version