Site icon InMarathi

आपल्याच नेत्यांची गुप्तहेरी करणारा ‘भारतीय हेर’ आणि मोरारजी देसाई CIA एजंट असल्याचा आरोप!

Morarji Desai Raw im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – तुषार दमगुडे

सी.आय.ए चे जाळे जगभर पसरलेले आहे. शत्रू राष्ट्राची इत्यंभूत माहिती असणे तर गरजेचे आहेच पण मित्र राष्ट्राचेही गुपित माहित असणे हीच खरी दुरदृष्टी.

आपण ज्या काळातील घटना पाहणार आहोत तो काळ भारताचे अमेरिकेशी सख्य नसलेला काळ होता आणि तेव्हा आपण रशियाच्या गोटात होतो.

रशियात हेरगिरीचे जाळे पसरविणे अवघड होते तसे रशियन युद्ध सामुग्रीचे अवलोकन भारतात करणे अमेरिकेच्या हिताचे आणि सोप्पे काम होते. यामुळे सी.आय.ए.चे दिल्लीतील केंद्र एक प्रमुख हेरगिरी केंद्र होते आणि आहे.

 

 

हे हेर राजकीय नेते तसेच संरक्षण दलातल अधिकारी यांच्याभोवती आपले जाळे व्यवस्थित पसरतात. पण १९६० च्या दशकात सी.आय.ए चा भारतातील प्रमुख हेर एक सायकल दुरुस्त करणारा होता तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का? पण दुर्दैवाने हे सत्य आहे.

“रामस्वरूप” हे त्याचे नाव. दिल्लीत राहणारा हा माणूस चळवळ्या आणि उद्योगी होता. सायकल दुरुस्ती हा त्याचा व्यवसाय.

एकदा कसल्याशा कामानिमित्त अमेरिकन इन्फर्मेशन सेंटर मध्ये गेला. तिथे त्याची भेट ‘किंग’ या टोपण नावाने वावरणाऱ्या अमेरिकन हेराशी झाली.

ही भेट म्हणजे २० वर्ष चालणाऱ्या हेरगिरीची सुरवात होती. या किंगने अमेरिकन इन्फर्मेशन सेंटर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती मिळवण्याची छोटीशी कामगिरी सुरवातीला “रामस्वरूप” ला दिली. हे काम रामस्वरूपने चातुर्याने केले.

 

economictimes.indiatimes.com

 

हे काम पाहून किंगने  रामस्वरूप ची भरती सी.आय.ए. मध्ये केली. प्रशिक्षण पार पाडल्यावर रामस्वरूप वर भारतीय मोठ्या नेत्यांवर हेरगिरी करण्याची जबाबदारी सोपवली गेली.

१९६७ मध्ये मोरारजी देसाईची हेरगिरी करून इंदिरा गांधींच्या मंत्री मंडळातून राजीनामा देण्यासाठी त्यांचे मन वळविण्याची जबाबदारी रामस्वरूप ला दिली गेली यातून त्याचे महत्व स्पष्ट होते.

रामस्वरूप ला ६० च्या दशकात मासिक २०,००० पगारा व्यतिरिक्त १ लाख रु. महिना सी.आय.ए. पुरवित होती यावरून तो किती महत्वाच्या बातम्या पोहोचावीत असेल याची कल्पना करा.

रामस्वरूपने एक न्यूज एजन्सी स्थापन करून त्या नावाखाली महत्वाच्या बातम्यांची कात्रणे हेलसिंकी, frankfart आदी अमेरिकन सी.आय.ए. कार्यालयाना पाठवणे सुरु केले. रामस्वरूपचे बिंग फुटले इंदिरा गांधी हत्येनंतर.

गांधी हत्येतील आरोपी सतवंत सिंगचे वकीलपत्र घेणारा प्रेमनाथ लेखी रामस्वरूपच्या संपर्कात होता.

प्रेमनाथ लेखी आय.बी.च्या रडार वर आल्यावर रामस्वरूप ची पाळेमुळे खणून काढण्यास वेळ लागला नाही. त्याला अटक केल्यावर तो अमेरिकेबरोबरच इस्राईल, जर्मनी, तैवान साठीही हेरेगिरी करत असल्याच उघड झालं.

===

परदेश वारीच आमिष दाखवून त्याने बरीच गुपित फोडली होती. आज परदेश वारीच कौतुक नसलं तरी त्याकाळात याची क्रेझ होती.

याशिवाय “वाइल्ड बिल “नामक अमेरिकन हेराने एका चालकाला फोडून T -७२ संपूर्ण रणगाडाच पाकिस्तानात नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

या पार्श्वभूमीवर त्याकाळात न्युयॉर्क टाईम्सचे पत्रकार सेमूर हर्ष यांनी मोरारजी देसाई सी.आय.ए. चे एजंट असल्याचा दावा केला होता. हा पत्रकार सत्यवादी होता हे लक्षात घेतले पाहिजे.

 

 

आता मोरारजी देसाईंनी त्याकाळात घेतलेले काही निर्णय पहा. भारताची गुप्तचर संस्था R.A.W. ची आर्थिक तरतूद कमी करून तिच्या कर्मचारी संख्येत कपात केली होती.

चोरीमारी करून इस्लामिक अणुबॉम्ब तयार करण्याचा पाकचा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी “काहुटा” येथे अणुभट्टी बांधण्यात आली होती.

R.A.W. ने तेथे प्रभावी जाळे विणले होते. आपल्या पाकी एजंटा मार्फत अणुभट्टिची ब्लू प्रिंट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कामासाठी त्या हेराला १००० अमेरिकन डॉलर देण्याचे ठरले.

परकिय चलनात व्यवहार करण्याचा अधिकार तेव्हा R.A.W. ला नव्हता. सरकारी परवानगी घेण्यासाठी R.A.W.चे अधिकारी मोराराजीकडे गेले.

या मूर्ख माणसाने परवानगी तर नाकारलीच वर हे उद्योग बंद करा असं फर्मावलं आणि एका समारंभात पाकी राजदुतासमोर हे बिंग फोडलं. भारताचे सहा गुप्तहेर मारले गेले.

याच अणुभट्टिचा नाश करण्यासाठी इज्राईलचे पंतप्रधान मोशे दायान आणि मोसादचे प्रमुख मोराराजीना भेटले परंतु मोरारजीने साफ नकार दिला.

दुर्देव म्हणजे तिथून पुढे पाकी अणुबॉम्ब कार्यक्रमाचा माग भारताला कधी लागला नाही आणि असा मूर्ख, आतातायी अण्वस्त्र सिद्ध शेजार भारतीयांना लाभून आपल्या करोडो लोकांचे जीव आज त्यांच्या दयेवर अवलंबून आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version