Site icon InMarathi

ग्लव्हसच्या ऐवजी विटा घेऊन विकेटकिपिंग केलेला मुलगा झाला जगातला बेस्ट विकेटकीपर

wicket im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एका फँटसी गेमच्या जाहिराती सध्या फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. रोहित शर्मा, धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत वगैरे नावाजलेल्या खेळाडूंना या जाहिरातीत पाहता येतं. “भागते भागते कुछ ज्यादा ही दूर आगया” असं म्हणणारा हार्दिक असो, किंवा “लेकिन अब ४५ नंबर की जर्सी बनती भी हैं और सब पहनते भी हैं” असं म्हणणारा रोहित शर्मा असो, यांच्याबरोबरीने ‘विटांच्या मागे विकेटकीपिंग करणारा’ रिषभ पंत सुद्धा या जाहिरातींमध्ये दिसतो.

 

 

या जाहिराती लिबर्टी घेऊन बनवल्या गेल्या असणार, हे कुठलीही सुजाण व्यक्ती सांगेल. त्यामुळे कल्पनाशक्तीचा पुरेपूर वापर या जाहिराती बनवताना झालेला असणार. क्रेट आणि विटांच्या मागे यष्टिरक्षण करत होतो, असं रिषभ पंत म्हणतो, त्यावेळी ते मनाला पटतं. अगदी सहज मान्य केलं जातं. मात्र स्टंप म्हणून नाही, तर चक्क ग्लोव्जऐवजी विटांचा वापर करणारा एक खेळाडू पुढे भारतीय संघातील महत्त्वाचा सदस्य आणि उत्तम यष्टीरक्षक झाला होता. ‘नक्की कोण होता हा खेळाडू?’, ‘काय आहे त्याची कहाणी?’, ‘कशी होती त्याची कारकीर्द?’ जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१९८३ च्या विश्वचषकात…

कपिल देव यांच्या कर्णधारपदाची सर्वोच्च बिंदू म्हणजे, १९८३ च्या विश्वचषकावर भारताने उमटवलेली मोहोर! या संघातील एक सदस्य आणि यष्टीरक्षक म्हणजेच आपल्या आजच्या लेखाचा केंद्रबिंदू आहे. होय बरोबर, सय्यद किरमाणी! भारताचा एक यशस्वी यष्टीरक्षक आणि विश्वचषक विजयात स्टम्पच्या मागे चांगली कामगिरी करणारा एक शिलेदार, म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. क्रिकेटच्या कट्टर चाहत्यांना किरमाणी यांना ‘सर्वोत्तम यष्टीरक्षक’ हा सन्मान मिळाला होता, हे लक्षात असेल. त्यांचा क्रिकेटमधील प्रवास मोठा रोमहर्षक आणि उत्तम आहे.

 

तो तंत्रज्ञानाच्या अभावाचा काळ होता

सय्यद किरमाणी यांनी भारतीय संघाच्या यष्ट्यांचं रक्षण सुरु केलं, तो काळ फारुख इंजिनियर गाजवत होते. ब्रिटिशांना त्यांच्या भाषेत ठशन देण्यात त्यांचा हातखंडा होता. उत्तम इंग्रजी समालोचक म्हणून त्यांचं नाव झालं होतं. मात्र तंत्रज्ञान आणि सपोर्ट स्टाफ या दोन्ही बाबतीत तो काळ अगदीच मागास होता असं म्हणायला हवं.

अशा स्थितीत किरमाणी यांनी उत्तम किपींग करत कसोटी सामन्यांमध्ये २०० हुन अधिक गडी बाद केले. भारताची जबरदस्त फिरकी चौकडी आणि कपिल देव नावाचा तोफखाना समोरून चेंडू सोडत असे, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.

 

 

भाग सय्यद भाग…

किरमाणी एक यष्टीरक्षक म्हणून प्रसिद्ध असले, तरी ते शालेय जीवनात चक्क ऍथलिट होते. १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांचा वेग खास होता. धावण्याच्या शर्यतीनंतर त्यांना दुसऱ्या क्रमांकावर आवड होती ती हॉकीची! त्यांनतर फुटबॉल आणि क्रिकेटकडे ते वळत असत. धावपटू असणाऱ्या किरमाणी यांचा क्रिकेटपटू म्हणून प्रवास काहीसा उशिराने सुरु झाला.

 

 

विटा घेऊन केली किपींग…

लहानपणी किरमाणी बंगलोरमध्ये राहत असत. तिथे कॉर्क बॉलने क्रिकेट प्रॅक्टिस करणाऱ्या काही खेळाडूंशी त्यांचा संबंध आला. त्यांना त्या संघाच्या कर्णधाराने चक्क यष्टिरक्षण करायला सांगितलं. कॉर्क बॉलने खेळायची सवय नसणाऱ्या किरमाणी यांनी तिथे पडलेल्या विटा उचलल्या आणि बॉल अडवायला सुरुवात केली. पुढे त्याच विटा वापरून ते बॉल अडवू लागले.

याने विटा तुटत असत, हे वेगळं सांगायची गरज नाही. या विटा तुटणं आणि बांधकाम करणाऱ्यांचा वर खाणं सुरूच राहिलं. ही किरमाणी यांच्या क्रिकेटची सुरुवात ठरली आणि हळहळू शालेय जीवनात सुद्धा ते क्रिकेटकडे वळले.

 

 

टेक्निक कुणी शिकवलंच नाही…

किरमाणी यांनी किपींगला सुरुवात केली आणि त्यानंतर ही जबाबदारी सोडून देण्याची संधी कधीच मिळाली नाही. शाळेत ते यष्टिरक्षण करतच राहिले. मात्र यष्टिरक्षण कसं करावं, त्याचं तंत्र काय असतं याबद्दल त्यांना कुणीही सांगितलं नाही. त्यांचं ते जसं जमेल तसं शिकत गेले. जमेल तसं यष्टिरक्षण करत गेले.

 

 

१९६५-६६ च्या वर्षात ऑस्ट्रेलियन शालेय संघ भारतीय दौऱ्यावर आला होता. भारतीय शालेय संघाकडून खेळताना किरमाणी यांनी १२१, १३२ आणि ७५ अशा उत्तम खेळी करून दाखवल्या. या उत्तम कामगिरीचा फायदा त्यांना झाला आणि १९६७ साली इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय शालेय संघात त्यांना स्थान मिळालं. पुढे १९७१ साली त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवलं आणि त्यांचा दर्जेदार प्रवास सुरु झाला. पहिल्याच कसोटी सामन्यात शतक ठोकणारे किरमाणी पुढे १९८६ सालापर्यंत भारतीय संघाकडून खेळत होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version