आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“ऊन जरा जास्त आहे… दरवर्षीच वाटतं” या कवी सौमित्र यांच्या सुंदर ओळींचा आपण सर्वच सध्या प्रत्यय घेत आहोत. लहान मुलांच्या ‘सॉफ्ट ड्रिंक’च्या जाहिरातीत दाखवतात तसा सूर्य सध्या एक नळी सोडून प्रत्येकाची ऊर्जा ओढून घेत आहे अशी भावना उन्हातून चालतांना रोज निर्माण होत आहे.
ऋतूचक्र हे दरवर्षी त्याच पद्धतीने कसं चालतं? उन्हाळा सुरू झाल्यावर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर का कमी होतं? असे प्रश्न सध्या प्रत्येक पालकांना त्यांचे बालक विचारत असतील.
भुगोल विषयात या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण, “मावळतीला जातांना लालबुंद असलेला सूर्य इतर वेळी पिवळा का असतो?” या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आपल्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये.
आजच्या मुलांना असे प्रश्न नक्कीच पडू शकतात किंवा एखाद्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय आहे सूर्याचा रंग पिवळा असण्यामागचं कारण? जाणून घेऊयात.
सूर्याचा नेमका रंग कोणता? हा कित्येक वर्षांपासून संशोधनाचा विषय आहे. काही संशोधनानुसार, हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की, सूर्याचा रंग हा प्रत्यक्षात पांढरा आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एखाद्या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राला जर भेट देण्याची संधी मिळाली तर तिथून सूर्य, चंद्र यांचा नेमका रंग कोणता याबद्दल शास्त्रज्ञांनी नोंद केलेली माहिती वाचायला मिळू शकते.
सूर्याचे ऑनलाईन फोटो बघितले तर असं लक्षात येतं की, प्रत्येक वेबसाईटवर, टीव्हीवर सूर्य हा नेहमीच पिवळ्या रंगाचा दाखवण्यात येतो. सूर्य पिवळ्या रंगाचा दिसण्याचं कारण हे त्याच्या भोवती असलेलं वातावरणाचं आवरण आहे असं सांगितलं जातं. सूर्य आपल्याला या आवरणातूनच दिसतो.
सूर्याचा प्रकाश हा सकाळी आणि संध्याकाळी पिवळ्या रंगाचा दिसण्याचं कारणही हेच सांगितलं जातं. जेव्हा सूर्यप्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडतो तेव्हा आपल्या डोळ्याचा रंग देखील त्याच रंगाचा होतो हेसुद्धा निरीक्षणात समोर आलं आहे.
याचं कारण हे आहे की, आपले डोळे जो रंग स्वीकार करतात त्या रंगाचे आपले डोळे दिसायला लागतात.
सूर्याचा नेमका रंग कोणता?
सूर्याला जर एखाद्या ‘प्रीझम’च्या माध्यमातून बघितलं तर आपल्याला तो प्रकाश हा एकसारखा पिवळ्या रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाश पिवळ्या रंगाचा वाटण्याचं अजून उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्य. सूर्यप्रकाश पिवळ्या रंगाचा दिसणे हे सुद्धा या सात रंगाचं प्रतिबिंब असल्याचं काही शास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे.
प्रकाश लहरी या एकत्र येऊन पांढरा रंग परावर्तित करतात तो सूर्याचा खरा रंग आहे हेसुद्धा मत नोंदवण्यात आलं आहे. सूर्य रोज विविध रंग, प्रकारच्या प्रकाशलहरी परावर्तित करत असतो.
या प्रकाशलहरींचा सर्वात मोठा भाग जर बघितला तर तो हिरव्या रंगाचा दिसतो हेसुद्धा एका अभ्यासात समोर आलं आहे.
—
- सूर्यकिरणांनी कोरोनाचे विषाणू मरतात म्हणे!! खरंय का?
- “नासाच्या” एका वैज्ञानिकाने केलाय गौप्यस्फोट – चंद्रावर ‘कुणीतरी’ आहे! वाचा
—
वातावरणाच्या रंगाचा सूर्याच्या रंगावर पडणाऱ्या फरकाला ‘रे लाईट स्कॅटरिंग’ असं म्हणतात. जांभळा आणि निळा रंग हे जास्त करून लाल रंगाकडे झुकण्यासारखे असल्याने सूर्यास्ताच्या वेळी सूर्य हा लाल रंगाचा दिसतो.
आकाशात साचलेला धूर आणि धुकं हेसुद्धा सूर्याचा रंग लाल दिसण्याचं एक कारण सांगितलं जातं. आकाश निळ्या रंगाचं दिसण्याचं कारण सुद्धा ‘रे लाईट स्कॅटरिंग’ हेच सांगण्यात येतं.
सूर्य जेव्हा पातळ वाऱ्याच्या माध्यमातून बघितला जातो तेव्हा त्याचा खरा रंग आपण बघू शकतो. तेव्हा सूर्याचा पिवळा रंग हा काही अंशी दृष्टीस पडतो. जितका सूर्य किंवा चंद्र पृथ्वीपासून अधिक उंचीवर तितका सूर्य हा पिवळ्या रंगाचा दिसतो आणि चंद्र हा पांढऱ्या रंगाचा दिसत असतो हेसुध्दा एका निरीक्षणात समोर आलं आहे.
नासा काय सांगते?
जगातील सर्वात मोठी अवकाश संशोधन करणारी नासा ही संस्था सुद्धा हे मान्य करते की, कोणत्याही टेलिस्कोप मधून जरी आपण सूर्याचा रंग शोधण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्यासमोर सूर्याचा खरा रंग समोर येऊ शकत नाही.
सूर्याच्या फोटोमध्ये किंवा चित्रांमध्ये पिवळ्या रंगाचा वापर करणे हे केवळ उष्णता, ज्वाला यांच्याशी साधर्म्य राखणारा आहे. हिरव्या रंगाच्या फिल्टर मधून सूर्याचा घेतलेला फोटो हा ग्राह्य धरला जातो, कारण आपले डोळे हे हिरव्या रंगाकडे सर्वप्रथम आकर्षित होतात असं नेत्रतज्ञांचं मत आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा आपण सूर्याला एखाद्या टेलिस्कोप किंवा डोळे सुरक्षित ठेवणाऱ्या फिल्टरच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सूर्याचा रंग हा नेहमीच पिवळ्या रंगाचा दिसत असतो.
याचं कारण हे आहे की, त्या सर्व फिल्टर, टेलिस्कोपच्या काचा या आपल्या डोळ्यांना सहन होतील अशा प्रकारच्या करण्यात आलेल्या असतात. पण, त्यामुळे सूर्याचा रंग पिवळा आहे हे सिद्ध होत नाही.
अजून उच्च प्रतीच्या फिल्टरचा वापर केला तर सूर्य हा अजून सुंदर आणि पांढऱ्या रंगाचा दिसू शकतो ही शक्यता देखील समोर आली आहे.
सूर्यप्रकाश हा एकच प्रकारचा उजेड सूर्याकडून पृथ्वीला मिळत नसतो. ‘ब्लॅकबॉडी’ रेडिएशन हासुद्धा एक रंग आहे जो सुर्याकडून पृथ्वीवर येत असतो. सूर्यप्रकाशाच्या रंगावरून सूर्याच्या तापमानाचं निदान केलं जातं.
तापमानाच्या दृष्टीने बघितलं तर सूर्याचं तापमान हे ५८०० केल्व्हीन इतकं असतं जे की पांढऱ्या रंगांच्या आसपास आहे. अवकाशमालेतील सर्वात तेजस्वी तारा शोधण्याची मोहीम जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हा ‘रिगेल’ या ताऱ्याचं नाव समोर आलं होतं ज्याचं तापमान हे १ लाख केल्व्हीन इतकं आहे.
अवकाशमालेतील सर्वात शांत आणि कमी तापमानाचा तारा ‘बिटेलगेज्’ हा असतो ज्याचं तापमान ३,५०० केल्व्हीन इतकं आहे आणि त्याचा रंग लाल आहे.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही काही माहिती ही नेहमीच अपूर्ण किंवा अनाकलनीय राहणार आहे हेच इतक्या वर्षात नेहमी समोर आलं आहे. सूर्याचा रंग पांढरा असो की पिवळा त्याने कमीत कमी उष्णता पृथ्वीवर पाठवावी अशी सामान्य माणसाची सध्या तरी अपेक्षा असेल हे नक्की.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.