बापरे!! ‘तारक मेहता का…’ मालिकेतील कलाकारांना दररोज मिळतं एवढं मानधन…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
छोट्या पडद्याने आपल्या सर्वांचे संस्कृतिक आयुष्य व्यापलेले असते. टीव्हीवर दाखविल्या जाणार्या अनेक मालिका आणि त्या मालिकांमधून प्रसिद्ध झालेले कलाकार आपल्या घराघरातून माहिती असतात.
हे कलाकार काय भूमिका करतात इथपासून वैयक्तिक आयुष्यातील त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे राहणीमान, त्यांच्या बद्दलचे गोसिप्स या सगळ्या गोष्टींबद्दल आपण लोक चर्चा करतो.
यामध्ये आणखी एक विषय आहे तो म्हणजे हे कलाकार आपल्या भूमिकांसाठी घेत असलेले मानधन! जितकी मालिका लोकप्रिय तेवढे या कलाकारांचे मानधनाचे आकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात.
विश्वास नाही बसत? आता हेच पहा ना, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं ठरलेलं आहे, पण हे कलाकार तितकंच भारीभक्कम मानधन देखील घेतात.
तुम्हाला माहिती आहे? की या कलाकारांचे मानधन मालिकेच्या प्रत्येक भागानुसार असते. चला तर पाहू या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील कलाकार किती मानधन घेतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जेठालाल :
मालिकेत मुख्य पात्र साकारणारे दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल एका दिवसासाठी १.५ लाख रुपये इतकं मानधन घेतात. महिन्यातून ते २५ दिवस काम करतात.
दयाभाभी :
मालिकेत जेठालालच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी ही एका एपिसोडचे १.५ लाख रुपये मानधन घ्यायची.
बबीताजी :
मालिकेत बाबीता जी हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्त ही प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. एका एपिसोडसाठी मुनमुन ३५ ते ५० हजार रुपये घेते. ती महिन्यातील १६-१७ दिवस शूटिंग करते.
जेठालालचे बापूजी :
या मालिकेत बापुजी झालेले म्हणजेच अभिनेते अमित भट्ट. एका एपिसोडसाठी ते ७० ते ८० हजार रुपये घेतात. मालिकेत ‘चंपक चाचा’ या भूमिकेत ते दिसतात.
मिसेस रोशनसिंग सोढी :
मालिकेतील रोशनसिंग सोढीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बनसीवाल ही एका एपिसोडचे ३० हजार रुपये घेते.
आत्माराम भिड़े :
आत्माराम भिडे हे मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र. ही भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवाडकर एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये घेतात.
पोपटलाल :
श्याम पाठक म्हणजेच मालिकेतील ‘पोपटलाल’ एका एपिसोडसाठी ६० हजार रुपये मानधन घेतात.
तारक मेहता :
मालिकेतील जेठालालच्या बरोबरीने प्रसिद्ध झालेले पात्र म्हणजे तारक मेहता. या मालिकेत जेठालाल व तारक याची मैत्री आपल्याला पाहायला मिळते. तारक मेहता म्हणजेच अभिनेते शैलेश लोढा एका एपिसोडसाठी १ लाख रुपये घेतात.
कृष्णन अय्यर :
गोकुळधाम सोसायटीमधील कृष्णन अय्यरची भूमिका करणारे तनुज महाशब्दे आपल्या भूमिकेसाठी प्रत्येक एपिसोडचे ६५ ते ८० हजार रूपये मानधन घेतात.
—
- आशा पारेखने स्पर्श केला आणि शत्रुघ्न सिन्हा ओरडले – “डेटॉल ला, डेटॉल!”
- गिनीज-बुक मध्ये नोंद झालेला हा बॉलीवूड सिनेमा बनवायला लागली तब्बल २३ वर्ष…
—
टप्पू आणि गोली :
मालिकेतील इतर पात्रांप्रमाणे सर्वांना आवडणारी ही दोन पात्रे म्हणजे टप्पू आणि गोली. टप्पू ची भूमिका करणारा राज अनाडकट एका एपिसोडसाठी १० ते २० हजार रुपये घ्यायचा. तर गोली 8 हजार रुपये घेतो.
तेव्हा मित्रांनो, काय म्हणता? या लोकप्रिय कलाकारांचे मानधनाचे आकडे आहेत ना कोटीच्या कोटी उड्डाण करणारे. या आणि अशाच मनोरंजक न्यूज आणि व्हयुज साठी जोडलेले रहा इन-मराठी सोबत. आपले मत आम्हाला अवश्य कळवा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.