बनारसी साड्यांमागे आहे श्रीमंत इतिहास, चीनच्या नकली साड्यांनी या वैभवाला पोहोचतोय धक्का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे. या हिंदुराष्ट्रावर अनेक राजवटींनी हल्ले केले, दीर्घकाळ राजवट गाजवत इथली संस्कृती नष्ट करत आपली रुजविण्याचे प्रयत्न केले, मात्र हिंदुस्थानच्या मातीचं वैशिष्ट्य हे की इथली संस्कृती नष्ट तर झालीच नाही मात्र येणार्या प्रत्येक परकीय संस्कृतीला या मातीनं आपल्यात शोषून घेत आपल्या संस्कृतिच्या रंगात रंगवून टाकलं.
हे रंगविणं इतकं बेमालूम झालं की आता अनेक गोष्टी या इथल्या संस्कृतीचंच प्रतिक बनल्या आहेत. खाद्य संस्कृतीपासून अनेक गोष्टीत परकीय संस्कृती इथे आक्रमक पध्दतीनं घुसली मात्र इथल्या संस्कृतिनं तिच्यातलं परकेपण काढून टाकत इथल्या संस्कृतीत तिला समावून घेतलं.
या मिलाफ़ाचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे बनरसी साडी. भारतात रेशीम वस्त्रप्रकार पूर्वंपार वापरात आहे. भारतातल्या प्रत्येक प्रांताची खासियत असणार्या साड्या,रेशीम, सुती कापड यांचे पोत प्रसिध्द आहे. भारताचं वैविध्य इथल्या विविधतेत नटलेलं आहे. मगते खान पान असो की वस्त्रप्रकरणं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
महाराष्ट्रातली पैठणी, महेश्वरची माहेश्वरी, बंगालची तांत, गारद असो की केरळची कसावू. या साड्यांत सिल्क, सोनेरी जरी आणि सुती धाग्यांचं मऊमुलायम मिश्रण आहे. मात्र प्रांतानुसार त्याचा पोत, जरी काम बदलत जातं आणि वैविध्य दिसतं.
भारताची ओळख असणारा एक प्रकार म्हणजे बनारसी साडी. श्रीमंतीचं प्रदर्शन घडविणारी बनारसी साडी हा वरचा क्लास मानला जातो. याचं कारण म्हणजे या साडीसाठी वापरलं जाणारं रेशीम आणि त्यावर असणारं भरगच्च जरीकाम.
या जरीकामाला ब्रोकेड या लोकप्रिय नावानं ओळखलं जातं. मुघल आणि हिंदूस्थानी संकृतीचा मिलाफ़ असणारी बनारसी आज इथल्या विवाह सोहळ्यातला अविभाज्य भाग बनली आहे.
लग्नात बोहल्यावर चढताना वधूनं बनारसी शालू नेसणं ही परंपरा बनली आहे. बनारसी साड्या महाग असण्याचं मुख्य कारण यावरचं जरीकाम असतं.
भारतात इतर कोणत्याही प्रांतातल्या साडीवर इतकं भरगच्च जरीकाम आढळत नाही. पूर्वी ही जर सोनं किंवा चांदीच्या तारांनी केलं जात असे. म्हणूनच पूर्वीच्या काळात कसर लागलेल्या साड्या जाळण्याची पध्दत होती. साडी जाळल्यानंतर त्यातला रेशमी भाग जळून जात असे आणि उरलेला भाग या सोनं किंवा चांदीच्या तारांचा असे.
हे दोन्ही धातू रेशमी दाग्याप्रमाणे बनारसीच्या तान्याबान्यात गुंफ़ून त्याची नक्षी उमटविण्याची खासियत म्हणजे ही बनारसी साडी. ब्रोकेडमधे एकाचवेळेस १०० ते ६०० धागे वापरले जातात.
या वारशाचा उल्लेख महाभारतातही आढळतो. मात्र त्याला १९ व्या शतकापासून ठोस आधार लाभला आहे. हे रेशीम विणण्यासाठी आवश्यक कारागिरी या देशात आणण्याचं आणि ती रुजविण्याचं काम मुघल कारागिरांनी केलं.
हा मुघल कलाकारीचा प्रभाव आजही बनारसीच्या वीणकामात दिसून येतो. यात पर्शियन आकृतिबंध मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आज हे पर्शियन आकृतिबंध बदलत जाऊन त्यांना इथल्या फ़ुलापानांचा आकार लाभला आहे. वाराणसी शहरात प्रामुख्यानं या साडीची निर्मिती घडत असे.
राजे महाराजे वापरत असणारं हे वस्त्र सामान्यांच्या आवाक्यात येताना यातली सोनं, चांदीची जर जाऊन त्याजागी कृत्रिम जर आली आणि रेशमाचा नैसर्गिक तलमपणा जाऊन त्याजागी कृत्रिम धागे आले. मात्र या बदलांमुळे बनारसीच्या दिमाखात आणि सौंदर्यात तसूभरही फ़रक पडला नाही.
या साड्यांची कारागिरी प्रत्येक मुघल राज्यकर्त्याच्या कार्यकाळात बहरत गेली, शहाजहानच्या काळात आलेला जामदनी हा प्रकार याचं उत्तम उदाहरण आहे. दोन्ही बाजूंनी एकसारखं वीणकाम, जरीकाम असणारी ही साडी हा बनारसीतला मास्टरपीस मानला जातो.
विणकरांच्या पिढ्यानपिढ्या हातमागावर आपल्या खानदानी गुपितांसहित या साड्या विणत असत. प्रत्येक कारागिराची जरीकामाची एक खासियत असे जी जिवापाड जपली जात असे आणि ते गुपित आपल्या खानदानाबाहेर जाऊ नये याची खबरदारीही घेतली जात असे.
याच कारणामुळे एका नक्षीची नक्कल करणं शक्य होत नसे. मोठ्या अभिमानानं ही रेशमी गुपितं झळाळत्या सोनेरी जरीकामातून विणत कारागिर लाखो रुपयांना विकत असत.
या रेशमी परंपरेला आता ग्रहण लागलं आहे,चायनिज तंत्रज्ञानाच्या रुपानं. आता कोणतीही नक्कल करणं इतकं सोपं झालं आहे की ही परंपरा, मान, अभिमान लुप्त होत आहे. भारतीय संस्कृतिचा वारसा टिकवायचा तर ही हातमाग संस्कृतीही जतन झाली पाहिजे असं पारंपारीक विणकर आवर्जून सांगतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.