Site icon InMarathi

पोलो गोळ्यांना मध्ये छिद्र का असतं? वाचा, यामागचं भन्नाट लॉजिक

polo im 4

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कोणत्या गोष्टी आवडत असतील याची जर एक यादी करायची ठरवली, तर त्यात गोळ्यांचा नंबर फार वरचा असेल. लिमलेटच्या गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या, जेलीच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, चिंचेच्या गोळ्या…. ही यादी प्रत्येकाच्या गोळ्यांमधल्या आवडीनिवडीनुसार वाढत जाणारी आहे.

कोणतंही काम करत असताना या गोळ्या चघळायला सगळ्यांनाच आवडतं. काही जण या गोळ्या टाईमपास म्हणून खातात तर काही जण तोंडाचा वास घालवण्यासाठी. यात मुख्यतः पेपरमिंटच्या गोळ्यांचा नंबर लागतो. पेपरमिंटवरून आठवलं! आपल्याकडच्या पेपरमिंटपेक्षा सगळ्यांना जास्त आवडतात त्या म्हणजे ‘पोलो’.

 

 

२ रुपयांपासून या गोळ्या मिळतात. पण या गोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या सुट्ट्या मिळत नाहीत किंवा श्रीखंडाच्या/ पेपरमिंटच्या गोळ्यांसारख्या पाकिटातही मिळत नाहीत. याचं स्वतंत्र नळकांडीसारखं पॅकिंग असतं. त्यामुळे त्या ठेवायलाही सोप्या जातात.

या वैशिष्ट्याबरोबरच त्यातलं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पोलो गोळीला मधोमध एक छिद्र असतं. बाकीच्या सगळ्या गोळ्या चपट्या, गोल नाहीतर वेगवेगळ्या आकारांमध्ये असतात, पण फक्त पोलोलाच असं मध्ये छिद्र का? त्याच्या मागे काही कारणं आहेत का?? होय. याबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या आहेत. चला जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पोलो कोणाची कॉपी आहे की ओरिजिनल?

असं म्हटलं जातं, की पोलोने १९१२ साली आलेल्या लाईफ सेव्हर्स मिंटची कन्सेप्ट उचलली. कारण पोलो १९४८ साली पहिल्यांदा अस्तित्वात आलं. त्यावेळच्या पाण्यावर तरंगणाऱ्या रिंग्स थोडक्यात लाईफ सेव्हर्स रिंग वरून लाईफ सेव्हर्स रिंग असं त्या मिन्टचं नाव ठेवलं गेलं, पण या गोळ्यांना मधे छिद्र का केलं?

त्याकाळी मुख्यतः तोंडाचा वास घालवण्यासाठी लवंग वापरल्या जात असत. त्यांची जागा घ्यायची म्हणून या मिंट बनवल्या गेल्या. बाकी मिंट ज्या चौकोनी, उशीसारख्या दिसणाऱ्या होत्या त्यांच्यापेक्षा वेगळ्या असाव्यात म्हणून या गोळ्यांना छिद्र पाडलं गेलं आणि त्या लाईफ सेव्हर रिंग सारख्या दिसल्या म्हणून त्याला लाईफ सेव्हर मिंट असं नाव मिळालं. त्यांची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती असं म्हंटलं जातं.

 

 

याशिवाय आणखीन एक थेअरी आहे. ज्यामध्ये असं म्हणतात, की या मिंट एका मशीन प्रेसद्वारे छोट्या, गिळायला सोप्या अशा बनवल्या जाणार होत्या. मात्र नेहमीच्या आकाराच्या आणि पद्धतीच्या बनवणं अवघड जाणार होतं, त्या मोठ्या आकाराच्याच बनल्या असत्या. म्हणून त्या गोळ्यांना मध्ये छिद्र पाडलं गेलं. जेणेकरून त्या मिन्टवर कोरड्या असतानाही योग्य प्रेशर दिलं जाईल आणि त्या तुटणारही नाहीत.

या दोन गोष्टींशिवाय क्वोरामध्ये लिहिल्या गेलेल्या लेखांनुसार पोलोला छिद्र असण्याची वेगवेगळी कारणं आहेत- 

 

 

एका उत्तरानुसार छिद्र केल्याने पॅकेजमध्ये गोळीचा आकार वाढतो. कारण संपूर्ण भरीव गोळी तयार करण्यासाठी जेवढं मटेरियल लागतं तेच मटेरियल जर गोळीला मधे छिद्र असेल तर कमी लागतं आणि कंपनीचे पैसे वाचतात, म्हणून गोळीला छिद्र केलं गेलं.

याबरोबरच गोळीला मधे छिद्र असल्याने ती आपण खाल्ल्यावर लवकर संपते आणि लगेचच आणखी गोळ्या खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपण अधिकाधिक खरेदी करतो.

तर दुसऱ्या एका उत्तरानुसार या गोळीला किंवा इतरही काही गोष्टींना मधे छिद्र (जसे की खेळणी) असण्याचं कारण म्हणजे त्यातून हवा पास झाली पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या लहान मुलाने गोळी गिळली आणि ती त्याच्या घशात अडकली तरीही त्या छिद्रामुळे त्याला श्वास घेता येईल आणि प्राण वाचेल.

 

 

आपण तर या गोळीचा वेगळाच वापर करतो. ही छिद्र असलेली पोलो गोळी आपण दातात धरतो आणि त्यातून हवा सोडून शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करतो. तसेच गोळी खाल्ल्या खाल्ल्या लगेच त्यावर पाणी पिऊन कसं थंड वाटतं ते बघतो.

एका छिद्रामागे एवढी कारणे असतील, याची कल्पना पण नसेल ना तुम्हाला

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version