Site icon InMarathi

हातात बांधला जाणारा लाल-पिवळा धागा फक्त श्रद्धा नाही, त्यामागे आहे महत्त्वाचं विज्ञान

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस हा मुळातच श्रद्धाळू असतो. एखादी व्यक्ती, विचार, रिती-रिवाज यांवर आपली श्रद्धा ठेवतो. त्यानुसार आपले वागणे ठरवतो. माणसाच्या या जाणिवेतून अनेक देवी-देवता, धर्म, संस्कृती यांचा जन्म झाला. त्यानुसार तिलक लावणे, पायाला स्पर्श करून नमस्कार करणे, तुळशीच्या झाडाला पाणी घालणे अशा अनेक परंपरांचे पालन केले जाते, यातलीच एक परंपरा म्हणजे कोणत्याही शुभ कामाआधी हातामध्ये रक्षासूत्र बांधणे.

त्या सुत्राला कलव किंवा मौली असे म्हणतात. काय आहे हा धागा मनगटात बांधण्यामागचे शास्त्र ? किंवा परंपरा? कोणत्या कारणामुळे हा धागा महत्वाचा मानला जातो.

 

कोणत्याही धार्मिक कार्याआधी, पूजेआधी विधिवत मंत्रोच्चार करून मगच हा धागा हातात का बांधला जातो असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल, हो ना? चला तर मग जाणून घेऊया विषयी.

 

शास्त्रानुसार कलव बांधण्याची परंपरा देवी लक्ष्मी आणि राजा बळी यांनी सुरू केली होती. देवी महालक्ष्मीचे व्रत करताना व्रताच्या सुरवातीला हा धागा बांधणे अनिवार्य असते. कोणतेही शुभ कार्य करताना त्या कार्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी देखील हा धागा बांधला जातो.

उद्देश कोणताही असो श्रद्धा म्हणून, परंपरा म्हणून कलव बांधतात. कलवाला रक्षासूत्र असेही म्हणतात, असे मानले जाते की ते मनगटावर बांधल्याने जीवनातील संकटांपासून संरक्षण होते. याचे कारण म्हणजे कलव बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो.

कलव कच्च्या सूतापासून बनविला जातो. मौली लाल रंगाचा, पिवळा रंग किंवा दोन रंगांचा किंवा पाच रंगांचा असतो. असे मानले जाते, की त्यास मनगटावर बांधल्यास जीवनातील संकटापासून आपले संरक्षण होते.

सनातन परंपरेचे पालन करणारे लोक हातात लाल रंगाचे कलव घालतात. पूजेच्या वेळी लाल किंवा पिवळ्या रंगाचा कलावा हातात बांधला जातो. याशिवाय कोणत्याही शुभ कार्याच्या सुरूवातीस लाल रंगाचा धागाही हाताला बांधला जातो.

 

 

जेव्हा आपण एखादी नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा आपण त्यास कलावा बांधतो. शास्त्रानुसार मनगटावर लाल कलव धारण केल्याने कुंडलीतील मंगळ मजबूत होतो. वास्तविक, ज्योतिषशास्त्रात मंगळाचा शुभ रंग लाल आहे.

याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने पिवळा कलव बांधला तर ते त्यांच्या कुंडलीत गुरु बृहस्पती मजबूत करते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त, कलावा बांधणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील फायदेशीर आहे. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

शरीरविज्ञानानुसार, शरीराच्या अनेक प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातून जातात. मनगटावर कलावा बांधून या नसांची क्रिया नियंत्रित केली जाते. यामुळे त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचा सुसंगतपणा कायम राहतो.

 

 

शरीराच्या संरचनेचे मुख्य नियंत्रण मनगटात आहे. याचा अर्थ असा आहे, की मनगटाला तो धागा बांधल्याने माणूस निरोगी राहतो. कलावा बांधल्याने रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते.

तेव्हा मित्रांनो प्रत्येकाची एक विशिष्ट श्रद्धा असते, त्या श्रद्धेवर त्यांचा विश्वास असतो. त्या विश्वासामुळेच आपण आपल्याशी जोडल्या गेलेल्या परंपरा जपत असतो. श्रद्धा म्हणून हातात बांधल्या जाणार्‍या लाल-पिवळ्या धाग्यामगे कारण कोणतेही असो ते माणसाच्या भावनांशी जोडलेले असते. ये मोह मोह के धागे… जे आपण जपतो, खरंय ना?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version