नात्यात ‘मैत्री’ अत्यंत महत्वाची हे पटवून देणारी विवेक-पल्लवीची आगळीवेगळी लव्हस्टोरी
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
खुबसुरती को हमने अक्सर भटकते देखा है, हा मैने इन चंद अल्फाजोंमें “काश्मीर” को लिखा है!
धवल बारोट या लेखकाने काश्मीर बद्दल लिहीलेल्या या सुंदर ओळी किती समर्पक आहेत. पण असे म्हंटले जाते की प्रत्तेक दिव्याखाली अंधार असतो. जसा चंद्रावरती डाग असतो तसेच या सुंदर शहरालादेखील बरेचदा हिंसेचे गालबोट लागलेले आहे.
चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री हे सध्या काश्मीर आणि त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे तूफान चर्चेत आहेत. ११ मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर वीकेंडमध्ये द काश्मीर फाइल्सने २७ कोटींहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
९० च्या दशकाच्या सुरुवातीला काश्मीरच्या खोऱ्यामधून काश्मिरी पंडितांवर होणार्या अत्याचारावर आणि त्यानंतरच्या पलायनावर आधारित असलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, दर्शन कुमार,अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती , आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि समीक्षकांकडून शाबासकी मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा प्रेम विवाह आहे, आपल्या रांगड्या गड्याला ही नाजुक परी भेटली तरी कशी? चला तर जाणून घेऊया.
मुंबईमधील एक मैफिलीमद्धे या दोघांच्या प्रेम कहाणीचा श्री गणेशा झाला. अगदी लहानपनापासून चित्रपट सृष्टीत काम करत असलेल्या पल्लवी जोशी या अभिनय तर विवेक अग्निहोत्री हे जाहिरात, चित्रपट बनवणे या क्षेत्रात कार्यरत होते.
विवेक आणि पल्लवी त्या मैफिलीत भेटले, पहिल्या भेटीत उद्धट वाटणारी पल्लवीच पुढे विवेकला भावली. एकमेकांच्या कामाबद्दल दोघांनाही खूप आदर होता.
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीने पल्लवीसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले होते – की आम्ही ९० च्या दशकात एका रॉक कॉन्सर्टमध्ये भेटलो होतो. आम्ही दोघे ही एकमेकांसाठी अनोळखी होतो, पण आम्हा दोघांमध्ये सारखी असलेली एक गोष्ट म्हणजे, आम्हा दोघांनाही ती मैफिल रटाळवाणी वाटली.
तिचा आम्हाला दोघांनाही कंटाळा आला. त्यातच पल्लवीला तहान लागल्याचे तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले, आणि विवेकने हे ऐकून शांतपणे जाऊन पल्लवी जोशीसाठी थंड पेय आणले.
पल्लवीला जेव्हा या आठवणीबद्दल विचारले तेव्हा तिने टिपणी केली की अॅड-मॅन असलेला तो पहिल्यांदा तिला फारसा आवडला नव्हता . पण नंतर हळूहळू दोघे वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर जोडले गेले, आणि एकमेकांना चांगले ओळखू लागले त्यांच्यात संवाद वाढू लागला.
—
- ‘MeToo’ चे आरोप ते मोहम्मद नावावरून धमक्या; वादग्रस्त विवेक अग्निहोत्रींचा प्रवास
- ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा मीडिया इंडस्ट्रीच्या दुटप्पीपणाचा मुखवटा फाडणार का?
—
दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखू लागले . त्यानंतर तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी २८ जून १९९७ रोजी कुटुंबीयांच्या संमतीने प्रेमविवाह केला. मुंबईतील चिन्मय मिशन मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने या दोघांचे लग्न झाले. या जोडप्याला दोन मुले आहेत.
विवेक आणि पल्लवीचा विश्वास आहे की कोणत्याही नात्यात मैत्री ही सगळ्यात महत्त्वाची प्राथमिक पायरी असते. विवेक अग्निहोत्री हे द ताश्कंद फाइल्स, बुद्ध इन ए ट्रॅफिक जॅम आणि चॉकलेट: डीप डार्क सिक्रेट्स यांसारख्या उमद्या आणि भिन्न प्रकारच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात, तर पल्लवी जोशी यांना त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जाते.
मिस्टर योगी, भारत एक खोज, अल्पविराम, जस्टजू आणि वो चोकरी, द मेकिंग ऑफ द महात्मा आणि सूरज का सातवा घोडा यांसारख्या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये जोशी यांनी काम केले आहे .
विवेक आणि पल्लवीने अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे. बुद्ध इन अ ट्रॅफिक जॅम , द ताश्कंद फाईल्स आणि द काश्मीर फाईल्स या चित्रपटांचा त्या महत्वाचा भाग आहेत. आपल्या या चित्रपट सृष्टीतल्या सुंदर जोडीस त्यांच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेछा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.