४ दिवसांत युद्ध संपवणारा रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकला नाही, जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलेली आहे. एकदा ससा आणि कासवात डोंगरावर पहिले कोण पोहोचणार अशी पैज लागली. हळूहळू चालणाऱ्या कासवाकडे पाहून “आपणच शर्यत जिंकणार”, असा अहंकार सशाच्या मनात निर्माण होतो.
बरंच अंतर पुढे गेल्यावर कासव अजून फार मागे आहे हे सशाच्या लक्षात येतं. “कासव कसलं इतक्यात पुढे येतंय”, असा विचार त्याच्या मनात येतो. मग पळून पळून दमलेला ससा थोडा वेळ झाडाखाली झोप काढायची ठरवतो.
त्याला गाढ झोप लागते. इकडे ससा मात्र धीम्या गतीने का होईना पुढे पुढे जात राहतो आणि अखेरीस स्पर्धा जिंकतो . आपण आपल्या वेगाचा इतका गर्व करायला नको हवा होता असा नंतर सशाला पश्चात्ताप होतो.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाच्या नजरा रशिया-युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धाकडे लागल्या आहेत. युक्रेनच्या मानाने रशिया तसं सामर्थ्यवान राष्ट्र आहे. पण आपण लहानपणी ऐकलेली ससा-कासवाची रूपककथा या दोन्ही राष्ट्रांना लागू होतेय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
२० दिवस होऊनही हे युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये. जो रशिया ४ दिवसांत हे युद्ध संपवण्याचा दावा करत होता तो रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकलेला नाही. नेमकी काय कारणं आहेत असं घडण्यामागे? जाणून घेऊया.
अजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ४ दिवसात युद्ध संपवू असा दावा रशियाने केला होता खरा, पण युद्ध संपायची काही लक्षणं दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की असं काय झालं ज्यामुळे रशियाची रणनीती अयशस्वी ठरली? हे युद्ध रशियाही जिंकत नाहीये आणि युक्रेनलाही हरवू शकत नाहीये यामागे नेमकं काय कारण आहे?
युक्रेनचा आत्मविश्वास आणि युक्रेनच्या जनतेने स्वतः युद्धाच्या मैदानात उतरणं हे यावरचं उत्तर आहे. युक्रेनची ‘टेरिटोरिअल आर्मी’ हे यावरच उत्तर आहे मात्र रशिया युक्रेनवर अद्याप विजय मिळवू न शकण्यामागे याव्यतिरिक्तही आणखी काही कारणं आहेत.
१. रणनीती न आखणे –
सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच रशियाची रणनीती अयशस्वी ठरली आहे हे पहिलं कारण आहे. व्यवस्थित रणनीती आखून युद्धात उतरणं रशियाला नक्कीच शक्य होतं.
तरीदेखील कुठलीही रणनीती न आखता रशियाने युक्रेनवर हल्ला केला. रशियाने युक्रेनच्या ताकदीला कमी लेखलं आणि आपल्या सैनिकांना युद्ध करण्यासाठी मैदानात पाठवून दिलं.
—
- गोंधळात गोंधळ; एका अस्वलामुळे अमेरिका टाकणार होती रशियावर अणुबॉम्ब
- यूक्रेनकडे असलेली ‘ही’ गोष्ट येणाऱ्या काळात रशियाच्या विनाशाचं निमित्त ठरू शकेल!
—
२.असहाय्य्यता –
दुसरं कारण म्हणजे रशियाची असहाय्यता. रशियाच्या पुढ्यातलं सगळ्यात मोठं बंधन हे आहे की त्यांना शक्य होईल तितकं युक्रेनचे नागरिक वाचवून पुढे जायचं होतं. मात्र युक्रेनची जनता रशियाच्या विरोधात होती आणि हीच गोष्ट रशियाला महागात पडते आहे.
३. युक्रेनचा पलटवार –
तिसरं कारण म्हणजे युक्रेनच्या सैन्याने रशियावर केलेला पलटवार. युक्रेनचं सैन्य अशा प्रकारे आपल्यावर पलटवार करेल अशी कल्पनाही रशियाने केली नव्हती.
युक्रेनच्या राष्ट्रपतींनी आधीच टेरिटोरियल आर्मी तयार करून ठेवल्यामुळेदेखील युक्रेनचं सैन्य समर्थपणे हा पलटवार करू शकलं.
‘टेरिटोरिअल आर्मी’ म्हणजे काय?
‘टेरिटोरिअल आर्मी’ मध्ये सामान्य नागरिक असलेले सैनिक असतात जे कमी काळाकरता सैन्यात सेवा करतात. यात साधारणपणे ३ महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जातं पण युक्रेनने तीनच दिवसांत आपल्या नागरिकांना केवळ शस्त्रच चालवायला नाही तर बचाव करायलाही शिकवलं आहे.
त्यांच्याकडून नेमबाजी आणि फिल्ड ट्रेनिंगही करून घेतलं जातंय. यामुळेच युक्रेन रशियाच्या विरोधात समर्थपणे उभं आहे.
या युद्धाचा काहीएक शेवट व्हावा अशी रशियाची इच्छा आहे. मात्र हे होताना दिसत नाहीये. हे युद्ध अनिर्णीत राहण्याच्या मार्गावर आहे असं आता बरेच तज्ञ बोलू लागलेत.
युद्धात तुमच्याकडे नुसतं सामर्थ्य असून उपयोगाचं नसतं. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. कित्येकदा वरकरणी कमकुवत वाटणारे आपल्या बुद्धीचा वापर करून, ठोस धोरण आखून भल्याभल्यांना नामोहरम करतात.
रशियाचा अति-आत्मविश्वास रशियाला नडलाय असंच ही परिस्थिती पाहून म्हणता येईल. युद्धात कोण विजयी होईल हे येणारा काळच ठरवेल. आधीच या युद्धामुळे कित्येकांचं नुकसान झालंय आणि अजूनही होतंय त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपावं हीच प्रार्थना.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.