आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया-युक्रेन युद्धात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशियन आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात झालेल्या भीषण लढाईदरम्यान रशियन सैन्याने केलेल्या जोरदार गोळीबारात एक अमेरिकन पत्रकाराचे इरपिन येथे दु:खद निधन झाल्याची बातमी जगासमोर आली आहे. वृत्तपत्रांनी प्रत्यक्षदर्शी आणि वैद्यकीय सूत्रांच्या म्हणण्या प्रमाणे या घटनेला दुजोरा दिला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
कीव, युक्रेन (CNN) पुरस्कार विजेते अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉड असे या पत्रकाराचे नाव असुन युक्रेनियन प्रादेशिक संरक्षणासाठी स्वयंसेवा करणारे सर्जन डॅनिलो शापोवालोव्ह यांनी सांगितले की, अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉडचा तात्काळ मृत्यू झाला. इतर दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कीव इंडिपेंडंटने वृत्त दिले आहे.
–
- युक्रेनमधील ८०० विद्यार्थांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणारी २४ वर्षीय भारतीय वैमानिक!
- भारतीय सैन्यातून २ वेळा नाकारला गेलेला हा पठ्ठ्या आज युक्रेनसाठी जीवाची बाजी लावतोय
–
ब्रेंट रेनॉड हे इरपेनमध्ये युक्रेनमधून बाहेर जाणाऱ्या परदेशी नागरिकांचे चित्रीकरण करत होते. यावेळी रशियन सैनिकांनी त्यांच्या व्हॅनवर गोळीबार केला. यावेळी रेनॉड यांच्यासोबत त्यांचे इतर परदेशी सहकारी पत्रकार देखील होते. रशियन सैनिकांनी झाडलेली गोळी रेनॉड यांच्या मानेवर लागली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती या गोळीबारातून वाचलेल्या त्यांच्या एका सहकारी अमेरिकन पत्रकाराने दिली आहे.
युक्रेनियन पोलिसांनी रेनॉड यांच्या मृत्यूची नोंद केली असून रेनॉड हे रशियन सैन्याचा ” क्रूरपणा “ जगाला दाखविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
दरम्यान ब्रेंटजवळ न्यूयॉर्क टाइम्सचा बॅज सापडला आहे. परंतु, न्यूयॉर्क टाइम्सने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे ज्यात बेंटर हे युक्रेनमधील न्यूयॉर्क टाइम्ससाठी नियुक्त पत्रकार म्हणून काम करत नव्हते, असे म्हटले आहे. “अमेरिकन पत्रकार ब्रेंट रेनॉड यांच्या मृत्यूने खूप दुःख झाले आहे. ब्रेंट एक प्रतिभावान छायाचित्रकार आणि चित्रपट निर्माता होता.
ज्याने गेल्या काही वर्षांमध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये योगदान दिले होते.त्याने भूतकाळात (अगदी २०१५ मध्ये ) द टाइम्समध्ये भरीव योगदान दिले असले तरी, तो युक्रेनमधील टाइम्समध्ये कोणत्याही प्रकारचा नियुक्त पत्रकार नव्हता. त्याने टाईम्ससाठी काम केल्याचे सुरुवातीचे वृत्त प्रसारित झाले कारण त्याने टाइम्स बॅज घातला होता जो बर्याच वर्षांपूर्वी असाइनमेंटसाठी त्याला जारी करण्यात आला होता .” असे ट्विट न्यूयॉर्क टाइम्सचे व्यवस्थापकीय संपादक क्लिफ लेव्ही यांनी केले आहे. “ब्रेंटचे जाणे अतिशय क्लेशदायक व नुकसानकारक आहे.
ब्रेंटसारखे धाडसी पत्रकार जे युद्धा मधील विध्वंस आणि दुःख जगापर्यंत पोहोचवण्यासाठी जोखीम पत्करतात, त्यांचा च दुर्देवाने यात मृत्यू व्हावा हे दु:खदायक आहे “ असे क्लिफ लेव्ही यांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी टेलीग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रेनॉडने “रशियाचा कपटीपणा, क्रूरता आणि निर्दयीपणा उघड करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आपल्या जीवाचे पैसे दिले.”
कीव प्रादेशिक सरकारच्या म्हणण्यानुसार, कीवच्या अगदी बाहेर उत्तर युक्रेनमधील इरपिन,हे अलिकडच्या दिवसांत रशियन गोळीबाराचे ठिकाण आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर विनाश पाहिल्या गेला आहे.
रेनॉड हे पीबॉडी पुरस्कार विजेते डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, निर्माता आणि पत्रकार होते जे न्यूयॉर्क आणि लिटल रॉक, आर्कान्सा येथे राहत होते आणि काम करत होते, त्यांनी भाऊ क्रेग रेनॉड याच्यासोबत जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातून चित्रपट आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम केले. त्यांच्या वेबसाइट बायोनुसार, रेनॉड यांनी इराक, अफगाणिस्तान, हैती, मेक्सिको आणि इजिप्तसह विविध संघर्ष क्षेत्रांमधून देखील अहवाल दिला होता.
अशा हरहुन्नरी आणि धाडसी पत्रकाराच्या अकाली निधनाने संपूर्ण जग हादरले आहे, काही दिवसांपूर्वी जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता, तेव्हा तिथे एक वार्ताहर वार्तांकन करायला गेला तेव्हा तो देखील मारला गेला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.