”खबरदार, झाड तोडू नका”: शरद पवारांच्या चातुर्याची अजब कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शरद पवार…! महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या राजकारणातील चाणक्य.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३ दा शपथ घेणारा राजकारणातील भीष्माचार्य! पुढे केंद्रात कृषी खातं सांभाळून देशाच्या कृषी क्षेत्राला दिशा दर्शनाचं काम पवार साहेबांनी केलं.
–
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
राजकारणानंतर भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या – क्रिकेट विश्वात देखील शरद पवारांनी मोहर उमटवली आहेच!
ह्या एकामागे एक सरस कामगिरीचं रहस्य आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि हेतू साध्य करण्याची चिकाटी!
एखादी गोष्ट साध्य करायची असेल पण ती सरळ सरळ साध्य होत नसेल – तर कशी साध्य करायची हे पवार साहेबांकडून शिकावं…!
साहेबांच्या चातुर्याच्या अनेक सुरस कथा प्रसिद्ध आहेत. त्यातलीच एक कथा प्रख्यात पत्रकार, कथाकार, नाटककार श्री. गणेश दिघे ह्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर टाकली होती.
दिल्ली प्रशासनाला शरद पवारांनी आपल्या चातुर्याने कसं वाचवलं हे मोठं गमतीशीर रित्या दिसतं.
===
राज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते
पवार साहेबांची खास ‘चाणक्य-नीती’ दर्शवणारी १० वक्तव्यं…!
===
तर घटना अशी :-
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनच्या आवारात एक झाड होतं. ते नेमकं अशा जागी होतं की त्यामुळे इमारतीत येणं अवघड व्हायचं. या झाडामुळे जागेला कुंपण घालता येत नव्हतं.
झाड पाडलं तर कुंपण आणि प्रवेशद्वार अशा दोन्ही गोष्टी होणार होत्या पण नगरपालिका ते झाड पाडण्यास परवानगी देत नव्हती.
त्यावेळी शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. ते काही तरी करतील म्हणून पदाधिकारी त्यांच्याकडे गेले.
शंकरराव म्हणाले –
छे छे, हे बेकायदेशीर काम आहे. झाड नं पाडण्याचा नियम आहे, तो तोडता येणार नाही. नियम आहे, त्याचे पालन झाले पाहिजे.
झाड पाडता येणार नाही. मी यात मध्यस्ती करू शकत नाही. प्रवेशद्वार दुसरीकडे काढा…!”
पदाधिकार्यांनी त्यांना नकाशे दाखवले –
जी दहा फुट चिंचोळी जागा आहे तिच्या मध्यावरच हे झाड आहे, हे पाडले तरच कुंपण आणि प्रवेशद्वार बांधता येईल, अन्यथा खूप गैरसोय होईल
– हे शंकररावांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही ऐकूनच घेईनात.
बेकायदेशीर कामाला मी कधीही होकार देणार नाही असे ठणकावून सांगत त्यांनी पदाधिकार्यांना मार्गी लावले.
त्या दिवशी शरद पवार नेमके दिल्लीत होते. जिथे गृहमंत्री काही करू शकत नाहीत, तिथे दुसरं कुणी काही करेल याची काहीच शक्यता नव्हती.
तरी पदाधिकारी पवार साहेबांकडे गेले, त्यांना त्यांनी सगळे सांगितले. नगरपालिका झाड पाडू देत नाही, त्यांचा तसा नियम आहे हेही त्यांनी पवारसाहेबांना सांगितले.
हे ऐकून पवारसाहेब म्हणाले –
अरे जर पालिकेचा नियम आहे तर झाड पाडता येणार नाही. आणि मीही यात काही करू शकत नाही.
उलट माझा सल्ला आहे की हे झाड पाडू नका, त्याला पार घाला, खतपाणी घालून वाढवा. झाड ही नैसर्गिक संपत्ती आहे तिचे जतन करा.
मी सगळीकडे हेच सांगत असतो. पण लोक ऐकत नाहीत.”
हे बोलून साहेब थांबले नाहीत…!
साहेब पुढे म्हणाले :
“आमच्या बारामतीत तर काही लोक एकमेकांच्या बांधावरच्या झाडाच्या बुंध्यात मोरचुदाच्या पुड्या गाडतात. महिन्याभरात झाड मरते. मालकाला झाड का मेले, कुणी मारले ते जन्मात कळत नाही.
पण त्यामुळे किती नुकसान होते हे लोकांना कळत नाही. ती अडाणी आहेत. आपण शिकलेली माणसं आहात. तुम्ही झाड जपलं पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का?”
असे सुनावून, आलेल्यांना चहा पाणी देवून, साहेबांनी कटवले.
पदाधिकार्यांनी पवारसाहेबांचे बोल ध्यान देवून ऐकले होते. त्यांनी त्या झाडाला छानसा पार बांधला, त्याला ते रोज पाणी घालू लागले.
अर्थात पुढच्या एक महिन्यात ते झाड आपोआप मेले, पदाधिकार्यांनी पालिकेला कळवले, पालिकेची गाडी आली आणि ते मेलेले झाड त्यांनी काढून टाकले. जागा साफसूफ करून दिली.
पदाधिकाऱ्यांनी पवारसाहेबांच्या हस्ते भूमिपूजन करून कुंपणाची भिंत आणि प्रवेशद्वार बांधून काढले.
ह्या कथेत, शरद पवार कोण – झाडाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे खलनायक की पदाधिकार्यांचा खूप मोठा, जटील प्रश्न सोडवणारे चाणाक्ष नायक? याचे उत्तर तुम्हीच शोधा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.