Site icon InMarathi

शेअर बाजारात हमखास यश मिळवण्याचा कानमंत्र देतायेत नीरज बोरगांवकर!

futures and options IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

दिनांक – १६ मार्च २०२२

निफ्टी – 16,975.35 (+312.35)
सेन्सेक्स – 56,816.65 (+1039.80)
बॅंकनिफ्टी – 35,748.25 (+725.60)
गोल्ड – 52,725.00
यु एस डॉलर – 76.25

Nifty high low – 16,837.85 – 16,987.90

निफ्टीमधील टॉप गेनर्स – ULTRACEMCO , AXISBANK , BAJAJ-AUTO , INDUSINDBK , SHREECEM

निफ्टीमधील टॉप लूझर्स – CIPLA , SUNPHARMA , TATACONSUM

 

 

आजचा बुधवार बुल्सचा पलटवार :

सध्या शेअर मार्केटमध्ये रशिया युक्रेन काय भांडतील असे जबरदस्त युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु आहे बुल्स आणि बेअर्स या प्रवृत्तींमध्ये. बुल्स आणि बेअर्स या प्रवृत्ती काय असतात हे आप्ण मागील एका लेखामध्ये सविस्तर बघितलेले आहेच.

काल पंधरा मार्च रोजी बेअर्स, म्हणजेच मंदीवाल्या प्लेअर्सनी शेअर बाजार जोरात खाली पाडलेला आपण बघितले. परंतु आज सोळा मार्च या दिवशी सकाळीच बाजारामध्ये जोरदार गॅप-अप ओपनिंग बघायला मिळाले.

भारतीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आज सकाळी १६८५६ या पातळीच्या जवळ उघडला. आज दिवसभर बाजार तसा रेंज बाऊंड राहिलेला दिसून आला. शेवटच्या सत्रामध्ये म्हणजेच अगदी पावणेतीन वाजल्यानंतर बाजारामध्ये बुल्सनी पुन्हा एकदा जोर पकडलेला दिसून आला आणि १६९४० चा रेंज टॉप वरच्या दिशेने तोडत बाजार १६९६६ या लेव्हलच्या जवळ बंद झाला.

आजचा बाजार रेंज-बाऊंड असूनदेखील शेवटच्या अर्ध्या तासामध्ये आलेली तेजी थोडीशी महत्वाची वाटते. याचे कारण असे, की शेअर बाजाराने गेल्या पाच दिवसांच्या हायेस्ट किमतीच्या वर बंद दिलेला आहे.

आठ मार्च नंतरचा डेली कॅंडल्सचा चार्ट बघितला तर आपल्याला एक क्लासिक रिव्हर्सल फॉर्मेशन दिसून येते आणि आज शेवटच्या अर्ध्या तासामधील तेजीने हे रिव्हर्सल कन्फर्म केले आहे. याचा अर्थ इथुन पुढील काही काळ बाजार अजून तेजीमध्ये जाऊ शकतो.

 

 

१६८०० हा महत्वाचा रेझिस्टन्स तोडून बाजार वरच्या झोनमध्ये स्टेबल होईल असे संकेत आपल्याला चार्टवर दिसत आहेत. अश्याच प्रकारचे फॉर्मेशन निफ्टीच्या डेली चार्टवर २१ मे २०२१ या दिवशी दिसून आले होते. तसेच ५ ऑक्टोबर २०२१ या दिवशीदेखील आपल्याला असेच रिव्हर्सल दिसले होते.

फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये ज्या तेजीच्या स्ट्रॅटेजी असतात त्या करण्याकरिता हा उत्तम काळ असतो. फ्युचर्स आणि ऑप्शन्समधील काही तेजीच्या स्ट्रॅटेजीज्‌ची यादी खाली देत आहे

जुन्या जाणत्या लोकांनी कराव्यात अश्या पद्धती

– फ्युचर्स खरेदी करणे (मोठी रिस्क असणारी स्ट्रॅटेजी)
– कॉल ऑप्शन खरेदी करणे (लिमिटेड परंतु मोठी रिस्क असणारी स्ट्रॅटेजी)
– पुट ऑप्शन विकणे (मोठी रिस्क असणारी स्ट्रॅटेजी, ज्यांना समजत नाही त्यांनी करु नये)

नविन लोकांनी करण्याच्या स्ट्रॅटेजी
– बुल कॉल स्प्रेड (लिमिटेड रिस्क)
– बुल पुट स्प्रेड (लिमिटेड रिस्क)

शेअर मार्केट आणि फ्युचर्स व ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये रिस्क समाविष्ट असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर विषय व त्यामधील रिस्क समजून घेऊन मगच तो निर्णय घ्यावा.

 

 

शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते.

शेअर मार्केट व फ्युचर्स ऑप्शन्स यामध्ये विषय व्यवस्थित समजून कसा घ्यावा व यशस्वी काम कसे करावे हे तुम्हाला सांगण्याकरिता आज रात्री ९ वाजता एका विनामूल्य युट्यूब सेशनचे आयोजन केले आहे.

माझ्या “Neeraj Borgaonkar” या युट्यूब चॅनलवर आज रात्री ९ वाजता हा सेशन तुम्हाला बघता येईल नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube

सेशन नक्की बघा आणि कसा वाटला हे मला connect@guntavnook.com येथे ईमेल करुन जरुर कळवा!

 

अजून एक महत्वाचे

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता.

सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल –https://marathimarket.in/free-trial

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल.

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version