बुल्सना दिला बेअर्सनी झटका; शेअर बाजार डाऊनट्रेंडमध्ये असताना काय करावं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शेयर मार्केट म्हंटलं की अजूनही कित्येक लोकांच्या मनात जुगार किंवा सट्टाबाजार असंच चित्र निर्माण होतं. पण शेयर मार्केट म्हणजे “२५ दिवसांत पैसे डबल” अशी काही स्कीम नाहीये, शेयर मार्केटमधून पैसे कामवायचे असतील तर त्यासाठी बराच अभ्यास गरजेचा असतो.
शेयर मार्केटशी निगडीत अशीच काही माहिती आपण आजच्या लेखातून इन्वेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नीरज बोरगावकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!
युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.
आज नेमक्या मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या, कोणत्या शेयरने बाजी मारली, किंवा मंदी असूनही मार्केटमधून नेमका कसा नफा मिळवता येईल याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया नीरज बोरगांवकर यांच्याकडून!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
दिनांक – १५ मार्च २०२२
निफ्टी – 16,663.00 (-208.30)
सेन्सेक्स – 55,776.85 (-709.17)
बॅंकनिफ्टी – 35.022.65 (-289.50)
गोल्ड – 53,085.00
यु एस डॉलर – 76.58
Nifty High low – 16,555.00 – 16,927.75
निफ्टीमधील टॉप गेनर्स – TATACONSUM , M&M , CIPLA , SHREECEM , MARUTI
निफ्टीमधील टॉप लूझर्स – TATASTEEL , HINDALCO , ONGC , COALINDIA , JSWSTEEL
बुल्सना दिला बेअर्सनी झटका!
आज १५ मार्च रोजी झालेल्या ट्रेडिंगमध्ये तेजी करणार्या ट्रेडर्सना एक झटका बसलेला दिसून आला. गेले काही दिवस भारतीय शेअर बाजार हा एका डाऊनट्रेंडमध्ये गेलेला दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेली युद्धजन्य स्थिती, डॉलरसमोर सातत्यपूर्वक घसरणारा रुपया, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांद्वारे (FII) सुरु असलेली विक्री या सर्व कारणांमुळे आपल्या शेअर बाजारामध्ये हा डाऊनट्रेंड सुरु झालेला आहे.
८ मार्च या दिवसापासून बाजारामध्ये थोडेसे कव्हरिंग दिसून येत होते. या कव्हरिंगचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाचे म्हणजेच क्रूड ऑईलचे भडकलेले भाव थोडेसे खाली पडायला लागले.
यामुळे साहजिकपणे बुल्समधील आशेचा किरण जागृत झाला आणि शेअर बाजारामध्ये थोडीशी तेजी बघायला मिळाली. परंतु सध्याचा एकूण तांत्रिक कल हा नकारात्मक असल्यामुळे आजच्या सत्रामध्ये बुल्स आणि बेअर्सच्या या लढतीमध्ये बेअर्सनी, म्हणजेच मंदीवाल्या ट्रेडर्सनी बाजी मारली आणि शेअर बाजार (निफ्टी) सुमारे दोनशे पॉईंट्स खाली पडला.
—
- “इंट्राडे ट्रेडिंग: धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय” नीरज बोरगांवकरांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण!
- “इळा मोडून खिळा केला अन् पठ्ठे गडी खिळखिळा झाला!” नीरज बोरगांवकरांचा लाखमोलाचा सल्ला
—
आजच्या सत्रामध्ये सकाळी बाजार सुमारे १६९०० च्या पातळीजवळ उघडला. सुरुवातीचे तीन तास म्हणजेच सुमारे साडेबारा वाजेपर्यंत बाजार सुमारे १६९०० ते १६८०० एका रेंजमध्येच खेळत राहिला. परंतु साडेबारानंतर जेव्हा बाजाराने ही रेंज खालच्या दिशेने तोडली त्यानंतर मात्र बाजार जोरात खाली पडल्याचे दिसून आले.
अश्या पद्धतीच्या बाजारामध्ये O.R.B. अर्थात “ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट” ही स्ट्रॅटेजी अतिशय प्रभावी पद्धतीने वापरता येते आणि अतिशय उत्तम असे रिझल्ट्स मिळवता येतात. पुढील इमेजमध्ये तुम्हाला निफ्टीचा आजचा चार्ट व त्यामध्ये ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट कसा झाला हे बघता येईल!
ओपनिंग रेंज ब्रेक-आऊट ही स्ट्रॅटेजी कशी वापरावी हे मी माझ्या एका पूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित शिकवलेले आहे. पुढील लिंकवर हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल – https://youtu.be/Bqw2ELJLftU
शेअर मार्केटमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज् असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत.
गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करुन ठेवा.
गुंतवणूक कट्टा (नीरज बोरगांवकर) युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube
शेअर बाजारामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे.
पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial
फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल.
हे करीत असताना काही शंका आले तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.