Site icon InMarathi

शेतकरी ते एअर इंडियाचे नवीन अध्यक्ष, एन. चंद्रशेखरन यांची प्रेरणादायी कथा

n chnadra final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढतो. अनेक जण सरधोपट मार्गाने आयुष्य जगत असताना काही जण मात्र स्वप्न पाहतात आणि ते सत्यात उतरवून दाखवण्याची धमक स्वतःत ठेवतात. बऱ्याचदा माणसं ज्या क्षेत्रात नावलौकिक मिळवतात त्या क्षेत्राची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना नसते.

अनेकदा बिकट आर्थिक परिस्थिती, पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव, पुरेशा सोयीसुविधांचा अभाव अशा सगळ्यावर मात करत माणसं आपल्या धेय्यं गाठतात. आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आजवर अनेकांनी अशक्य वाटतील अशा अनेक गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत.

 

 

अशी माणसं प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरतातच मात्र गोष्टी सहज उपलब्ध झालेल्यांना अशी माणसं आत्मपरीक्षणही करायला भाग पाडतात.

शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीच करायची हा समज आजही आपल्याला खेडोपाडी पाहायला मिळतो. पण या समाजाला फाटा देत अनेक जण आपल्या करियरची स्वतंत्र वाट चोखंदळताना दिसतात, आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एन. चंद्रशेखर यांचा जन्मही एका शेतकरी कुटुंबात झाला होता. पण त्यांना कॉम्प्युटर प्रोग्रामिंग विषयी असलेल्या पॅशनने त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं. एअर इंडियाचे नवे अध्यक्ष झालेल्या एन चंद्रशेखरन यांचा आजवरचा प्रवास असाच प्रेरक आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा आहे. शेतकरी ते कॉर्पोरेट लिजेंड अशी उत्तुंग झेप घेतलेल्या एन चंद्रशेखरन यांच्याविषयी जाणून घेऊया.

 

 

सुरवात :

१९६३ साली तामिळ नाडूतील मोहनूर गावात एका शेतकरी कुटुंबात एन चंद्रशेखरन यांचा जन्म झाला. कुटुंबाचा शेती व्यवसाय पुढे चालवणं त्यांना अगदी सहज शक्य होतं. पण कॉम्प्युटर प्रोग्रॅमविषयी त्यांना असलेल्या पॅशनने एका वेगळ्याच मार्गावरून त्यांचा पुढे प्रवास झाला. ‘कोइंबतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मधून ‘ऍप्लाइड सायन्सेस’ या विषयात पदवीधर होण्याआधी राज्यातील एका सरकारी शाळेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.

 

 

ही डिग्री मिळवल्यावर ते आपल्या घरी परत आले आणि ६ महिने घरी राहून आपल्याला शेती करायला आवडतेय का आणि आपण याकडे आपला व्यवसाय म्हणून बघू शकतो का याचा अनुभव घेतला.

४-५ महिने झाल्यावर आपण शेती करण्यासाठी बनलेली नाही असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सीए व्हायचा विचार केला. पण तोपर्यंत दुर्दैवाने सीएसाठी त्या वर्षी ऍडमिशन घ्यायची वेळ निघून गेली होती.

त्यानंतर १९८६ साली त्यांनी तिरुचिरापल्लीच्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये मास्टर्स (एमसीए) केलं. ही गोष्ट आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरणार आहे याची त्यावेळी त्यांना अजिबातच कल्पना नव्हती. मास्टर्सच्या शेवटच्या वर्षी त्यांनी ‘टीसीएस’चा एक प्रकल्प हाती घेतला आणि आपलं मास्टर्स पूर्ण झाल्यावर ते १९८७ साली ‘टीसीएस’चे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.

टीसीएसमध्ये प्रवेश :

‘टीसीएस’ ने स्वतःला खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा एम्प्लॉयर म्हणून आणि भारतातली एक बहुमूल्य संस्था म्हणून स्थापित केलंय. सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर म्हणून सुरुवात केलेले एन चंद्रशेखरन या कंपनीत पुढची तब्बल दोन दशकं यशाच्या पायऱ्या चढत राहिले. त्यांच्या या कारकिर्दीत ते ‘आयटी’ व्यवसायाविषयी सगळं काही शिकले.

त्यांनी कधीही व्यवस्थापनाचं औपचारिक शिक्षण घेतलं नाही आणि व्यस्थापनाविषयीचं फारसं साहित्यदेखील वाचलं नाही. कामाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांनिमित्त ते वेगवेगळ्या ठिकाणी जात राहिले तिथेच ते टीम बिल्डिंग आणि ग्राहक व्यवस्थापनाविषयी शिकले. १९९९ साली त्यांनी फर्मचं इ-बिझनेस युनिट सुरू केलं. त्यांच्या नेतृत्त्वाखाली अवघ्या साडेचार वर्षात ५०० मिलियन डॉलर सेगमेंटपेक्षाही मोठं झालं.

 

इथेच त्यांचं ‘टीसीएस’चे तत्कालीन सीइओ आणि त्यांचे मार्गदर्शक असलेल्या एस. रामादोराई यांच्या दक्ष नजरेखाली ग्रूमिंग झालं. एस. रामदोराई यांच्याकडून त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या स्वतःच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे चंद्रशेखरन यांनी टीसीएसमध्ये फार झपाट्याने प्रगती केली.

सप्टेंबर २००७ मध्ये ते टीसीएसच्या बोर्डावर निवडले गेले आणि कंपनीचे ‘चीफ ऑपरेटिंग ऑफिसर’ (सीओओ) झाले. निर्धार आणि चिकाटीच्या जोरावर ते एस. रामदोराईंच्या पुढे जात २००९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात वयाच्या ४६ व्या वर्षी टीसीएसचे सीईओ आणि एमडी झाले. टाटा ग्रुप्सचे ते सगळ्यात तरुण सीईओ ठरले.

त्यांच्या ‘पर्सनल टच’मुळे त्यांचे कंपनीतल्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. त्यांचे मार्गदर्शक एस. रामादोराई एकदा म्हणाले होते की, “जागतिक दर्जाच्या टीम्स आणि व्हॅल्यू सिस्टिम्स तयार करण्याची क्षमता ही चंद्रशेखरन यांची सगळ्यात मोठी ताकद होती.” चंद्रशेखरन हे क्रिकेटचे चाहते आहेत आणि बऱ्याचदा ते टार्गेट्स सेट करताना क्रिकेटच्या टर्म्स आणि मेटाफर्स वापरतात.

 

 

सध्याच्या घडीला भारतीय मार्केटमध्ये टीसीएस ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात बहुमूल्य फर्म आहे. टाटा ग्रुप्समधल्या त्यांच्या दीर्घ कालावधीच्या करियरमुळे त्यांनी ‘बॉंबे हाऊस’ या टाटा ग्रुप्सच्या मुंबईतील हेडक्वार्टर्समध्ये ‘चंद्रा’ अशी ओळख कमावली. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी पारंपारिक चाकोरीपासून दूर जात वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्थापनाचे प्रयोग केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा ग्रुप्सने ‘एअर इंडिया’ हे आपलं माजी राष्ट्रीय वाहन विकत घेतल्यामुळे टाटा ग्रुप्सच्या विमानचालन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडला. एका छोट्या गावातून पुढे आलेल्या एन चन्द्रशेखरन यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

चंद्रशेखरन हे त्यांच्या दूरवर धावण्याच्या पॅशनमुळे आणि जगभरातल्या मॅरॅथॉन्स पूर्ण केल्यामुळे ते ‘मॅरेथॉन मॅन’ म्हणूनही ओळखले जातात. ते ‘आरबीआय’ बोर्डाचे सदस्य होते आणि त्यांनी NASSCOM चं अध्यक्षपदही भूषवलं आहे. भारताच्या युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स आणि जपान यांसारख्या देशांबरोबरच्या द्विपक्षीय फोरममध्ये ते सक्रिय सहभाग दर्शवत आले आहेत.

 

 

नटराजन चंद्रशेखरन यांना देशातल्या आणि जगभरातल्या बिझनेस कम्युनिटीजकडून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. याशिवाय, त्यांना व्यवसाय श्रेणीअंतर्गत २०१४ या वर्षीचे CNN-IBN Indian म्हणून पुरस्कार देण्यात आला. २०१५ च्या वार्षिक ‘ऑल एशिया एग्झिक्युटीव्ह टीम रँकिंग्ज’मध्ये त्यांना संस्थात्मक गुंतवणूकदाराकडून ‘सर्वोत्कृष्ट सीईओ’ साठी मत मिळालं होतं. ‘ET Corporate Excellence Awards 2016’ मध्ये डिसेंबर १७, २०१६ ला ते ‘बिझनेस लीडर ऑफ द इयर ऍवॉर्ड’ जिंकले.

आता त्यांच्या खांदयावर एअर इंडिआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने ते एअर इंडियाला पुन्हा एकदा अच्छे दिन आणतील अशी आशा आपण ठेवुयात.

कुठल्याही प्रकारचं अपयश पचवायची तयारी असलेल्या आणि तरीही ठाम उभं राहून आपण आपलं ध्येय्य साध्य करू असा पूर्ण विश्वास असलेल्या अनेक तरुणांसाठी एन चंद्रशेखरन यांचं नेतृत्त्व आणि मेहनत प्रेरणादायी ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version