आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया यूक्रेन हा वाद सध्या फारसा कुठे चर्चेत नसला तरी युद्ध अजूनही संपलेलं नाहीये, तिथली परिस्थिति अजून तशीच तणावाखाली आहे. यूक्रेन किंवा रशिया कुणीही माघार घ्यायला तयार नाहीये.
एकंदरच तिथली परिस्थिति आणि दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेलं वैमनस्य टोकाशी गेलं आहे आणि यामुळेच युद्ध हा शेवटचा पर्याय म्हणून अवलंबून रशियाने यूक्रेनला धडा शिकवायचा असं ठरवलं आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
यूक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्यावरुन हा वाद सुरू झाला आणि तो आता विकोपाला गेला आहे. बघायला गेलं तर नाटोमध्ये यूक्रेनला सामील केलं तर याचे दूरगामी परिणाम रशियाला भोगावे लागतील आणि म्हणूनच रशिया सुरुवातीपासून याविरोधात आहे!
खरंतर या सगळ्यात इतर देशांनीसुद्धा चर्चा करायचा प्रयत्न केला पण त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही. अमेरिका तर बाहेर बसून या सगळ्याची मजा अनुभवत आहे असंच चित्र निर्माण झालं आहे, नाटो मध्ये आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ असं म्हणत अमेरिका त्यांची नेहमीची तिरकस खेळी खेळत आहे!
रशियाने यूक्रेन आणि झेलेंस्कीबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या स्पष्ट करायच्या टाळल्या आहेत, पण आता हळूहळू यूक्रेनचीसुद्धा वेगळीच बाजू समोर यायला सुरुवात झाली आहे!
नुकतंच अमेरिकेच्या Under secretary Victoria Nuland यांनी खूप महत्वाची गोष्ट जगासमोर आणली आहे, त्यांच्या वक्तव्यानुसार यूक्रेनमध्ये सध्या अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे बायोवेपन्स बनवली जात आहे.
यूक्रेनमधल्या याच बायोवेपन्स बनवणाऱ्या लॅब स्वतःच्या अधिपत्याखाली आणायचा रशियाचा मनसुबा आहे तर ही बायोवेपन्स नष्ट झाली तरी चालतील पण ती रशियाच्या हाती लागू नयेत म्हणून अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, आणि म्हणूनच त्यांची अंडर सेक्रेटरी आत्ता बाहेर येऊन ही विधान करत आहे असं काही तज्ञांचं मत आहे.
चीनच्या वूहानप्रमाणेच यूक्रेनमध्ये सुद्धा बायोवेपन लिकेज झालं होतं ज्यात यूक्रेनचे २० पेक्षा जास्त सैनिक प्लेगमुळे मृत्यूमुखी पडले आणि ही गोष्ट यूक्रेनने साऱ्या जगापासून लपवून ठेवली होती असंदेखील काही राजकीय विश्लेषकांनी स्पष्ट केली!
या बायोवेपन्सचा वापर रशियाच्याच विरोधात केला जाणार आहे असा रशियाचा आरोप आहे त्यामुळेच रशियाने यूक्रेनविरुद्ध एवढे मोठे पाऊल उचलले आहे, कारण भविष्यात या बायोवेपन्स लॅबवर अमेरिका आणि यूक्रेन दोघांचं नियंत्रण आलं तर ते रशियासाठी धोकादायक असेल!
—
- “रशिया – युक्रेन युद्ध होणार आणि….” बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
- युक्रेन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे तिकडची आबालवृद्ध मंडळी!!
—
अमेरिकेच्या अंडर सेक्रेटरीकडून या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाल्यानेआंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. या बायोवेपन्स लॅब्स ओपन झाल्या तर याचा सर्वात जास्त धोका रशियाला आहे आणि म्हणूनच रशियाने यूक्रेनवर आक्रमण करत बरीचशी शहरं उध्वस्त केली आहेत.
बायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत असं काही तज्ञांचं मत आहे!
चीनमधल्या वूहानमधून सुरू झालेल्या कोविड १९ ने जगभरात काय हाहाकार माजवला हे आपण गेली २ वर्षं अनुभवत आहोत, आजही साऱ्या जगावर झालेला त्याचा परिणाम पाहता पुन्हा हे असं काही होऊ नये अशीच आपण आशा करतोय.
हीच गोष्ट रशियाच्यासुद्धा मनात आहे आणि म्हणूनच हे प्लांट नेस्तनाबूत करण्यासाठी पुतीन यांनी हा सगळा घाट घातला आहे असं म्हंटलं जात आहे. या सगळ्या गोष्टी अजून पुराव्यानिशी सिद्ध व्हायच्या आहेत, पण येणारा काळ हा आणखीन कठीण असणार आहे.
पुढील काळातील युद्ध ही रणभूमीवर शस्त्र घेऊन लढली जाणार नाहीत, तर यापुढील युद्ध हे bio-war असणार आहे, या स्टेटमेंटला या सगळ्या घटनांमुळे पुष्टी मिळतीये!
युद्धातून काहीच निष्पन्न होत नाही, उलट येणाऱ्या पिढीवर त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे हे सगळं विकोपाला जाण्याआधीच ही परिस्थिति बदलून दोन्ही देशांमध्ये शांती प्रस्थापित व्हावी अशीच आपण प्रार्थना करू शकतो!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.