आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सिनेमा समाजाच आरसा असतो, समाजातील अशा घटना ज्या कायमच दुर्लक्षित केल्या जातात अशा गोष्टीना न्यायालयात एकवेळ न्याय मिळाला तरी सिनेमा सारख्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी दिग्दर्शक नावाची व्यक्ती हा प्रयत्न करत असते.
झुंड सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीपासूनच बॉलीवूडमधील बड्या कलाकारांनी सिनेमाची स्तुती करायला सुरवात केली. सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला मात्र बॉक्स ऑफिसवर फारसा हा सिनेमा चालेला नाही. सिनेमाच कौतुक तर झालंच मात्र जुनाच एक वाद पुन्हा जन्माला आला तो म्हणजे जातीवाद, नागराज मंजुळे सारखा दिग्दर्शक केवळ जातीयवादावर आधारित सिनेमे बनवतो म्हणून अनेकांनी पाठ फिरवली.
झुंडचा वाद संपतो नाही तर आणखीन एका सिनेमाने सध्या वादाला पेव फुटले आहे तो सिनेमा म्हणजे काश्मीर फाईल्स, काश्मीरी पंडितांवर झालेल्या नरसंहारावर हा सिनेमा बेतलेला आहे. गेल्या वर्षभरापासून या सिनेमाची चर्चा सुरु होती. हा सिनेमा उजव्या विचारसरणीवर आधारित आहे म्हणून डाव्या विचारणसरणीच्या लोकांनी यावर बहिष्कार घातला, अशी सध्या चर्चा सुरु आहे.
खरं तर या सिनेमाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या विषयाला हात घातल्याने आता त्या विषय संदर्भातील गोष्टी समोर येत चालल्या आहेत. JKLF चा मोहरक्या यासिन मलिक आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एका फोटो सध्या चर्चेत आहे, नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
यासिन पंतप्रधान कनेक्शन :
यासिन मलिक याने रजत शर्मा यांच्या आप कि अदालत या कार्यक्रमादरम्यान असे सांगितले की, मनमोहन सिंग यांना पाकिस्तानी आर्मीशी चर्चा करण्याची इच्छा होती. यासिनच्या म्हणण्यानुसार मनमोहन सिंग यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद शांततेच्या मार्गाने सोडवायचा होता.
–
- The Kashmir Files – काश्मीरचं हे उघडं नागडं सत्य आपल्याला सुन्न करून सोडतं…
- काश्मिरी पंडितांचं दाहक वास्तव दाखवण्याचं धाडस आजवर सिनेइंडस्ट्रीने का केलं नाही?
–
तो पुढे असे म्हणाला की २००६ साली मी जेव्हा मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती तेव्हा त्यांना सांगितले की सरकारने दहशतवादाचा मुद्दा सैन्यासोबत शांततेने सोडवला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू, तसेच भारतीयासांठी काश्मीर मुकुट जरी असला तरी पाकिस्तानी जनतेसाठी तो रक्तवाहिनी आहे. आमच्या पार्टीचा एकच उद्देश आहे काश्मीर प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडवला गेला पाहिजे आणि आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
कोण आहे यासिन मलिक :
पाकिस्तान फुटीरवादी नेता अशी ओळख असलेला यासिन जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा माजी अध्यक्ष होता. त्याच्यावर काश्मीरमधील दहशतवादाला आर्थिक मदत केल्याचे आरोप देखील त्याच्यावर झाले आहेत. इतकेच नव्हे तर १९९० साली चार हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना मारण्याचे आरोप देखील त्याच्यावर करण्यात आले आहेत. काश्मिरी पंडितांना पळवून लावण्यात देखील त्याचा हात होता.
काश्मीर फाईल्स सिनेमा आला आणि त्या सिनेमाने पुन्हा एकदा देशातील वातावरण पुन्हा एकदा ढवळले गेले आहे, भाजप समर्थक आणि काँग्रेस समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अनेक भाजप समर्थकांनी हा फोटो व्हायरल त्यावर काँग्रेसकडे उत्तर मागत आहेत. माजी पंतप्रधानांनी पाकिस्तानी लष्कराशी चर्चा केली होती का याबाबत यासिनने कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही, मात्र काश्मीर फाइल्सवरून सुरु झालेल्या या वादाला आता नवे वळण मिळणार हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.