Site icon InMarathi

होळीलाच का पितात भांग? जाणून घ्या, नेमकं कनेक्शन

amitabh bachchan im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय परंपरा, सण समारंभ हे सामाजिक आपुलकी रुजवण्याचे आणि भावनिक जपणूकीचे उत्तम स्त्रोत आहेत. भारतात साजरे केले जाणारे वेगवेगळे सण हे नेहमीच कुठला तरी चांगला संदेश देत असतात. यामध्ये एक सण म्हणजे होळी.

होळीचे अनेक रंग आहेत. होळीचा दिवस, हा मोठ मोठ्या सार्वजनिक मेळाव्यांचा, सभांचा साक्षीदार असतो. होलिका दहनापासून या सणाची सुरुवात होते आणि दुसर्‍या दिवशी धुळवड साजरी करण्यात येते.

 

 

होळीच्या तीन दिवसांनंतर रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण हा असत्याचा सत्यावर, चांगल्याचा वाईटा वर होणारा विजय दर्शवण्यासाठी साजरा केला जातो.

होळीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोक जमतात, रंग खेळतात, पारंपरिक गाण्यांवर नाच करतात, अनेक स्वादिष्ट पदार्थ खातात, एकमेकांना शुभेच्छा देतात. हा आनंदोत्सव चालू ठेवण्यासाठी लोक अनेकदा ‘भांग सेवनाकडे’ कडे वळतात.

 

 

भांग आणि होळीचा संबंध हा पारंपरिक आहे. भांग ही भारतीय उपखंडातून उगम पावलेल्या अफू वनस्पतीच्या कळ्या आणि पानांपासून तयार केली जाते. शास्त्राप्रमाणे देशाच्या विविध प्रांतांमध्ये भांगेचा व्यापक वापर केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाशिवरात्र आणि होळीच्या वसंतोत्सवात भांग पारंपारिकपणे वाटली जाते. ग्रामीण भारतातील काही भागांमध्ये, लोक गांजाच्या वनस्पतीला विविध औषधी गुणधर्म देतात. भांग ताप, सनस्ट्रोक कमी करण्यास मदत करते, पचनास मदत करते, भूक वाढवते, शरीराला सतर्कता देते असे मानले जाते.भांगेचा सर्वात सामान्य वापर खसखस, बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या वापरून बनवलेल्या पेयाच्या स्वरूपात केला जातो.

भांगाचे धार्मिक महत्त्व

 

 

हिंदू मान्यतेनुसार, भांग ही वनस्पती भगवान शिवाशी संबंधित आहे. अशी आख्यायिका आहे, की एकदा भगवान शिवशंकर त्याच्या कुटुंबाशी भांडण झाल्यावर कुठे तरी निघून गेले. थकलेल्या शरीराने व निराशेने ते एका पानाच्या झाडाखाली झोपी गेले.

जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा कुतूहलाने व भूक लागल्याने त्या झाडाची पाने त्यांनी खाल्ली. झटपट टवटवीत झालेल्या, भगवान शंकरांनी त्या वनस्पतीला म्हणजे भांगेला आपले आवडते अन्न बनवले.

भांग सगळी बंधने दूर करून होळीचा उत्साही सण साजरा करणार्‍या जनसामान्यांचा उत्साह वाढवतो. अथर्ववेदामध्ये, भांगाच्या वनस्पतीचे वर्णन पृथ्वीवरील पाच सर्वात पवित्र वनस्पतींपैकी एक म्हणून केले आहे. त्याला “आनंदाचा स्रोत” किंवा “आनंद देणारा” असेही संबोधले जाते.

भांग कशी सेवन केली जाते?

 

हे सहसा दूध किंवा दही वापरुन बनवलेले पेय आहे, जे “भांग की थंडाई” किंवा “भांग की लस्सी” म्हणून प्रसिद्ध आहे. “भांग गोळी” देखील खातात.
होळी साजरी करण्यासाठी भारतात प्रवास करणारे पर्यटक देखील भांगच्या लोकप्रियतेपासून मुक्त नाहीत.

भांग लस्सी/थंडाई

“भांग लस्सी” किंवा कॅनॅबिस मिल्कशेक हा भांगेचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. थोडे दूध, दही, साखर आणि भरपूर ड्रायफ्रूट्स मिसळून ही भांग बनवली जाते.

भांग पकोडे

 

भांग पकोडे, आनंदाने भरलेल्या वातावरणात होळीचा सण साजरा करणाऱ्या लोकांचा उत्साह द्विगुणित करतात.

भांग गुजिया

गुजिया म्हणजे सुका मेव्याने भरलेले गोड पदार्थ. काही लोक त्या गोड गुजियामध्ये भांगेची गोळी घालतात.

जरी ही बहुउपयोगी वनस्पती रंगीबेरंगी उत्सवाचा अविभाज्य भाग म्हणून चाखली जात असली, तरीही भांगेचे मर्यादित सेवनच योग्य. भांगेला धार्मिक महत्त्व आहे आणि त्याचा आयुर्वेदात उल्लेख ही आहे, तरी याचा अर्थ ते औषध आहे असा होत नाही.

भांग मादक आहे आणि मज्जासंस्थेसाठी धोकादायक आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि ज्यांना आजार आहेत त्यांनी यापासून दूर राहावे आणि होळीमध्ये याचे सेवन करतांना अत्यंत सावधगिरी बाळगावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version