आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘हॅप्पी जर्नी’ या चित्रपटातला “अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय, हे मला लागतंच.” हा प्रिया बापटचा मजेशीर डायलॉग लोकांना फारच आवडला होता, पण आजच्या घडीला आणि आता लॉकडाऊननंतर तर निश्चितच ही वस्तुस्थिती आहे.
इंटरनेटशिवायच्या आयुष्याची आपल्यापैकी कुणी आता कल्पनाही करू शकणार नाही. तरुण, मध्यमवयीन आणि लहान मुलंच नाही तर आजीआजोबांची पिढीही या डिजिटल युगाला सरसावू लागली आहे. अभ्यासापासून ऑफिसच्या कामकाजापर्यंत सगळं काही आता इंटरनेटशिवाय अशक्य आहे.
पूर्वी संशोधन करताना माणसांना मोठमोठाल्या ग्रंथांचा आधार घ्यावा लागायचा, पण आज इंटरनेटमुळे संशोधकांसाठी संशोधन करणंही तुलनेने सोपं झालंय. आपल्यातल्या बहुतेकांकडे घरी आणि ऑफिसेसमध्येही हल्ली वायफाय असतं. ही सोय ज्यांच्याकडे नाही ते आणि ही सोय असलेले आपणही आपल्या मोबाईलमध्ये नेटपॅकही टाकतो.
आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गरीब आणि मध्यमवर्गीय स्तरातले लोक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि इंटरनेट तर सगळ्यांनाच लागतं त्यामुळे कुठल्या कंपनीकडून आपल्याला स्वस्त आणि मस्त इंटरनेट मिळेल हे आपण कायमच बघत आलेलो आहोत. आता जरी जिओने आपल्या दरांमध्ये वाढ केली असली, तरी बराच काळ जिओची आपल्यावर कृपा होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
एका अहवालानुसार, भारतात जवळपास ६२ कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करतात. २०२५ पर्यंत ही संख्या ९० कोटींच्याही वर जाईल.
इतक्या मोठ्या संख्येच्या लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचवण्याची जबाबदारी इंटरनेटची सोय पुरवणाऱ्या कंपन्यांवर आहे. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या किंमतीत जगभरात इंटरनेटची सोय देतात.
काही देशांमध्ये इंटरनेट खूप स्वस्त दरात मिळतं तर काही देशांमध्ये ते प्रचंड महाग मिळतं. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडकरता महिन्याभरासाठी लोकांना किती इंटरनेट चार्जेस भरावे लागतात हे जाणून घेऊया.
१. रुस – रुसमध्ये इंटरनेट सगळ्यात स्वस्त आहे. इथे आपल्याला १०० एमबीपीएस स्पीडसाठी महिन्याला जवळपास ३४७ रुपये भरावे लागतील.
२. तुर्की – तुर्कीमध्ये तुम्हाला या प्लॅनसाठी सुमारे ७०० रुपये द्यावे लागतील.
३. भारत – भारतात हा प्लॅन तुम्हाला जवळपास ८०० रुपयांना मिळेल.
४. चीन – चीनमध्ये इतक्या स्पीडच्या इंटरनेटसाठी जवळपास ११०० रुपये द्यावे लागतील.
५. श्रीलंका – श्रीलंकेत हाच प्लॅन १२०० रुपयांपर्यंत मिळेल.
६. पाकिस्तान – पाकिस्तानात या प्लॅनसाठी १५५० रुपये चुकवावे लागतील.
७. फ्रांस – फ्रांसमध्ये २४०० रुपयांपर्यंत तुम्हाला हा प्लॅन मिळेल.
८. बांग्लादेश – बांग्लादेश मध्ये यासाठी जवळपास २६०० रुपये चुकवावे लागतील.
९. यु. के. – यु. के. मध्ये तुम्हाला जवळपास ३१०० रुपयांत अनलिमिटेड डाटा मिळेल.
१०. जपान – जपान मध्ये याची किंमत जवळपास ३२०० रुपये आहे.
११. दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेत याची किंमत जवळपास ४२०० रुपये आहे.
१२. ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलिया मध्ये याच प्लॅनसाठी ४३०० रुपये चुकवावे लागतील.
१३. स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडमध्ये महिन्याला तुम्हाला यासाठी ४७०० रुपये द्यावे लागतील.
१४. कॅनडा – कॅनडामध्ये याची किंमत ४८०० रुपये आहे.
१५. अमेरिका – अमेरिकेत इंटरनेट कंपन्या ५००० रुपये चार्ज करतात.
—
- इंटरनेटमुळे निर्माण होणाऱ्या “कुकी” फाइल्समुळे नेमकं काय होतं?
- इंटरनेट वापरताना ‘वाय-फाय राऊटरचा’ स्पीड वाढवण्यासाठी “या” सोप्या टिप्स वाचाच
—
१६. सौदी अरब – सौदी अरब मध्ये ५४०० रुपयांमध्ये हा प्लॅन मिळेल.
१७. ओमान – ओमान मध्ये याकरता ५९०० रुपये द्यावे लागतील.
१८. कतर – कतर मध्ये याच प्लॅनसाठी ७००० रुपये चुकवावे लागतील.
१९. संयुक्त अरब अमीरात – संयुक्त अरब अमीरात मध्ये याकरता जवळपास ७५०० रुपये द्यावे लागतील.
२०. इथियोपिया – इथियोपिया मध्ये इंटरनेटचे महिन्याभराचे चार्जेस सर्वाधिक आहेत. इथे आपल्याला जवळपास २८,००० रुपये द्यावे लागतील.
इंटरनेटच्या या दरांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनुसार आणि टॅक्सनुसार थोडाबहुत फरक पडतो. मात्र साधारणपणे सगळ्यांची किंमत हीच आहे.
प्रत्येक देशानुसार देशाची आर्थिक स्थिती, तिथलं वार्षिक बजेट आणि तिथे राहणाऱ्या नागरिकांचा सरासरी आर्थिक स्तर या गोष्टी वेगवेगळ्या असतात.
भारतात गरिबांची आणि मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असल्यामुळे आपण आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला परवडेल त्या भावाच्या आणि दर्जाच्या गोष्टी खरेदी करतो. इंटरनेट किती महागलंय असं आपण अनेकदा ऐकतो, पण अजूनतरी आपल्या देशात “इंटरनेट परवडत नाहीये हो”अशी रड सुदैवाने ऐकायला मिळालेली नाही.
बाकी देशांमध्येही कमी-अधिक संख्येने गरीब आणि मध्यमवर्गीय जनता असणारच आहे. त्यामुळे भारतासकट जगातल्या बाकी देशांमध्येही इंटरनेटचे चार्जेस भरण्याची लोकांची कायम ऐपत असूदे हीच अपेक्षा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.