' “इळा मोडून खिळा केला अन्‌ पठ्ठे गडी खिळखिळा झाला!” नीरज बोरगांवकरांचा लाखमोलाचा सल्ला – InMarathi

“इळा मोडून खिळा केला अन्‌ पठ्ठे गडी खिळखिळा झाला!” नीरज बोरगांवकरांचा लाखमोलाचा सल्ला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर यांच्याकडून आपण रोज शेयर मार्केटविषयी नवनवीन माहीती जाणून घेत असतो,  बोरगांवकर हे गेली २० वर्षं या क्षेत्रात कार्यरत असून, सहज सोप्प्या मराठी भाषेतून ते लोकांना शेयर मार्केटविषयी मौलिक मार्गदर्शन करत असतात!

युट्यूब तसेच फेसबुक या प्लॅटफॉर्मवर ‘गुंतवणूक कट्टा’च्या माध्यमातून ते पोर्टफोलियो बिल्डिंगविषयीसुद्धा मार्गदर्शन करतात.

 

neeraj borgaonkar IM

 

आज एका अशाच रंजक विषयावर नीरज बोरगांवकर यांच्या सोप्या भाषेतून मार्केटबद्दल उपयुक्त माहिती रंजक पद्धतीने जाणून घ्यायचा प्रयत्न करुयात, तत्पूर्वी आपण आजचे मार्केट अपडेट नेमके काय आहेत ते जाणून घेऊ!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दिनांक – १४ मार्च २०२२

निफ्टी – 16,871.30 (+240.85)
सेन्सेक्स – 56,486.02 (+935.72)
बॅंकनिफ्टी – 35312.15 (+765.90)
गोल्ड – 53,625.00
यु एस डॉलर – 76.50

Nifty High low – 16,606.50 – 16,887.95

निफ्टीमधील टॉप गेनर्स – INFY , HDFCBANK , SBIN , AXISBANK , ICICIBANK

निफ्टीमधील टॉप लूझर्स – IOC , ONGC , HINDUNILVR , TATAMOTORS , HDFCLIFE

मार्केट ट्रेंड म्हणजे काय आणि मंदीमध्ये नेमकं मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करावी? त्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी बोरगांवकर यांचं विश्लेषण जाणून घेऊयात!

 

nifty charts IM

गावाकडे एक म्हण आहे – “विळा मोडून खिळा करणे!” या म्हणीचा अर्थ असा आहे, की एखाद्या क्षुल्लक लाभासाठी आपल्याजवळील मोठ्या किमतीची एखादी गोष्ट सोडून देणे. लहान खिळा तयार करण्यासाठी आपल्याजवळील विळा मोडणे!

आजच्या आपल्या लेखामध्ये आपण शेअर मार्केटमधील अश्याच एका परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत. सध्या युद्ध आणि इतर आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आपला शेअर बाजार खाली कोसळत आहे. सध्याचा शेअर बाजाराचा ग्राफ जर लक्ष देऊन बघितला तर यामध्ये आपल्याला बर्‍याच गोष्टी समजून येतात.

सर्वप्रथम आपण ट्रेंड्स (मराठीमध्ये “कल”) म्हणजे काय हे समजून घेऊयात. शेअर बाजारामध्ये नेहमी काही ठराविक कल किंवा ट्रेंड्स बघायला मिळतात. या ट्रेंड्सचे तीन प्रकार आहेत- अपट्रेंड, डाऊनट्रेंड आणि साईडवेज्‌ ट्रेंड. शेअर बाजार एका दिशेने कधीच जात नसतो. शेअर बाजार वर जातानादेखील काही दिवस खाली पडतो, पुन्हा सावरतो आणि वर खाली वर खाली अश्या “झिग-झॅग” पॅटर्नमध्ये चालत असतो.

जेव्हा बाजारामध्ये “हायर टॉप हायर बॉटम” दिसतात तेव्हा आपण समजायचे की बाजार “अप”ट्रेंडमध्ये आहे. जेव्हा बाजारामध्ये “लोवर टॉप लोवर बॉटम” दिसतात तेव्हा आपण समजायचे की बाजार सध्या “डाऊन”ट्रेंडमध्ये आहे. आणि बाजार जेव्हा एका “रेंज”मध्येच खेळत राहतो जिथे टॉप आणि बॉट्म आहेत तेच वारंवार दिसतात तेव्हा आपण समजायचे की बाजार सध्या “साईडवेज्‌” ट्रेंडमध्ये आहे.

 

trends market 2 IM

 

कुठल्याही शेअरच्या किंवा निर्देशांकाच्या चार्टवर आपण साधी नजर टाकली तरी हे आपल्याला समजू शकते की सध्याचा बाजाराचा कल काय सुरु आहे. सध्याचा निफ्टीचा कल नीट बघितला तर आपल्याला हे दिसून येईल की बाजारामध्ये सध्या एक डाऊनट्रेंड सुरु आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर थोडीशी अस्थिरता आहे तसेच संस्थात्मक गुंतवणूकदार आपल्या बाजारामधून पैसे काढून घेत आहेत. यामुळे आपल्या रिटेल गुंतवणूकदारांमध्येदेखील काळजीचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.

अश्या परिथितीमध्ये जो दीर्घकालीन गुंतवणूकदार असतो तो थोडासा विचलीत होतो आणि त्याला असे वाटू लागते की आपल्याकडील दीर्घकालीन उद्देशाने घेतलेले म्युच्युअल फंड्स, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आत्ता विकून टाकावेत. तसेच आपली एसआयपी सध्या थांबवावी. परंतु हा एक मोठा सापळा असतो हे लक्षात घ्या.

आपल्याला अश्या नकारात्मक वातावरणामध्ये नेहमीच असे वाटते की आहे ती गुंतवणूक काढून घ्या, लवकरच खालच्या रेटमध्ये पुन्हा हे शेअर्स मिळतील आणि आपल्याला फायदा होईल.

पण हे वर उल्लेख केल्याप्रमाणे विळा मोडून खिळा करण्यासारखे आहे. शेअर बाजाराचा इतिहास आहे, शेअर बाजार कायम खाली कधीच रहात नसतो. मंदी आली की त्यानंतर तेजी येतेच येते. आणि तेजी येताना अशी तेजी येते की जेवत असू तर तोंड धुवायलादेखील वेळ मिळत नाही. आणि अश्या जबरदस्त तेजीमध्ये आपण विकलेले शेअर्स पुन्हा आहे त्या भावामध्ये कधीच मिळत नाहीत.

२०२० मधील करोना मंदीनंतरची तेजी पहा, २००८ च्या मंदीनंतरची तेजी पहा, २००१ च्या केतन पारेख स्कॅम आणि आयटी बबल मंदीनंतर आलेली तेजी पहा, अजून मागे जाऊन हर्षद मेहता स्कॅमनंतर १९९२ मध्ये बाजार जो कोसळला त्यानंतरची तेजी पहा!

 

harshad mehta inmarathi

 

या सर्व तेजींमध्ये शेअर बाजाराने मागील मंदी अगदी कमी काळात धुवून टाकली आणि जोरात उसळी मारत शेअर बाजार वर गेलेला आपल्याला दिसून येतो. पण आम्ही या सगळ्या अनुभवामधून काय शिकलो? जरासा बाजार खाली पडला की लगेच कर एसआयपी बंद!, विकून टाक चांगले शेअर्स. शेअर बाजारामध्ये असे कमकुवत धोरण उपयोगी नसते.

मंदीला आपण संधी मानले पाहिजे आणि अश्या वेळी आपण उलट आपली गुंतवणूक वाढवली पाहिजे. शेअर बाजारामध्ये काम सुरु करतानाच आपल्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग असणे अतिशय गरजेचे आहे. या प्लॅनिंगमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असणे अतिशय आवश्यक आहे

१ – शेअर बाजारामध्ये मी गुंतवलेले पैसे जर काही काळ अडकले, तर माझ्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होईल? आणि हा परिणाम होऊ नये याची तरतूद सर्वप्रथम केली गेली पाहिजे
२ – शेअर बाजारामध्ये काम करण्याची सुरुवात केल्यावर माझ्या एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के रक्कम ही दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी असेल?
३ – शेअर बाजारामध्ये काम करण्याची सुरुवात केल्यावर माझ्या एकूण गुंतवणुकीपैकी किती टक्के रक्कम ही ट्रेडिंगसाठी असेल?

या तीन गोष्टींची दखल जर सुरुवातीलाच व्यवस्थित घेतली गेली तर आपला शेअर मार्केटमधला प्रवास अतिशय सुकर होतो आणि यामध्ये आपल्याला फायदे दिसू लागतात.

शेअर मार्केटमधील या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित शिकता याव्यात याकरिता गुंतवणूक कट्ट्याद्वारे “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” हा एक ऑनलाईन कोर्स चालवला जातो. सुमारे एकवीस हजारांहून अधिक मराठी व्यक्ती या कोर्समध्ये व्यवस्थित प्रशिक्षण घेत आहेत आणि आपला पोर्टफोलिओ शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करीत आहेत.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

हा एक लाईफटाईम अ‍ॅक्सेस असलेला कोर्स असून याची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यासाठी एका विनामूल्य वेबिनारचे आयोजन केले आहे.

पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला वेबिनारची वेळ आणि डीटेल्स दिसतील – https://marathimarket.in/register

शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आज असंख्य टूल्स उपलब्ध आहे. पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन हेदेखील असेल एक युनिक आणि उपयुक्त टूल आहे त्याची माहिती जरुर घ्या. इतर कोणत्याही शंकेकरिता आम्हाला connect@guntavnook.com येथे ईमेल करा. चोवीस तासांमध्ये तुमच्या ईमेलला उत्तर दिले जाईल.

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?