Site icon InMarathi

कितीही टीका करा, मोदी-शहांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेला काँग्रेसकडे उत्तर नाही

bjp final im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘आधी देश, मग पार्टी आणि नंतर मी’ या प्रणालीवर भाजप पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते काम करताना दिसून येतात. नुकतंच पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला ४ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळाले असून, पंजाबसारख्या राज्यात आपने बाजी मारली आहे.

गेल्या वर्षभरापासून निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. एकीकडे कोरोनासारख्या विषाणूच्या लाटेने केवळ देशातच नव्हे तर जगभरात थैमान घातले होते. निवडणुका जशा जवळ येत गेल्या तशा निवडणुकांचे काम पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सुरु झाले होते.

 

asiadialogue.com

 

निवडणुका जिंकायच्या तर त्यासाठी पक्ष बांधणी, कार्यकर्त्यांची जमवाजमव, सभा घेणे, केलेल्या कामांचा आढावा घेणे, विरोधी पक्षाच्या डावपेचांवर लक्ष ठेवणे, अशा अनेक गोष्टी पक्ष श्रेष्ठींना लक्षात  लागतात. भाजपकडून निवडणुकांच्या कार्यक्रमांमध्ये जितका जोर दिसला तितका काँग्रेसकडून दिसला नाही, त्यांच्या हक्काच्या असलेल्या उत्तर प्रदेशात त्यांना अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत.

भाजपच्या या यशामागे अनेक कारणे आहेत, मात्र काँग्रेसने मोदी लाटेपासून सातत्याने पराभवाच्या छायेत आहे. यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे नेतृत्वाचा अभाव. आज ज्या सोनिया गांधींच्या इशाऱयांवर पक्ष चालत होता त्याचा पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे, यामागे काय कारणे आहेत, जाणून घेऊयात…

 

 

२४*७ राजकरण :

मोदींच्या कामाबद्दल त्यांच्या दौऱयावरून कायमच त्यांची टिंगल केली जाते, मात्र काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार मोदी शहा यांच्या कामाची , २४ *७ राजकारणाची आणि ऊर्जेची तुलना कोणत्याच काँग्रेसच्या नेतृत्वाशी करता येणार नाही. भाजपने केलेल्या कामाच्या सातत्याने उत्तर प्रदेशात तब्बल ३७ वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती दोनदा बसवली जात आहे.

 

 

भाजपच्या नेत्यांची फळी :

आज भाजप म्हंटल की फक्त दोन चेहरे समोर येतात ते म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी, या जोडगळीची चर्चा सतत होत असते. पंतप्रधान आणि गृहमंत्री अशी पदं भूषविणारे हे दोघे राजकरणात डावपेचांमध्ये आणि माणसांची पारख करण्यात तितकेच तरबेज आहेत. हेमंत बिस्वा, देवेंद्र फडणवीस, योगी यासारख्या नेत्यांच्या खांदयावर निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आली होती.

 

 

गोवा, मणिपूरसारख्या राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आल्याने भाजपमधील पुढच्या फळीतील नेत्यांची चर्चा आहे, तर दुसरीकडे प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी घेतली होती मात्र त्यांना अपयशच पदरी पडले.

कामाचा सपाटा :

काँग्रेसचे नेतेमंडळी केवळ ट्विटर आणि सोशल मीडियावर अवलंबून आहेत तिथे भाजपने आपल्या आयटी सेल्सच्या बरोबरीने तळागाळात जाऊन कामाचा देखील सपाटा लावला होता. प्रचंड ऊर्जा, भेदक राजकारण आणि विकासाचा सपाटा या जोरावर भाजपने काँग्रेसला मागे टाकले.

 

पक्षासाठी नेतेमंडळींकडे वेळ नाही :

आज भारतात अनेक पक्ष आहेत ज्यात कार्यकर्ते दिवसंरात्र पक्षासाठी काम करत असतात, अनेक पक्षांमध्ये ही ओरड कायम असते ती म्हणजे वरिष्ठ नेतेमंडळींना पक्षसाठी वेळ नाही. आज काँग्रेसकडे प्रमुख चेहराच नाही, राहुल गांधी यांची कायमच टिंगल केली जाते. भाजपचे जे. पी नड्डा,नरेंद्र मोदी ही मंडळी कायमच पक्षाचा विचार करत असतात. त्यासाठी प्रसंगी एकही सुट्टी न घेता, अथक परिश्रम घेऊन वेळोवेळी तळागाळातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतात.

 

 

कमकुवत आणि उदासीन नेतृत्वामुळे बिघडलेल्या काँग्रेसह्या तुलनेत भाजप मात्र चांगलीच कार्यक्षम झाली आहे. यंदाच्या निवडणुका तर झाल्या मात्र पुढच्या वर्षी राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांसाठी जर गड राखायचा असेल तर काँग्रेसला चांगलीच कंबर कसावी लागेल अन्यथा या देशातूनच काँग्रेस हद्दपार होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version