' या गोष्टीने बदललं नशीब, ५ वर्षाच्या मुलाला मिळताहेत खुद्द सचिनकडून क्रिकेटचे धडे – InMarathi

या गोष्टीने बदललं नशीब, ५ वर्षाच्या मुलाला मिळताहेत खुद्द सचिनकडून क्रिकेटचे धडे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सचिनचं क्रिकेटवरील प्रेम, त्याची खेळाप्रती असलेली श्रद्धा, त्याचं समर्पण, नव्या पिढीला क्रिकेटमध्ये अधिकाधिक यश मिळावं, त्यांचं क्रिकेट खेळण्याचं, भारतीय संघात स्थान मिळवण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी त्याच्या मनात असलेले भाव आणि नव्या पिढीला त्याने सातत्याने मार्गदर्शन करणं; अशा सगळ्याच गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत.

झहीर खानसारखा रिव्हर्स स्विंग करणारा बॉलर भारताला लाभला, धोनीसारखं थंड डोक्याचं आणि दमदार नेतृत्व भारतीय क्रिकेटला मिळालं, जसप्रीत बुमरासारखा यॉर्कर किंग आधी मुंबई इंडियन्सच्या आणि मग भारतीय संघाच्या ताफ्यात सामील झाला, यामागे सचिन तेंडुलकरचं डोकं होतं हेदेखील आपल्याला सगळयांना ठाऊक आहे.

 

sachin tendulkar featured inmarathi

 

स्वतः एक उत्तम क्रिकेटर असणारा सचिन, इतर खेळाडूंमधील टॅलेंट ओळखण्यात कुठेही मागे नसतो, असं म्हटलं तरी ते अजिबातच चुकीचं ठरणार नाही.

क्रिकेटवरील त्याची निस्सीम भक्ती, त्याचं अखंड प्रेम त्याच्या वागण्याबोलण्यातून नेहमीच लक्षात येतं. अशीच एक घटना सध्या घडली आहे. सचिनने एकाच नव्या खेळाडूचं टॅलेंट पाहून, त्याच्यातील क्षमता ओळखून उचललेलं पाऊल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हायरल व्हिडिओची कमाल

१०-१५ दिवसांपूर्वीची गोष्ट, ५ वर्षांचा एक मुलगा त्याच्या उत्तम बॅटिंगची झलक दिसली म्हणून सोशल मीडियावर चर्चेत होता. एस के शाहिद असं नाव असलेल्या या मुलाचा नेट प्रॅक्टिस करतानाच व्हिडिओ त्याच्या वडिलांना तयार केला. आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी हा व्हिडिओ इंटरनेटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचं ठरवलं, आणि तो फारच व्हायरल झाला.

 

s k shahid im

 

हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, की क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनने सुद्धा शाहिदची ही प्रॅक्टिस सोशल मीडियावर पाहिली. त्याची फलंदाजी बघून सचिन प्रभावित झाला आणि हा व्हिडिओ शाहिदच्या आयुष्याला कलाटणी देणारा व्हिडिओ ठरला.

सचिनने चक्क या पाच वर्षाच्या मुलाला, मिडलसेक्स ग्लोबल क्रिकेट अकादमीमध्ये बोलवून घेतलं. ५ दिवस या लहानग्याला सचिनकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभलं.

 

sachin tendulkar im

 

शाहिदचे वडील…

लहानग्या शाहिदचे वडील हे एका केशकर्तनालयात कामाला आहेत. त्याच्या वडिलांचा मुलाला पूर्ण पाठिंबा आहे. व्हिडिओची ही खटपट नेहमीच सुरु असते.

मागच्या महिन्यात सुद्धा शाहिदच्या अशाच एका व्हिडिओची दखल जगभरातून घेण्यात आली होती. दिवंगत फिरकी जादूगार शेन वॉर्नने सुद्धा शाहिदच्या फलंदाजीचं कौतुक केलेलं आहे.

सचिनचा आदर्श

sachin tendulkar im1

 

प्रत्येकच युवा आणि होतकरू खेळाडूप्रमाणे शाहिदचा आदर्श सुद्धा सचिन तेंडुलकर हाच आहे. त्यामुळेच सचिनने केलेलं मार्गदर्शन ही शाहिदसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. सचिनच्या एका फॅन पेजने या व्हिडिओमध्ये सचिन, मायकल वॉन सारख्या दिग्गजांना टॅग केलं आणि म्हणूनच सचिनच्या टीमच्या पाहण्यात हा व्हिडिओ आला.

क्रिकेट हेच आयुष्य असणाऱ्या सचिनने मात्र उत्तम फलंदाज असणाऱ्या या खेळाडूसाठी लगेचच छान काम केल्याचं पाहायला मिळतंय.

सचिनचं मार्गदर्शन आणि त्याने सांगितलेली दिनचर्या यापुढे आचरणात आणणार असल्याचं शाहिदच्या वडिलांनी सांगितलेलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?