Site icon InMarathi

“सर्दी खोकला झालाय, घे एक ६० चा पेग” मित्रांकडून मिळणारा हा सल्ला कितपत योग्य आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सहसा आपल्याला सर्दी, खोकला झाला की आपले मित्र एकच सल्ला देतात,” थोडी ६० घे बरा होशील!” पण हा सल्ला खरंच तितका उपयुक्त आहे का? असं ६० चा पेग घेऊन खरंच सर्दी, खोकला बरा होतो का?

दारूचे फायदे आणि तोटे असे दोन्ही आहेत. फायदा असा की दारु आपल्या शरीराला उष्ण ठेवते आणि त्यामुळे सर्दी खोकला नाहीसा होऊ शकतो!

 

 

आपण जसे अनेक वेळा वाचतोच तसे दारूचे दुष्परिणाम ही आहेत पण गरम पाणी आणि दारू असे सेवन केल्यास ते गुणकारीही ठरू शकते. लहान बाळाला देखील सर्दी झाल्यावर थोडी डॉक्टर्स ब्रॅण्डी पाजतात. कुठलंही पेय प्रमाणात प्यायलं तरच उपयुक्त असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या लेखाचा उद्देश दारूचे समर्थन करण्याचा नाही, पण खरंच दारू ही या गोष्टीवर गुणकारी ठरू शकते का ही जाणून घेण्यासाठी हा आढावा घेतला असून, दारूचे अतिसेवन हे घातकच आहे, याबद्दल काहीच दुमत नाही.

चला तर याबद्दल आणखीन विस्तृत माहिती जाणून घेऊयात!

१) गरम पाणी, व्हिस्की व लिंबुमिश्रित मादक पेय –

 

 

एका ग्लासात ३० मिली. whisky, १ ते २ चमचे मध आणि ३ लिंबांचा रस असं मिश्रण तयार करावं. २४० मिली. पाणी उकळून त्यात ८ ते १० लिंबाच्या चकत्या घालाव्यात. मध आणि लिंबू ह्यात प्रतिजैविक घटक असतात व त्याने तुमची पचनक्रिया देखील सुलभ होते.

२) आलं – लिंबू – मध आणि थोडीशी व्हिस्की –

 

 

२ ते ४ आल्याचे छोटे तुकडे बारीक चिरून २४० मिली. पाण्यात उकळून घ्यावे, त्यात थोडा मध आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण तयार करावे. एका ग्लासात ३० मिली. व्हिस्की घेऊन त्यात हे मिश्रण घालून हे पेय गरमच प्यावे.

३) बर्बन चे कफ सिरप –

 

 

तुमच्या घश्यात खवखव असेल आणि घसा दुखत असेल तर हे पेय घेऊ शकता.

६० मिली. बर्बन आणि त्यात एक लिंबू पिळून घ्यावं आणि ४५ सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून कोमट प्यावे. हे पेय पाण्यातून घ्यायचे असल्यास त्यात ६० ते १२० मिली पाणी मिसळून घ्यावं. एका ग्लासापेक्षा जास्तं हे पेय घेऊ नये.

४) जेलिक पंच –

 

 

६ लिंबांची साले किसून त्यात ३/४ कप साखर घालावी. १ ते २ तास थांबून हे मिश्रण २४० मिली. पाण्यात उकळून घ्यावं, साखर पूर्ण विरघळू द्यावी. संपूर्ण मिश्रण गाळून त्यात ७५० मिली व्हिस्की घ्यावी. शेवटी त्यात अजून ४ कप पाणी मिसळून त्यावर थोडं जायफळ घालून ३ ते ४ लिंबाचे काप घालावेत व हे मिश्रण गरम पिऊ शकता.

ही झाली वेगळ्या तऱ्हेची पेय पण दारू आणि चहा हे देखील एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.

१) ताडी चहा –

 

 

ताडी ही चहाच्या रुपात देखील बाजारात मिळते. हा चहा बनवण्यासाठी २४० मिली पाण्यात अर्ध आलं किसून घ्यावं, ३ लवंग, १ दालचिनी कांडी आणि २ बॅग्स ग्रीन टी किंवा ऑरेंज टी घ्यावा व ५ मिंटांनी टी बॅग्स काढून घ्याव्यात.

२) व्हिस्की चहा –

 

 

आपला पारंपारिक चहा आणि व्हिस्की हे एक उत्तम मिश्रण आहे. लवंग पूड, थोडं आलं आणि २ ते ३ वेलची (बिया काढून), २० मिरी दाणे, थोडं जायफळ आणि दालचिनी पूड दूधात घालून १० मिनिटे हा चहा उकळून घ्यावा.

१० मिनिटांनी हे मिश्रण गाळून घ्यावं, ९० मिली व्हिस्की मध्ये हे मिश्रण घालावं. हा व्हिस्की चहा गरमच प्यायचा असतो.

दारू आणि चहा किंवा वरील कोणतीही पेय घेताना आपल्या तब्येतीला काय चालणार आहे हे लक्षात ठेऊनच त्याचं सेवन करावं. कितीही गुणकारी असली तरीही दारू ही तुमची पचनक्रिया शमवणारी आहे. व्हिस्की चहा उपयुक्त असला तरीही डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा. औषधाला प्रथम प्राधान्य द्यावे.

 

 

दारूमुळे शरीरातले पाणी कमी होऊन dehydration होण्याची शक्यता असते. शिवाय किडनीचे आजार उद्भवू शकतात, कॅन्सरसारखे गंभीर आजारसुद्धा दारुमुळे होऊ शकतात, त्यामुळे वरील कोणतेही पेय पिण्याआधी तज्ञ आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि शक्यतो दारूच्या व्यसनापासून लांबच रहा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version