Site icon InMarathi

“कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत?” : वाचा मनाला भावणारी उत्तरं!

Beautiful Indians IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रश्न तसा उत्सुकता वाढवणारा आहे की नाही? तुम्ही देखील विचार करत असाल की कोणतं राज्य एवढं नशीबवान आहे.

आपल्यापैकी काही महाराष्ट्रप्रेमी म्हणतील की महाराष्ट्रातील मराठमोळी स्त्रियाच सर्वात सुंदर!

आणि असं मतं मांडणं चूकही नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याबद्दल अभिमान असतो असतो आणि तेथील गोष्ट त्या व्यक्तीला सर्वोतम वाटतच असते. त्यामुळे असं वाटणं साहजिक आहे.

असो. आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे वळू.

हा प्रश्न क्वोरा वर विचारला गेला होता आणि त्याला काही अपेक्षित उत्तरं आली.

पण एक उत्तर असं होतं ज्याने मात्र तत्काळ मन जिंकलं. थेट त्या उत्तराकडे वळण्यापूर्वी इतरांनी दिलेली काही एक दोन उत्तरे पाहूया.

 

 

तर भारताच्या कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत या प्रश्नाला उत्तर देताना अर्प्रीत शर्मा म्हणतो की,

बंगाली स्त्रिया सर्वात सुंदर असतात. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला मनापासून वाटतं की हे सौंदर्य त्यांना जन्माजात मिळालेलं असतं. त्याच्या सौंदर्यतेची साक्ष देतात त्यांचे डोळे. जे पाहिल्याक्षणी कोणीही माणूस प्रेमात पडू शकतो.

मी असं नयन सौंदर्य यापूर्वी कधीही कुठल्याही राज्यात पाहिलेलं नाही.

 

 

तर दुसरीकडे स्वाती मुखोपाध्याय ही तरुणी म्हणते की,

सौंदर्याला मोजमाप नाही. प्रत्येक व्यक्तीचा सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. जर तुम्ही मला विचारलं कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत तर मी काहीसं अश्याप्रकारे उत्तर देईन-

१) जेव्हा मी हॉस्पिटल मध्ये डोळे उघडते, आणि माझ्या नजरेसमोर नर्स आणि स्त्री डॉक्टर असतात, तेव्हा मला त्यावेळी त्या सर्वात सुंदर स्त्रिया भासतात. मग त्या कोणत्याही राज्यातले का असेनात.

 

nursehow.blogspot.in

 

२) जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला एक शिक्षका आवडायच्या, त्या तामिळनाडूमधल्या होत्या. मी कोलेजला आले तेव्हा अजून एक शिक्षका होत्या त्यादेखील दिसायला खूप सुंदर होत्या. त्या छत्तीसगडच्या राहणाऱ्या होत्या.

३) जेव्हा मी डान्स क्लास जॉईन केला तेव्हा तेथील एक नृत्यशिक्षिका मला आवडायच्या, त्या केरळामधून होत्या, त्या देखील माझ्या लिस्ट मध्ये अॅड झाल्या.

अश्याप्रकारे त्या त्या वेळी ती ती स्त्री तुम्हाला आवडत असते. त्यामुळे प्रत्येक स्त्री सुंदर असते, असं माझं मत आहे.

 

zeenews.india.com

 

तर अशी ही दोन उत्तरे. जी काहीशी अपेक्षित होती,

पण आता तुम्हाला एक हटके उत्तर ऐकवतो, जे ऐकून तुम्ही देखील खुश होऊल जालं.

हे उत्तर दिलंय शत्रुघ्न ओझा या तरुणाने. तो म्हणतो,

भारतातील सर्वात सुंदर स्त्रियांच्या राज्यांना मी खालीलप्रमाणे स्थान दिलंय. रँकिंग कडे खास लक्ष असू देत!!!

१. आंध्र प्रदेश

१. अरुणाचल प्रदेश

१. आसाम

१. उत्तराखंड

१. उत्तर प्रदेश

१. ओरिसा

१. कर्नाटक

१. केरळ

१. गोवा

१. गुजरात

१. तामीळनाडू

१. त्रिपुरा

१. नागालॅंड

१. पश्चिम बंगाल

१. पंजाब

१. बिहार

१. मणिपुर

१. मध्य प्रदेश

१. महाराष्ट्र

१. मिझोरम

१. मेघालय

१. छत्तिसगढ

१. जम्मू आणि काश्मीर

१. झारखंड

१. हरियाणा

१. हिमाचल प्रदेश

१. राजस्थान

१. सिक्कीम

१. तेलंगणा

 

थोडक्यात – प्रत्येक राज्यातील स्त्रिया “प्रथम” क्रमांकावर आहेत!

आहे की नाही सुंदर उत्तर!

म्हणजे भारताची जी सर्वसमावेशक अशी प्रतिमा आहे, जिथे सर्व जाती, धर्माचे, पंथाचे, भाषांचे लोक एकत्र नांदतात, त्या प्रतिमेला साजेसं उत्तर आहे हे.

राज्यांचा जसा क्रम आहे, त्याच क्रमाने प्रत्येक राज्याला स्थान देऊन या तरुणाने ना कोणत्या राज्याला कमी लेखले आणि ना ही कोणत्या राज्याचा अपमान केला.

म्हणूनच या उत्तराने मन जिंकले.

 

prezi.com

 

त्यामुळे आता तुम्हाला देखील कोणी विचारलं की तुमच्या मते भारताच्या कोणत्या राज्यातील लोकं सर्वात सुंदर आहेत? तर त्यांना देखील हेच शेवटचं उत्तर ऐकवा. मग बघा समोरचा तुमच्या उत्तरावर कसा खुश होतो ते!

या उत्तराने स्त्रियांचा मान राखला जातोच, पण भारतातली सगळी राज्य समान आहेत, प्रत्येक राज्यातील प्रत्येक स्त्री ही सुंदर आहे, कारण ती स्त्री आहे हे जास्त महत्वाचं.

मुलगी, माता, बहीण, प्रेयसी, बायको, आजी अशा अनेक भुमिका निभावणारी आणि कायम इतरांसाठी जगणारी ही व्यक्ती कायम सुंदरच असते, हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version