Site icon InMarathi

The Kashmir Files – काश्मीरचं हे उघडं नागडं सत्य आपल्याला सुन्न करून सोडतं…

the kashmir files 1

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखिका – रूपाली पारखे देशिंगकर

बहुचर्चित काश्मीर फाईल्स आज रिलीज झाला. अपेक्षेप्रमाणेच शो हाऊसफुल होता. या चित्रपटाची स्टोरी इथे लिहून, त्याची तीव्रता शब्दांत मांडता येणार नाहीए. विवेक अग्निहोत्री नावाचा माणूस इतकं उघडंनागडं सत्य आपल्यासमोर मांडून ठेवतो,की सुन्न होणं, हादरणं याच जोडीला अत्यंत अपराधीपणाची भावना घेऊन आपण सिनेमा हाॅलच्या बाहेर येतो. चित्रपट पाहिल्यानंतर मला काश्मीरी पंडितांची परवड काही दशांश टक्के समजलीए.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जानेवारी १९९० … काश्मीर खोऱ्यातला काळाकुट्ट रक्तरंजित कालखंड! दोन दिवसात लाखो काश्मीरी पंडितांनी आपली जन्मभूमी, कर्मभूमी आणि आयुष्यं गमावली. “रालीव,त्सालीव या गालीव”, अर्थात धर्म बदला (इस्लाम स्वीकारा) जागा सोडा (काश्मीरमधून निघून जा) नाहीतर मरा! ही धमकीवजा घोषणा जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटने अंमलात आणून काफरांचा,अर्थात काश्मीरी पंडितांचा कत्तलखाना सुरू केला.

१९/२० जानेवारी १९९० उगवलेच नसते तर बरं झालं असतं असं वाटावं इतकी नृशंस कत्तल हिंदूंची झाली आणि उर्वरित देशाने ती मूकपणे पाहिली. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूंचे अस्तित्व पुसण्याचा आणि पुरोगामी फाईलींमधे बंद करून टाकलेला हा रक्तरंजित इतिहास ,आज बत्तीस वर्षांनी देशासमोर ठेवला गेलाय.

 

 

ज्ञानाची गंगोत्री असलेलं, विद्येचं शक्तिपीठ असलेलं काश्मीर वामपंथी इकोसिस्टीमने पद्धतशीरपणे हिरवं रंगवून देशापासून तोडलेलं राहील याची काळजी कशी घेतली हे चित्रपट पाहताना जाणवतं आणि प्रचंड राग राग होतो. “फ्री कश्मीर”, “आजादी”, “अफझल हम शर्मिंदा है ” म्हणणारी लालहिरवी पिलावळ कशी पोसली जाते हेही या चित्रपटाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय.

या दहशतवादी प्रयत्नांना पाठिंबा देणारी इनव्हिजीबल आर्मी म्हणजे लुटीयन मिडीया, भारताच्या सेनेचं मनोबल खच्ची करणारी तेव्हाची शासनसंस्था, किडामुंग्यांपेक्षाही वाइट पद्धतीने मारले गेलेले काश्मीरी पंडित मोठ्या पडद्यावर बघताना अंगाचा थरकाप उडतो आणि डोळ्यातून पाणी ओघळतं.

वर्षानुवर्ष मागच्या सरकारांनी विविध फाईल्समधे दडवलेलं हे भीषण सत्य, वास्तवात घडून गेलेलं क्रौर्य आपल्यासमोर ठेवताना अग्निहोत्रीने ताश्कंद फाईल्सप्रमाणेच फुलप्रुफ काम केलंय. या प्रयत्नांना सशक्त अभिनयाची जोड दिलीए स्टारकास्टने.

 

 

मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर,पल्लवी जोशी च्या जोडीला दर्शन कुमार, चिन्मय मंडलेकर आणि मृणाल कुलकर्णीने चित्रपटाच्या गांभिर्याला सतत योग्य त्याच टेंपोने पुढे नेलंय. भाषा सुंबलीने काश्मीरी स्त्रीची व्यथा,हतबलता, ज्या आर्तपणे संपूर्ण चित्रपटभर दाखवलीए, ती अजूनही पाठ सोडत नाहीए.

आज जेएनयू सारख्या संस्थांमधून देशविरोधी विखार,फुत्कार कसे जोपासले जातात आणि तथाकथित बुद्धिवादी प्राध्यापक मंडळी त्याला खतपाणी कशी घालतात हेही ठळकपणे जाणवतं.

हीच मंडळी मिडीया हाऊसेस,पब्लिकेशन हाऊसेस, एज्युकेशनल सिस्टीममधे शिरून तरूणांच ब्रेनवाॅशिंग करून देशाच्या एकसंध असण्याला पद्धतशीरपणे सुरूंग लावत रहातात. संपूर्ण चित्रपटभर, उदयसिंग मोहितेची सिनेमाटोग्राफी चित्रपट बटबटीत होऊ देत नाही हे वैशिष्ट्य.

फेक न्यूज दिखाना इतना खतरनाक नही है, जितना रिअल न्यूज छुपाना हे सत्य चित्रपट पहात असताना जाणवतं. वर्षानुवर्षे याच तथाकथित उदारमतवादी बुद्धिवादी लोकांनी काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराबद्दल न बोलणं अथवा खोट्या कथा पसरवण्याचं काम केलं. म्हणूनच “जब तक सच जुते पहनता है, तब तक झूट नंगे पाँव गाव घुम आता है” याचा प्रत्यय आपल्याला काश्मीर प्रकरणात आलेला आहे.

२०१४ नंतर झालेल्या बदलांनी निदान जळजळीत वास्तव समोर मांडण्याचं धैर्य आलंय. या चित्रपटात अनुपम खेर यांची भूमिका जणू आत्मा आहे. अनुपम खेर यांच्या तोंडी असलेलं वाक्य २०१४ नंतरच्या मोठ्या बदलांना लागू पडतंय. “सपने पुरे नही होते, इनके पीछे भागना पडता है।” So true…. कधीतरी ३७० कलम रद्द होईल हे काश्मीरी पंडितांनी पाहिलेलं स्वप्न मोदीसरकारने पूर्ण केलं.

 

 

संपूर्ण चित्रपटभर डोळ्यातून पाणी वहायचं थांबत नाही आणि अशीच अवस्था बहुतांश दर्शकांची होते. विवेक अग्निहोत्री आणि टिमला मनापासून द्यावे तितके धन्यवाद कमीच.

“कश्मीरी पंडितोंको सुननेकी किसीने कोशीशही नही की” हे वाक्य आजवरचं वास्तव आहे. दूर कुठल्या खंडातल्या क्रौर्याबद्दल अरण्यरुदन करणारी माणसं, आपल्याच देशात, शांतपणे, आनंदात जगणाऱ्या आणि अचानक आत्यंतिक क्रौर्य अनुभवत वर्षानुवर्ष निर्वासितपण लादलं गेलेल्या या काश्मीरी पंडितांबद्दल सहज मौन बाळगतात आणि नकळत आपणही त्याच निब्बर सिस्टीमचा हिस्सा असतो ही अपराधी भावना डोक्यात भुंग्यासारखी भिरभिरतेय.

 

 

जसं चित्रपटातल्या तरूण काश्मीरी पंडित मुलाचं ब्रेनवाॅशिंग या सिस्टिमने केलंय, तसाच चुकीचा इतिहास माझ्या पिढीसमोर या वामपंथीय विचारधारेने ठेवल्याने हे सत्य मलाही माहीत नव्हतं. सुदैवाने, आज मी काश्मीरी पंडितांना उच्चारवात साॅरी म्हणू शकतेय कारण मला आज हे सत्य समजलंय.

घरातल्या तरूण मुलांना आवर्जून हा चित्रपट दाखवा म्हणजे ३७० कलम रद्द करण्यामागची भूमिका समजायला मदत होईल. झी स्टुडिओ, विवेक अग्निहोत्री यांचे मनापासून आभार की उशीरा का होईना,सत्य समजून घेता आलंय.
***** Must see , worth of spending time n money!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version