' पंजाबमधील बड्या पक्षांना धूळ चारत ‘आप’ निवडून येण्यामागे आहेत ही ५ कारणे – InMarathi

पंजाबमधील बड्या पक्षांना धूळ चारत ‘आप’ निवडून येण्यामागे आहेत ही ५ कारणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाचही राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून यायला सुरु झाले आहे आणि रात्रीपर्यंत निकाल घोषीत होतील, असे अंदाज आहे. या पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश, मणिपुर, गोवा आणि उत्तराखंड मध्ये भाजपाची सत्ता येण्याची चिन्हे आहे तर पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला एकतर्फी विजय मिळाला आहे.

येथे काँग्रेस आपली सत्ता वाचवण्यात अपयशी ठरले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग किंवा प्रकाशसिंग बादल यांसारखे बडे नेते आम आदमी पक्षाच्या हवेत विरून गेले.

 

elections 1 im

आम आदमी पक्ष सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा अशा प्रकारे पराभव करेल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. अकाली दलची अवस्था तर अजुनच वाईट झाली आहे, तर भाजपला सध्या तरी दोन-तीन सीट मिळण्याचे संकेत आहे. परंतु सगळ्यांना एकच प्रश्न पडले आहे की अखेर आम आदमी पक्षाला एवढा मोठा विजय मिळण्याचे नेमके कारण आहे तरी काय?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

● सत्ताविरोधी भावना (Anti-incumbency)

तसे पंजाबचे राजकीय इतिहास बघितले तर तेथील सत्तेची चाबी परंपरागतपणे शिरोमणी अकाली दल किंवा काँग्रेस यांच्या हातात राहिली आहे. पंजाबमधील जनतेला आतापर्यंत तरी दुसरा कोणताही पक्ष पर्याय पक्ष म्हणून आवडला नव्हता, मात्र आम आदमी पक्षाने येथे परिवर्तनाच्या मुद्द्यावर भर दिला आणि जोरदार विजय संपादन केले.

बघता-बघता पंजाबमध्ये ‘आप’ च्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये ही भरपूर वाढ व्हायला लागली. तसेच काँग्रेस आणि अकाली दल यांच्यामध्ये जवळीक वाढल्याची अफवा ही उडाल्या होत्या.

 

bhagwant and arvind im

 

केजरीवाल आपल्या प्रत्येक रैली आणि सभेमध्ये आव्हान करायचे की, पंजाबच्या जनतेने ७० वर्षे अकाली दल आणि काँग्रेसला संधी दिली, फक्त एकदा आम आदमी पार्टीला संधी द्या.

● दिल्ली मॉडल

आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे दिल्ली मॉडेल पंजाबच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरले आणि ते यशस्वी देखील झाले. दर्जेदार सरकारी शिक्षण, आरोग्य, वीज आणि परवडणाऱ्या दरात पाणी या दिल्ली मॉडेलच्या चार स्तंभामुळे आप पंजाब मतदारांमध्ये लोकप्रिय झाली. तसेच राज्यातील विजेच्या चढ्या दरांमुळे जनता चिंतेत होती, पाण्याच्या समस्येशिवाय आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्याही ही पंजाबमध्ये वाढल्या होत्या. यामुळे पंजाबचा मतदार ‘आप’ कडे वळला.

 

aap 2 im

 

● महिला आणि तरुणांचे समर्थन

आम आदमी पक्ष तरुण आणि महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात पूर्णपणे यशस्वी झाले आहे. राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केजरीवाल यांनी तरुणांना सोबत घेऊन “व्यवस्था बदलण्याचे” आणि शिक्षण आणि रोजगाराला चालना देणारी नवीन व्यवस्था आणण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये जमा करण्याचे ‘आप’चे आश्वासनही कामी आले आहे.

 

aap im 1

 

याचबरोबर कृषी आंदोलनचा ही ‘आप’ ला भरपूर फायदा मिळाला आहे. तसेच आप चे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भागवत मान यांचे लोकांशी चांगले संबंध होते. आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्राने तसेच आपल्या विनोदी अभिनयामुळे त्यांनी अनेक पंजाबी लोकांच्या हृदयात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आम आदमी पार्टी ला जिंकवण्यात भागवत मान यांचे ही खुप मोठे योगदान आहे.

● राष्ट्रीय राजकारणातील भविष्य

इतर प्रादेशिक पक्ष जसे की तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस किंवा इतर पक्षांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची सत्ता फक्त एका राज्यापूर्ती मर्यादित आहे, पण आम आदमी पक्षाचे सरकार आता दिल्ली सोबतच पंजाबमध्ये ही स्थापन होणार आहे.

तसेच आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा म्हणतात की, “पंजाबमधील पक्षाच्या विजयाने हे सिद्ध होत आहे की सामान्य जनता आता जागी झाली आहे. आमचा पक्ष आता काँग्रेसला एक विकल्प म्हणून उभा होत आहे, तसेच आम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये सत्तेमध्ये तर येत आहोतच, याचसोबात आमची राष्ट्रीय पातळीवरही उपस्थिती वाढत आहे.

 

congress-plenary-session-inmarathi
dnaindia.com

परंतु या मिळालेल्या सत्तेबरोबर ‘आप’साठी आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. ज्या ‘दिल्ली मॉडेल’च्या आधारावर त्यांनी सत्ता मिळवली आहे, ते मॉडल त्यांना २०२४ पर्यंत पंजाबमध्ये दाखवावे लागेल. नाही तर लोकांमध्ये असलेला आम आदमी पार्टी वरचा विश्वास ही उडून जाईल.

शेतकरी आंदोलन :

दिल्ली पंजाब सीमेवर वर्षभर चालेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपाला चांगलाच बसला, हे आंदोलन देशभरात चांगलेच गाजले मात्र याचा फायदा कदाचित आपला झाला असावा, कारण काँग्रेस आणि इतर पक्षांवर शेतकरी नाराज होते त्यात आप त्यांना कदाचित आशेचा किरण वाटला असावा.

 

farmer protest inmarathi

 

आज दिल्लीची सत्ता केजरीवाल यांच्याकडे आहे आता पंजाबमध्ये त्यांचे सरकार येणार, त्यामुळे आता याचा फायदा त्यांना देशाच्या राजकरणात होणार का हे काही दिवसात कळेलच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?