सत्तेसाठी काहीपण; भाजपच्या या मंत्र्याने घेतलेल्या शपथेवर हसावं की रडावं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया युक्रेनच्या बातम्या कमी होऊन एकच विषय सध्या चर्चेत आहे तो म्हणजे देशातील ५ राज्यांच्या निवडणुकांचे निकाल. गेल्या वर्षभरापासून निवडणुकांचे वारे वाहत होते. कोरोनाची तिसरी लाट देखी येऊन गेली मात्र राजकीय पक्ष आपल्याला प्रचारांमध्ये व्यस्त होते.
ज्या राज्याच्या निवडणुकांमुळे देशाचे राजकरण ठरते अशा उत्तर प्रदेश या राज्यात पुन्हा एकदा भाजपला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे मात्र त्यांचे आप्तस्वकीय काही प्रमाणात नाराज होते असे बोलले जात आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
उत्तर प्रदेश प्रमाणे आपल्या सख्ख्या शेजारी असलेल्या गोवा राज्यात देखील भाजपला मागच्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. आधीची निवडणूक दि. मनोहर परिर्कर यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीचे प्रभारी होते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस.
बिहार निवडणुकांचा अनुभव असणारे तसेच महाराष्ट्रात सुद्धा अधिवेशन गाजवणारे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या झंझावाती कामाने समस्त गोवेकरांचे मन जिंकले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला मतदान केले. देवेंद्र फडणीवस यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहेच. मात्र भाजपचे आणखीन एक प्रभारी ज्यांनी त्यांच्या राज्यात सरकार येण्यासाठी चक्क जेवण सोडलंय कोण आहेत ते मंत्री चला तर मग जाणून घेऊयात…
–
- पर्रीकरांच्या नावावर भाजपने गोव्यात सत्ता उपभोगली, पण त्यांच्या मुलाला भाजप तिकीट का देत नाही?
- राजकारणातील ‘बाप’ मंडळी घरी ‘बाबा’ म्हणून अशी असतात! एक दुर्मिळ फोटो अल्बम
–
कोण आहेत ते मंत्री?
उत्तर प्रदेशापाठोपाठ देशातील एक मोठे राज्य म्हणजे राजस्थान, पर्यटनावर संपूर्णपणे अवलंबून असलेलय या राज्यात आता अनेक उद्योगपती गुंतवणूक करत आहेत. अशा या रंगिलो राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आहे. २०१८ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा मोठ्या प्रमाणावर पराभव केला होता.
मोदी लाटेचा तिथे फारसा प्रभाव पडला नसल्याने साहजिकच २०२३ सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला भुईसपाट करण्यासाठी राजस्थानचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी तर शपथच घेतली आहे.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये अलिगढ येथे प्रचाराच्या दरम्यान ते असे म्हणाले की मी संकल्प केला आहे की २०२३ सालच्या निवडणुकांमध्ये भाजपचे सरकार येत नाही तो पर्यंत मी हार फुले असे काहीच स्वीकारणार नाही तसेच रात्रीचे जेवण सुद्धा घेणार नाही. ते पुढे असेही म्हणाले की आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मोदीजींच्या कुशल नेतृत्वामुळे आणि लोकप्रियतेमुळे २०२३ साली राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येईल.
मूळचे आरएसएसचे असलेले सतीश पुनिया १९२२ पासून भाजपसोबत आहेत. याआधी ते भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष होते. आमेर हा त्यांचा मतदार संघ आहे. ५ राज्यांपैकी तीन राज्यात भाजपला मोठे यश मिळाले आहे. अमितेश शाह यांनी मध्यन्तरी जयपूरमध्ये सभा घेऊन निवडणुकीच्या तयारीला सुरवात केली आहे, त्यामुळे आता येऊ घातलेल्या राजस्थानच्या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.