Site icon InMarathi

युद्धापूर्वी युक्रेन होतं कमालीचं सुंदर, या ६ भारतीय चित्रपटांचं शूटिंग तिथेच झालंय

natu im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

युक्रेन आणि रशियामधील युद्ध अजूनही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. रोजच युद्धाच्या नवनवीन बातम्या येऊन धडकत आहेत. युक्रेनची अवस्था बिकट झालेली असून, युक्रेनची भूमी उध्वस्त होत चालली आहे.

युक्रेनला बेचिराख करत सुटलेलं रशियन सैन्य थांबण्याची कुठलीही लक्षणं दिसत नाहीत. कधीकाळी निसर्गसौंदर्याची खाण असलेला युक्रेन देश आता मात्र पाहताही येणार नाही, अशी झाली आहे.

युक्रेन नेमका किती सुंदर होता ते पाहायचं असेल, तर ते काही भारतीय चित्रपटांमध्ये नक्की पाहता येईल. तुम्हाला कदाचित ठाऊकही नसेल, मात्र तुमच्या आवडीचे हे चित्रपट चक्क युक्रेनमध्ये शूट झाले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. आर आर आर

 

‘नाचो नाचो’ गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं होतं. या गाण्यातील डान्स स्टेप करणं, त्यावर आधारित रील्स बनवणं याला सोशल मीडियावर उधाण आलं होतं.

चित्रपटातील कलाकार, रामचरण आणि जुनिअर एनटीआर यांच्या जबरदस्त डान्सची चर्चा सुद्धा खूपच रंगली. मात्र या चित्रपटाचं शूटिंग युक्रेनमध्ये सुद्धा झालं आहे, हे तुम्हाला माहित आहे का? मागच्या वर्षी राजामौलीच्या या चित्रपटाची टीम युक्रेनमध्ये शूटिंग करत होती.

२. रोबोट २.०

 

ज्या चित्रपटात रजनीकांत काम करतोय, तिथे रॉयल कारभार हवाच नाही का? अक्षय कुमार आणि रजनीकांत या दोघांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं शूटिंग युक्रेनमध्ये झालंय.

२०१८ साली रिलीज झालेल्या या सिनेमातील गाण्याचं चित्रीकरण युक्रेनमध्ये झालं आहे. ए.आर. रहमान याचं ‘रोजा…’ हे गाणं या चित्रपटात चित्रित करण्यात आलेलं आहे. या गाण्याचं शूटिंग युक्रेनमधील ‘टनेल ऑफ लव्ह’मध्ये शूट करण्यात आलंय.

३. स्पेशल ऑप्स १.५ – द हिम्मत स्टोरी

 

 

चित्रपटांच्या बरोबरीने वेब सिरीज सुद्धा आता मोठ्या बजेटसह चित्रीकरण करत असल्याचं पाहायला मिळतं. के के मेनन याची मुख्य भूमिका असलेली स्पेशल ऑप्स १.५ ही यापैकीच एक वेब सिरीज म्हणायला हवी.

ऍक्शन सिक्वेन्स, डोकॅलिटी यांनी पुरेपूर असलेल्या या सिरीजचं शूटिंग सुद्धा युक्रेनमध्ये झालं आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी युक्रेनमधील अनेक जागांची निवड यासाठी केली होती.

४. ९९ सॉंग्स

 

 

ए. आर. रहमानची निर्मिती असलेला हा चित्रपट बहुतांशी युक्रेनमध्येच चित्रित झाला आहे. एहान भट आणि एडिलसी वर्गास यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. एका संगीतकाराची स्ट्रगल स्टोरी मांडण्याचा प्रयत्न या कथानकातून करण्यात आला आहे.

५. विनर

हा दाक्षिणात्य सिनेमा २०१७ साली रिलीज झाला होता. तेलगू भाषेतील हा सिनेमा एक चांगली कलाकृती मानला जातो. किव आणि लिव्हिव्ह या दोन मुख्य शहरांमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर झालं होतं.

राजधानीचं शहर असलेलं आणि विनरच्या शूटिंगचं महत्त्वाचं ठिकाण असलेलं किव आज जवळपास उध्वस्त झालं आहे.

६. देव

 

कार्ती आणि रकुलप्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देव’ हा एक तामिळ रोमँटिक सिनेमा आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या आयुष्यावरून प्रेरित असणाऱ्या या कथेमध्ये प्रकाश राज आणि रम्या कृष्णन यांनी सुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा युक्रेनमध्ये करण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटातील बहुतांश भाग हा भारतातील अनेक नयनरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आला होता. युक्रेनमध्ये सुद्धा याचा काही भाग शूट झालेला असल्याने, या यादीत ‘देव’ चित्रपटाचा समावेश होणं मात्र साहजिक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version