कॉमेडी किंग ते पंजाबचा भावी मुख्यमंत्री: वादग्रस्त भगवंत मान यांचा बेधडक प्रवास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले आणि आणि वेगळ्या क्षेत्रात, विशेषतः क्रीडा, अभिनय क्षेत्रात असलेले बरेच जण राजकारणात आल्याची उदाहरणं आपल्याला माहीत आहेत. अशा चेहऱ्यांची त्यांच्या मूळ क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता असली तरी राजकारणात ते फार काळ टिकाव धरू न शकल्याचीच अनेक उदाहरणं आहेत. गोविंदा, बच्चनजी, उर्मिला मातोंडकर ही काही पटकन आठवणारी उदाहरणं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
नवजोतसिंग सिद्धू मात्र याला अपवाद ठरत आजही काँग्रेसमध्ये आपलं स्थान टिकवून आहेत.
सध्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये बरीच चुरस पाहायला मिळतेय. अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ या पार्टीतर्फे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार म्हणून भगवंत मान उभे राहिले आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी मान हे स्टॅन्ड अप कॉमेडियन होते. विनोदवीर म्हणून पंजाबमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेले मान यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून निवडून येतील यावर आता जवळपास शिक्कमोर्तब झालंय. मात्र इथे पोहोचण्यापूर्वीचा मान यांचा प्रवास मोठा रंजक आहे. त्यांच्या आधीच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा घेऊ.
केजरीवाल म्हणतात की, ”आपल्या पार्टीच्या कॅम्पेनअंतर्गत मिळालेल्या २२ लाख प्रतिसादांवरून भगवंत मान यांना विधानसभा निवडणूकीसाठी मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा म्हणून निवडलं गेलं होतं. ते म्हणाले की ९३% लोकांनी मान यांना आपली मतं दिली.
भगवंत यांचं पूर्वायुष्य काहीसं वादग्रस्त आहे. मात्र कॉमेडी किंग म्हणून लोकांनी नेहमीच त्यांना डोक्यावर घेतलं. मान यांचा जन्म पंजाबमधील संग्रुर या गावात झाला. त्या जनाम्यात आतासारखं इंटरनेटचं जाळं विस्तारलेलं नव्हतं. तरी मान यांनी नेहमी विनोदाचा सूर बिनचूक पकडत आपल्या कॉमिक टायमिंग्जने रसिकांचं मन जिंकलं. युथ फेस्टिवल्स आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये ते भाग घ्यायचे.
‘कुल्फी गरमा गरम’ सारखे सुपरहिट अल्बम्स त्यांनी दिले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोमधून त्यांना देशभरात ओळख मिळण्याच्याही आधी राजकीय उपहासाशी जोडलेल्या आपल्या गावरान बाजाच्या पंजाबी विनोदासाठी ते प्रसिद्ध होते.
२०११ सालच्या सुरुवातीला त्यांनी मनप्रीत सिंग बादल यांच्या ‘पीपल्स पार्टी ऑफ पंजाब’ मध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. मात्र २०१२ मध्ये लेहरा महदारसंघाकडून लढल्यावर ते सपशेल हरले. त्यानंतर २०१४ साली मार्चमध्ये त्यांनी ‘आम आदमी पार्टी’त प्रवेश केला आणि संग्रुर लोक सभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवून ते २ लाख मतांनी विजयी ठरले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पण २०१७ साली पुन्हा जलालाबाद मध्ये निवडणूक लढवताना सुखबीर सिंग बादल यांच्याकडून निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली.
वादग्रस्त मान
त्यांचं खाजगी आयुष्यही लोकांच्या चर्चेचा विषय ठरला. त्यांना आजवर अनेक कॉंट्रोव्हर्सीजनी घेरलं. त्यांच्यावर मुख्यतः दारूच्या नशेच्या आहारी गेल्याचे आरोप झाले.
२०१४ साली मान यांनी इराकमध्ये अडकलेल्या पंजाबी नागरिकांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स भरवली होती. पण त्यावेळी त्यांच्या विचित्र वागणुकीच्या एका व्हिडियोचीच जास्त चर्चा झाली. या व्हिडियोत ते कोलमडून कारच्या मागच्या भागात जिथे आपण सामान ठेवतो त्याच्या आत गेल्याचं दिसलं. ते दारू प्यायले असावेत किंवा नैराश्याने ग्रस्त असावेत असं बऱ्याच जणांना वाटलं.
२०१९ साली आम आदमी पार्टीच्या एका सार्वजनिक मिटिंगमध्ये त्यांनी सर्वासमक्ष आपण दारू सोडू, दारूला पुन्हा स्पर्श करणार नाही अशी आपल्या आईची शपथ घेत म्हटलं होतं. २०१८ च्या सुरवातीला ‘ड्रग माफिया केस’ वरून अरविंद केजरीवाल यांनी बिक्रम सिंग मजिठिया यांची माफी मागितल्यावर मान यांनी ‘आप’ पंजाब च्या संयोजक पदावरून राजीनामा दिला होता.
—
- ‘ह्या’ प्रसिद्ध राजकारण्यांना तुम्ही ह्या रुपात कधी पाहिलं आहे का..?
- EVM हॅक करणे शक्य आहे का? वाचा…
—
२०१६ साली मान यांनी सरकारी शाळांच्या शिक्षकांची खिल्ली उडवल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसल्या होत्या. टीकाकारांनी त्यांच्या दारूच्या व्यसनावरून बऱ्याचदा त्यांच्यावर टीका केली आहे.
२०१५ साली भगवंत मान आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी इंदरजीत कौर यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. पंजाबसाठी काम करायचं म्हणून आपण आपल्या बायकोला सोडत आहोत असं त्यांनी त्यावेळी फेसबुकवरून सांगितलं होतं. मान यांच्या अत्यंत खडतर राजकीय प्रवासात त्यांची पत्नी इंदरजीत या त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या होत्या.
२०११ साली राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मान ऑस्ट्रेलियात राहायचे त्यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत राहायला गेली होती. राजकीय फायद्यासाठी तुम्ही खाजगी समस्येचा वापर करताय असं म्हणत सोशल मीडियावरून मान यांच्यावर कठोर टीका झाली होती. मीडियाच्या काही अहवालांनुसार कामामुळे आपण आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही ही गोष्ट मान यांनी नंतर मान्य केली. इंदरजीत युएस मध्ये राहायची आणि मला तिथे जाणं शक्य नव्हतं. तिलाही इथे येणं शक्य नव्हतं असं मान यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी परस्परसंमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
इतक्या वेळा विचित्र वागल्यानंतरही त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे आणि वक्तृत्त्वनैपुण्यामुळे ते गर्दीला खेचून आणणारा ‘आप’चा चेहरा आहेत. ते अगदी तात्पुरत्या टप्प्यांवरून बोलत असतानाही गर्दीसोबत त्यांची जबरदस्त केमिस्ट्री असते. बऱ्याच सार्वजनिक मीटिंग्जमध्ये लोकांनी ‘आप’च्या बाकी वक्त्यांच्या आधी मान यांना बोलायची परवानगी द्यायलाही भाग पाडलंय. विनोदवीर म्हणून लोकांच्या मनात घर केलेले मान मुख्यमंत्री म्हणूनही लोकांचं मन जिंकतील की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.
एखादा कलाकार कलाकार म्हणून एकदा मोठा झाला की तो प्रत्यक्ष आयुष्यात कसा आहे याकडे लोक किती सहज कानाडोळा करतात याचा भगवंत मान यांच्या आजवरच्या आयुष्याकडे पाहून आपल्याला नव्याने प्रत्यय येतो. काही विशेष राजकीय कर्तृत्त्व नसताना विनोदवीर म्हणून त्यांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर चाहत्यांनी मान यांना निवडून आणलं तर त्यांनी खरोखरच पंजाबसाठी काहीतरी ठोस काम करावं हीच अपेक्षा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.