' कॅमेरा ऑन ठेऊन झोपा आणि आठवड्याला मिळवा २ लाख, काय आहे हे गौडबंगाल? – InMarathi

कॅमेरा ऑन ठेऊन झोपा आणि आठवड्याला मिळवा २ लाख, काय आहे हे गौडबंगाल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनानंतर भारतात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला तो नोकरी धंद्याचा, कारण या काळात सर्वच ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचे तीन तेरा वाजले.

मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. आजकाल लोकांना कमीत कमी कष्टात जास्त नफा कमवायचा असतो. त्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भरपूर पैसे मिळवावेत असे कोणाला वाटणार नाही? ते तर आपले सगळ्यांचेच स्वप्न असते. पैसे कमवण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग निवडतो. तसे पाहाला गेले, तर आपला भारत हा अफाट लोकसंख्या असलेला देश आहे. साहजिकच इथले श्रममूल्य हे पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी आहे. अशा परिस्थितीत प्रयत्न करुन आर्थिक समृद्धी आणण्याचे महत्कार्य पार पाडावे लागते.

कोणी नोकरी करून तर कोणी व्यवसाय करून पैसे कमावते. अशावेळी जर तुम्हाला समजले की एक अशीही व्यक्ति आहे जी चक्क गाढ झोपून पैसे कमावते तर तुमचीच झोप उडेल होय ना? पण हे खरे आहे. नक्की काय आहे हे गौडबंगाल? चला जाणून घेऊया.

 

sleeping young man im

 

युट्यूब हा एक अजीबोगरीब गोष्टींचा पेटारा आहे. यावर प्रसारित केले जाणारे अनेक विडियो आपल्याला आश्चर्यचकीत करतात,आपले मनोरंजन करतात. हे विडियो तयार करणारे अनेक यूट्यूबर्स असतात. ते अनेक विडियो बनवतात आणि यूट्यूबवर प्रसारित करतात.

त्यांना जितके लाइक आणि सब्स्क्रीप्शन मिळतात त्यानुसार त्यांना त्या व्हिडिओसाठी पैसे मिळतात. असाच एक यू ट्यूबर आहे जो आपल्या झोपण्याच्या व्हिडिओतून पैसे कमावतो. त्याच्या यूट्यूब चॅनलचे नाव ‘SuperMainstream’ असे आहे.

या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या झोपण्याचा व्हिडिओ प्रसारित करतो. इथे तो आपला झोपतानाचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि मग यूट्यूब वर पोस्ट करतो. त्याचे फॉलोअर्स तो व्हिडिओ पाहतात. त्याबदल्यात त्या यूट्यूबरला पैसे मिळतात.

या लाईव्ह व्हिडिओमध्ये तो युट्यूबर झोपण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचे फॅन अलेक्सा स्पीकरमार्फत मेसेज, विडियो, फोन आणि गाणी लावून त्याला झोपू न देण्याचा प्रयत्न करतात.

 

sleeping young man im1

 

या २१ वर्षीय युट्यूबरने एका न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले, की ६ तास लाईव्ह व्हिडिओ करून तो २००० रुपयांपेक्षा जास्त कमावतो. म्हणजेच तो आठवड्याला सरासरी २००००० रुपये कमावतो.

त्याचे स्लीप स्ट्रीम्स यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत असून त्याच्या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि व्युज मिळत आहेत. आपला झोपतानाचा व्हिडिओ तो लाईव्ह करतो आणि प्रेक्षक त्याला जागे करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, हा होता झोपून पैसे कमावण्याचा झोप उडवणारा फंडा. जगात पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही हेच खरे…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?