जीवनातील अडचणींमुळे हरलेल्यांसाठी: डान्स जगाचा राजा रेमो डिसुझाचं खडतर वास्तव
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तुम्ही जर फिल्मी दुंनियेशी फारसे परिचित नसाल तर ‘रमेश गोपी नायर’ हे नाव तुम्हाला माहिती असण्याचे काहीच कारण नाही. एकतर तो तुमचा परिचित ही नसेल किंवा शेजारी देखील नसेल पण, जर तुम्हाला ‘रेमो डिसोझा’ याबद्दल विचारले तर तुम्ही अगदी उत्स्फूर्तपणे त्याच्याबद्दल, त्याच्या डान्स प्यैशन बद्दल सांगाल.
मित्रहो रमेश गोपी नायर हाच रेमो डिसोझा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? रेमो डिसूझा (Remo D’Souza) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी त्याने कोरिओग्राफ केली आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
‘डान्स इंडिया डान्स’ या रियालीटी शोचं परीक्षण करताना रेमो प्रकाशझोतात आला. त्याआधीपासून तो कोरिओग्राफर म्हणून इंडस्ट्रीत प्रसिद्ध होताच. पण या शोमुळे सर्वसामान्यांपर्यंत त्याचा चेहरा पोहोचला. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी त्याने कोरिओग्राफ केली आहेत.
तुम्हाला इथे हे ही आवर्जून सांगावे लागेल की रेमो चा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तुम्ही आपल्या आयुष्यातील अडचणींना कंटाळला असाल,आपल्या ध्येयापासून विचलित झाला असाल तर रेमो चा रमेश ते रेमो हा प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. काय होती ही प्रवासगाथा? चला एक नजर टाकू …
काही दिवसांपूर्वी रेमोचा एक विडियो सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेमोने त्याला आलेला वर्णभेदाचा कटू अनुभव सांगितला होता. मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्या ‘हम काले है तो क्या हुआँ दिलवाले है’ या गाण्यावरचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता.
सावळ्या रंगामुळे रेमोला ‘कालिया’, ‘कालू’ असं हिणवलं जायचं. मात्र त्याच्या आईने त्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन सांगितल्याचं रेमोने त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
‘लोक जेव्हा मला कालिया किंवा कालू म्हणायचे, तेव्हा मला फार राग यायचा. पण माझ्या आईने मला सांगितलं की, रंग नाही तर व्यक्तीचं मन कसं आहे, हे महत्त्वाचं असतं. हे समजावून सांगताना आई मोहम्मद रफी यांचं ‘हम काले है तो क्या हुआँ’ हे गाणं गायची.
रेमोच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत रेमो म्हणाला होता, “लहानपणापासूनच माझ्या सावळ्या रंगामुळे मी वर्णभेदाचा सामना केला आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही मला असा अनुभव आला आहे. मी अशा लोकांकडे फक्त दुर्लक्ष केलं आहे.”
रमेश गोपी उर्फ रेमो याचा जन्म २ एप्रिल १९७२ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायर असून ते नौदलाचे अधिकारी होते. त्यांच्या आईचे नाव माधवीअम्मा होते. जी एक गृहिणी होती. त्यांचा एक मोठा भाऊ गणेश गोपी आहे. या व्यतिरिक्त त्याला आणखी तीन लहान बहिणी आहेत.
हवाई दलाच्या जामनगर, गुजरात येथील शाळेत त्याचे शिक्षण झाले. शालेय जीवनात तो खेळाडू होता आणि १०० मीटर शर्यतीतही त्याने बक्षिसे जिंकली आहेत. पण बारावीची परीक्षा देत असताना अभ्यासाविषयीची ओढ कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांचा कल नृत्याकडे अधिक होता, परंतु त्यांनी शिक्षण घेऊन भारतीय हवाई दलात भरती होऊन देशासाठी काम करावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
रेमोने वडिलांच्या इच्छेविरुद्ध नृत्य करिअर म्हणून निवडले. रेमोने जेव्हा नृत्यात आपले भविष्य घडवायचे ठरवले तेव्हा तो आपलं शिक्षण सोडून मुंबईला गेला.
कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे, त्याने कधीही नृत्याचे प्रशिक्षण घेतले नाही, परंतु तो नेहमी मायकेल जॅक्सन आणि त्याच्या नृत्य शैलीला फॉलो करत असे. यासाठी तो नेहमी मायकल जॅक्सनला टीव्हीवर पाहत असे, माइकल ने जे काही शिकवले ते, रेमो टीव्ही आणि व्हिडिओद्वारेच शिकला.
आपल्या पालकांच्या मनाविरुद्ध त्याने आपला मार्ग निवडला होता. त्याने करिअर म्हणून नृत्याची निवड केली तेव्हा त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. यावेळी त्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते.
एकदा तो त्याच्या मित्रासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होता, तेव्हा त्याच्याकडे भाड्याचे पैसे नव्हते, म्हणून मित्राला काही दिवसांनी परत येतो असे सांगून तो घरातून निघून गेला. आणि यावेळी त्याने वांद्रे स्थानकावर २ रात्री अन्नाशिवाय काढल्या.
लवकरच त्याने सुपर ब्रॅट्स नावाचा डान्स क्लास सुरू केला आणि नंतर त्याच्या इतर तीन मित्रांच्या मदतीने त्याने आणखी दोन शाखा उघडल्या. यानंतर, त्याने आपल्या आयुष्यात ६ महिने कठोर संघर्ष केला, ज्यामध्ये त्याच्या आईने त्याला साथ दिली. आणि इतक्या मेहनतीनंतर रेमो आज इथपर्यंत पोहोचला आहे.
सध्या मुंबई, अंधेरी आणि बोरिवली येथे त्यांच्या तीन संस्था आहेत. रेमोला अखिल भारतीय नृत्य स्पर्धेद्वारे ओळख मिळाली. या नृत्य स्पर्धेत रेमो आणि त्याच्या टीमने प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यानंतर अहमद खान (जो एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे) यांनी त्यांची दखल घेतली आणि त्यांची ऑडिशन दिली.
अहमद खान यांनी रंगीला चित्रपटासाठी गाणे कोरिओग्राफ करण्यासाठी त्यांना प्रथम संधी दिली. यानंतर त्यांनी अहमद खान यांच्यासोबत सुमारे १ वर्ष सहाय्यक म्हणून काम केले.
अनुभव सिन्हा यांनी सोनू निगम च्या ‘दिवाना’ या म्यूजिक अल्बम मध्ये रेमोला संधी दिली आणि तो हिट अल्बम ठरला. त्यानंतर रेमोने अनुभव सिन्हासोबत अनेक व्हिडिओंमध्ये काम केले. रेमो डिसूझाला ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला, पण या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर फारसे यश मिळू शकले नाही.
त्याला बॉलीवूडमध्ये पुढचा ब्रेक अनुभव सिन्हा यांनी “तुम बिन” या चित्रपटात दिला होता, पण हा चित्रपटही हिट झाला नाही. त्यानंतर कांटे चित्रपटातील ‘इश्क समुंदर’ हे गाणे त्यांच्या कोरिओग्राफी कारकीर्दीतील हिट ठरले आणि मग येथून त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.
—
- कोरिओग्राफर आणि डान्स डिरेक्टर मध्ये काय फरक असतो? कोरिओग्राफी म्हणजे काय? समजून घ्या
- सिनेमातला हा ‘रॉकस्टार’ खासगी जीवनात कसा आहे? उत्तरं वाचून त्याच्या आणखी प्रेमात पडाल
—
या यशानंतर, रेमोने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आणि अदनान सामी आणि मायकेल जॅक्सनच्या बहिणीसोबत “मेरिगोल्ड” (2007), “लेट्स गो मुंबई सिटी” सारख्या अनेक प्रकल्पांवर काम केले. आतापर्यंत त्याने बॉलीवूडमधील १५० हून अधिक चित्रपटांमध्ये गाणी कोरिओग्राफ केली आहेत.
आज रेमो डिसूझाकडे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि तो विलासी जीवन जगत आहे. एका अहवालानुसार, त्याच्याकडे ८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
२०१३ मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘ABCD’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले होते. यानंतर त्याने ‘ABCD 2’ दिग्दर्शितही केला आणि या चित्रपटानेही चांगली कमाई केली होती. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आणि २०१५ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. चित्रपटांव्यतिरिक्त रेमो डिसूझा छोट्या पडद्यावरही चांगलाच सक्रिय आहे. त्याने झी टीव्हीच्या डान्स आधारित रिऍलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’, ‘झलक दिखला जा’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये जज म्हणून भाग घेतला आहे.
आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी कधीकाळी रेमो डिसूझा आपल्या आईला तिच्या कामात मदत करत असे. त्याने त्याच्या आईसोबत विमानतळावर शूज पॉलिश करणे, भांडी धुण्याचे कामही केले आहे. रेमोने किराणा दुकान, बेकरी आणि सायकल पंक्चरच्या दुकानातही काम केले आहे.
लहानपणी रेमोला खेळाचीही आवड होती, त्याने शालेय काळात १०० मीटर शर्यतीतही किमया जिंकल्या आहेत. याशिवाय कराटेमध्ये तो ब्लॅक बेल्ट आहे. तो जन्माने ख्रिश्चन नसून त्याने स्वतः धर्म परिवर्तन करून त्याची निवड केली आहे.
सुरुवातीला रेमोला त्याच्या गडद रंगामुळे आणि अनाकर्षक लुकमुळे बॉलीवूडमध्ये अपमानाला सामोरे जावे लागले, परंतु नंतर त्याने आपल्या प्रतिभेने आपली क्षमता सिद्ध केली. उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी रेमोला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आयफा अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स आणि स्टार डस्ट अवॉर्ड्स हे त्यापैकी उल्लेखनीय आहेत.
रेमो आणि त्याची पत्नी लिजेल यांची प्रेमकहाणी देखील खूप इंटरेस्टिंग आहे. असे म्हटले जाते की, दोघांनी एकमेकांशी तीन वेळा विवाह केला आहे. वर्ष २०१९ मध्ये त्यांनी लग्नाच्या २० व्या वाढदिवशी तिसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते.
या लग्नाची अनेक छायाचित्रे व्हायरल झाली होती. रेमो आणि लिजेल यांना दोन मुले आहेत, त्यांचे नाव हे ध्रुव आणि ग्रॅबियल आहे.
तर मित्रांनो, ‘कोशिश करने वालोंकी हार नाही होती…’ हे रेमो आपल्याला त्याच्या कहाणीतून सांगतो. या प्रतिभाशाली नृत्य दिग्दर्शकाची कहाणी खरेच एखाद्याला प्रेरणा देणारी आहे. तुम्हाला काय वाटते?
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.