Site icon InMarathi

तुमच्या डोळ्यांचा रंग सांगतो स्वभाव, विश्वास बसत नाहीये? मग हे वाचाच…

pooja hegde im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो आपले मानवी शरीर एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही बर का! त्यातही आपले डोळे हे तर विज्ञान, सौंदर्य आणि किमया यांचा एक उत्कृष्ट नमूना आहेत.

‘डोळे हे जुलमी गडे,रोखून मजला पाहू नको’ हे गाणे ऐकणारी एक संपूर्ण पिढी तुम्हाला डोळ्यांच्या भाषेविषयी तुम्हाला सांगू शकेल.

नेहमी असं म्हटलं जातं की, डोळ्यातील भाव सर्व काही सांगून जातात, त्यासाठी तुम्हाला बऱ्याचदा शब्दांचीही गरज भासत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का?

हे जरी रोमँटिक वाटत असलं तरीही ही डोळ्यांची भाषा त्यांच्या रंगानुसार बदलते असे म्हंटले तर? किवा तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या व्यक्तिमत्व, तुमचा स्वभाव यांविषयी सांगतो असे जर तुम्हाला सांगण्यात आले तर? आहे ना कमाल?

 

 

समुद्रशास्त्र किंवा हस्तरेखाशास्त्र ही दोन शस्त्रे आहेत जी तुमच्या चेहर्‍याची ठेवण, तुमच्या डोळ्यांचा आकार आणि त्यांचा रंग यांवरून तुमची परीक्षा करतात. तुमचा स्वभाव, तुमच्या सवयी याविषयीचा अंदाज तुमच्या डोळ्यांच्या रंगावरून लावता येऊ शकतो.

अध्यामिक तज्ज्ञ मधु कोटिया यांनी आपल्याला डोळ्यांच्या रंगावरून व्यक्तीचे स्वभाव सांगितले आहेत. ते सांगतात, की तुमच्या डोळ्यांचा म्हणजे बबुळांचा रंग हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरचं काही सांगतो. आहे ना अमेझिंग?

चला तर मग डोळ्याचा कोणता रंग कोणते गुपित सांगतोय ते पाहूया.

१. काळ्या रंगांचे डोळे :

काळ्या रंगाचे डोळे असणार्‍या व्यक्ती गूढ स्वभावाच्या असतात. या व्यक्ती सिक्रेट खूपच चांगल्या तऱ्हेने लपवू शकतात. हल्ली जास्तीत जास्त व्यक्तींचे डोळे हे काळे असतात.

 

 

काळ्या डोळ्यांच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं हे अतिशय कठीण असतं. या व्यक्तींंना कोणत्याही गोष्टीचा दिखावा आवडत नाही. या व्यक्तींचा सिक्स्थ सेन्स खूपच चांगला असतो. कोणत्याही गोष्टीत योग्य सल्ला या व्यक्ती देऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी अशा व्यक्तींचा सल्ला नक्की घ्यावा.

२. तपकिरी / डार्क ब्राऊन डोळे :

तपकिरी डोळ्यांमध्ये मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. असे डोळे असलेल्या व्यक्ती विश्वासास पात्र असतात. अशा व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाच्या, मृदु आणि उत्स्फूर्त असतात.

त्यांना भरभरून आयुष्य जगायला आवडते. गर्दीमध्ये आपलं अस्तित्व वेगळं असण्याची या व्यक्तींची इच्छा असते आणि या व्यक्तींचा स्वभावही तसाच असतो.

 

 

आत्मविश्वास आणि सकारात्मकता असणार्‍या या व्यक्ती आपल्याबरोबर इतरांचे ही आयुष्य बदलण्याची क्षमता ठेवतात.

३. तांबूस पिंगट रंग असलेले डोळे :

या रंगाचे डोळे असणार्‍या व्यक्ती अतिशय संवेदनशील आणि उत्कट स्वभावाच्या असतात. स्पॉन्टॅनिअस, फन लव्हिंग आणि साहसी असतात.

या व्यक्तींचे आयुष्य एका प्रवाहासारखे वाहते असते. आपल्या आयुष्यात येणार्‍या नव्या व्यक्ती, नवे बदल यांना सामोरे जात त्यांना त्या सहजपणे स्वीकारतात.

 

 

तोचतोचपणाचा या लोकांना लवकर कंटाळा येतो. यांची नाती जास्त टिकत नसली तरी त्यांच्यासाठी स्पेशल व्यक्ति त्यांच्यासाठी कायम स्पेशल च राहतात.

४. करडे किंवा ग्रे रंगाचे डोळे :

करड्या रंगाचे डोळे असणाऱ्या व्यक्ती या वर्चस्ववादी असतात. इतकंच नाही तर या व्यक्ती अतिशय जिद्दीही असतात. जे काम मनाशी पक्कं करतात ते काम पूर्ण झाल्याशिवाय या व्यक्ती मागे हटत नाहीत. मात्र या व्यक्ती मनाने अतिशय साफ असतात.

 

 

खोटं बोलणं या व्यक्तींना अजिबातच आवडत नाही. या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण असतात, या व्यक्तींवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेऊ शकता.

५. हिरव्या रंगाचे डोळे :

हिरव्या डोळ्यांच्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. हिरव्या डोळ्यांचे लोक इतरांपेक्षा खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात. हे लोक खूप हुशार असतात. तथापि, इतरांबद्दल ईर्ष्या बाळगतात.

 

 

ज्या व्यक्तींचे डोळे हिरव्या रंगाचे असतात ते अगदी जिंदादिल स्वभावाचे असतात. अशा व्यक्ती या युनिक असतात. त्यांचा स्वभाव इतर व्यक्तींपेक्षा नेहमीच वेगळा आणि उठून दिसतो. दुसऱ्यांशी बरोबरी करण्यात या व्यक्ती माहीर असतात, पण तितक्यात समजूतदार असल्यामुळे कितीही बरोबरी केली तरी समोरच्या माणसाच्या भावना या व्यक्ती दुखवत नाहीत.

६. निळे डोळे :

हिरव्या आणि काळ्या डोळ्यांप्रमाणे निळ्या डोळ्यांच्या लोकांची संख्यादेखील खूपच कमी आहे. हे लोक त्यांच्या डोळ्यांमुळेही अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात.

निळे डोळे असलेले लोक खूप शांत आणि कुशाग्र असतात. असे डोळे असलेले लोक संपूर्ण निष्ठेने नातेसंबंध हाताळतात आणि इतरांना त्रास देत नाहीत. या व्यक्ती स्वतः पेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. तसेच कोणत्याही गोष्टीकडे सखोल दृष्टीकोनातून पाहतात.

 

एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याबद्दल, इतरांना त्याचे वागणे, शब्द, कृती, हावभावाद्वारे सांगितले जाऊ शकते. अशा प्रकारच्या विश्लेषणाशी संबंधित विज्ञानाला फिजिओग्नॉमी म्हणतात.ज्यात व्यक्तीच्या शरीर रचंनेनुसार त्याच्या स्वभाव, व्यक्तिमत्व यांचा अभ्यास केला जातो.

चेहर्याचा आकार, नाक, भुवया, सुरकुत्या, शरीराची रचना – हे सर्व एक प्रकारे व्यक्तिमत्व, त्याची मुख्य वैशिष्ट्ये दर्शवते आणि एखाद्या व्यक्तीचे आंतरिक जग प्रतिबिंबित करते.

विश्वसनीय माहितीचा सर्वात महत्वाचा स्त्रोत म्हणजे डोळे, जे एखाद्या व्यक्तीबद्दल सर्वात जास्त सांगू शकतात. कदाचित, त्यामुळेच त्यांना “आत्म्याचा आरसा” म्हटले जाते.

 

 

डोळे नेहमीच दृश्यमान असतात, ते व्यावहारिकरित्या लपवले जाऊ शकत नाहीत, म्हणून जर तुम्ही त्यांच्यात लपलेली रहस्ये ओळखण्यास शिकलात तर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल त्याला न ओळखताही बरेच काही शिकू शकता आणि हे शिकण्यास आपल्याला मदत करतात डोळ्यांचे रंग.

तेव्हा तुम्हीही या रंगांची वैशिष्ट्ये जाणून घ्या आणि अनुभवा वेगवेगळ्या स्वभावाचे लोक! लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा आणि आपला अभिप्राय कमेन्टबॉक्स मध्ये जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version