Site icon InMarathi

‘या’ दिवशी नखं केस कापल्यास तुम्ही नक्कीच मालामाल व्हाल!

nail cut im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपले वार्षिक सणवार, काही महत्वाचे दिवस अगदी आठवड्यातील दिवस देखील होरा किंवा फलज्योतिष्याच्या कालगणनेनुसार आखले जातात.

या फल ज्योतिष्यानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला एक शासक देवता आणि एक शासक ग्रह असतो. म्हणून, प्रत्येक दिवशी केले जाणारे कार्य अशा प्रकारे केले पाहिजे की ते देवतांना संतुष्ट करतात आणि ग्रहांना शांत करतात.

यामध्ये आपल्या रोजच्या दिनक्रमातील बर्‍याच गोष्टींचा समावेश होतो. जसे की नवीन खरेदी, प्रवास, महत्वाच्या कामाची सुरवात इ. पण इतकेच नाही तर अगदी नवीन कपडे घेणे, केस कापणे अशा गोष्टीसाठीही वेळ सांगितलेली आहे.

यात अजून एक गोष्ट आहे, तसे पहायला गेले तर ती गोष्ट किरकोळ आहे, पण त्यासाठी देखील आपल्या फल ज्योतिष्याने वेळ, वार संगितले आहेत. ती गोष्ट म्हणजे नखे कापणे.

 

 

 

होय! तुम्ही बरोबर वाचले. नखे कापण्यासाठी देखील आपल्याकडे अशी सोय केलेली आहे. हे तर काहीच नाही आठवड्यातील ठराविक दिवशी नखं आणि केस कापल्यास तुम्ही नक्कीच मालामाल व्हाल! हे ही सांगितले जाते.

वाचून उत्सुकता वाटली ना? चला तर मग जाणून घेऊया मागची धारणा…तसे पहायला गेले तर रविवार हा नोकरदार वर्गासाठी सुट्टीचा आणि प्लॅनिंगचा दिवस. आठवड्यातील राहिलेली कामे या दिवशी केली जातात. यामध्ये केस कापणे, नखे कापणे अशी कामे ही असतात.

सहसा केस व नखे वाढल्यावर कापली जातात, पण भारतीय तत्वज्ञानानुसार नखे ही अहंकाराचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे ती लगेचच कापली जावीत.

काहींच्या मते मंगळवार आणि शनिवारी नखे कापली जाऊ नयेत. तर सोमवारी नखे कापू नयेत असेही काहीजण म्हणतात, नक्की काय आहे यामागचे कारण? का ठराविक दिवशीच केस किंवा नखे कापावीत असे सांगितले जाते? असे कोणते वार आहेत ज्या दिवशी नखे कापली तर तुम्हाला समृद्धि, धन-संपदा मिळू शकेल चला पाहूया…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोमवार :

आरोग्य उत्तम राहावे असे वाटत असेल सोमवारी नखे कापण्याचा सल्ला दिला जातो. सोमवार हा चंद्र या ग्रहाचा वार आहे आणि चंद्र हा माणसाच्या मनाशी संबंधित ग्रह आहे. त्यामुळे सोमवारी नखे कापल्यास मनाशी संबंधित गोष्टींमध्ये सकारात्मक फरक पडतो. असे सांगितले जाते.

मंगळवार :

मंगळवारी नखे कापली तर डोक्यावर कोणत्याही प्रकारचे ऋण रहात नाही अशी मान्यता आहे. या दिवशी नखे कापल्याने घरात पैसा टिकून रहातो. कोणत्याही आर्थिक समस्या ,चणचण जाणवत नाही. असे मानले जात असल्याने मंगळवार हा देखील नखे कापण्यासाठी शुभ वार मनाला जातो.

 

 

बुधवार :

बुधवारचा स्वामी असलेला बुध हा ग्रह बुद्धीचा स्वामी मानला जातो. त्यामुळे बुधवारी नखे कापल्यास बौद्धिक प्रगती होण्यास मदत मिळते. तसेच बुधवार हा ऐश्वर्याची देवता लक्ष्मी हिचा देखील वार मनाला जातो. त्यामुळे बुधवारी नखे कापल्यास सन्मार्गाने धनप्राप्ती होण्यासाठी देखील तो शुभ दिवस मानला जातो.

गुरुवार :

 

 

घरातील अशुभ गोष्टींवर आळा घालायचा असेल तर गुरुवारी नखे कापण्यास सांगितले जाते. शिवाय गुरु हा आध्यात्मिक ग्रह असल्याने त्या दिवशी नखे कापल्यास तुमच्यातील सत्वगुण वाढण्यास मदत होईल असेही मानले जाते.

शुक्रवार :

शुक्र ग्रहाचे वर्चस्व असलेला शुक्रवार हा ग्रह कलेचा कारक आहे. या दिवशी तुम्ही नखे कापलीत तर तुमची एखादी आवडती व्यक्ती भेटण्यास मदत होते. त्यामुळे कोणा आवडत्या व्यक्तिला भेटायचे असेल तर शुक्रवारी नखे कापावीत.

 

 

शनिवार :

‘न करत्याचा वार शनिवार’ असे म्हंटले जाते. त्यामुळे शनिवारी अजिबात नखे कापू नयेत असे आवर्जून सांगण्यात येते. शनिवार नखे कापण्यासाठी अजिबात चांगला दिवस नाही. शनिवारी नखे कापल्यामुळे वाईट गोष्टींमध्ये मन गुंतले जाते अशी मान्यता आहे म्हणून शनिवारी नखे कापू नयेत.

रविवार :

वर म्हणल्याप्रमाणे सर्वांच्या सोयीचा हा एकच वार आहे तरीही या वारी नखे कापू नयेत असे सांगितले जाते. कारण या दिवशी नखे कापल्यामुळे आपल्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात असे मानले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version