आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजच्या या धावपळीच्या जीवनात मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन करणे आणि त्यांना चांगले संस्कार देणे, हे नोकरी करणाऱ्या पालकांसाठी एक मोठे आव्हान झाले आहे.
मुलं जसजशी मोठी होतात तसतशी पालकांवर त्यांची जबाबदारी वाढत जाते. जेव्हा मुलं मोठी होऊ लागतात, तेव्हा पालकांनी मुलांना काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, तसेच त्यांच्यामध्ये योग्यप्रकारे व्यावहारिक विकास होईल याची पण काळजी घेतली पाहिजे.
काही पालकांना आपल्या मुलांना लहान वयातच सर्व काही शिकवायचे असते, परंतु हे फार चुकीचे आहे. यामुळेच आज अनेक पालक आपल्या मुलांचे योग्य विकास कसे करावे याच्या पेरेंटिंग टिप्स घेण्यासाठी इकडे-तिकडे भटकत असतात.
काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी मुलांचे चांगले संगोपन कसे करावे या विषयावर काही टिप्स दिल्या आहेत. सुधाजी या एक अभियंता तर आहेतच, सोबतच त्या सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. सुधाजींना दोन मुले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पालनपोषण संबंधी दिलेल्या टिप्स आजच्या पालकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
चला तर मग जाणून घेऊया अशा आदरणीय आणि अनुभवी सुधा मूर्ती जी आजच्या युगातील पालकांना काय सल्ला देत आहेत.
● मुलांना मोकळ सोडा
प्रत्येक नात्याप्रमाणे मुलांनी आणि पालकांनीही एकमेकांची स्वतंत्रता जपली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलाच्या प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ करावी किंवा लहान-मोठ्या प्रत्येक निर्णयासाठी मुलाने आपल्या पालकांवर अवलंबून राहावे, असे होता कामा नये.
सुधाजी पुढे सांगतात, की मुलांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी थोडी मोकळीक द्यायला हवी, त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्यायला हव्यात.
—
- तुमच्या मुलांसोबत कायमची मानसिक दरी टाळण्यासाठी या ८ चुकांपासून दूर रहा…
- आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा या ५ गोष्टी!
—
● मुलांसाठी स्वतःच एक आदर्श व्हा
आपल्या एका ब्लॉगमध्ये सुधाजींनी सांगितले, की मुलाला कोणत्याही गोष्टीचे पालन करण्यास जबरदस्ती करु नका. तुमच्या सवयी त्याच्यावर लादू नका. त्याआधी त्याच्यासमोर एक उदाहरण ठेवा. जसे, की जर आपल्याला वाटत असेल की आपल्या मुलाने संध्याकाळी अभ्यास करावा, तर तुम्हाला पण त्यावेळी टीव्ही किंवा मोबाईल न बघता, त्याच्यासमोर एखादे पुस्तक वाचायला बसावे लागेल.
जर मुलाला तुमची ती सवय आवडली, तर तो स्वतःहून या गोष्टींचा स्विकार करेल, पण जर तुम्ही जबरदस्ती केली तर याने काहीही साध्य होणार नाही.
● साधे जीवन जगा
जीवन साधेपणाने जगले पाहिजे, असा सल्ला सुधाजींनी दिला आहे. तसेच सुधाजींनी पण असेच साधे जीवन जगले आहे. इन्फोसिस फाऊंडेशनचे अध्यक्ष मुलांना पालकत्वाच्या बाबतीत साधे राहणीमान शिकवण्याचा सल्ला देतात आणि ते स्वतः पण अगदी साधे जीवन जगत आहेत.
● शेअरिंग शिकवा
एक किस्सा सांगताना सुधाजींनी सांगितले, की त्यांनी आपल्या मुलाला सांगितले की त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीवर ५० हजार रुपये खर्च करण्याऐवजी त्याने वाढदिवसाची एखादी छोटीशी पार्टी करावी आणि बाकीचे पैसे त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्यावेत. कारण जन्मदिवस तर प्रत्येक वर्षी येतात आणि दरवर्षी एवढे पैसे पार्टीमध्ये उधळणे कधीही चांगले नाही.
सुधा जी सांगतात की, ‘सुरुवातीला तर त्यांच्या मुलाने यासाठी स्पष्ट नकार दिला पण तीन दिवसांनी त्याला आमचा निर्णय मान्य झाला. त्यांनी सांगितले की काही वर्षांनी त्यांचा मुलगा स्वतःहून त्याची शिष्यवृत्ती घेऊन आला आणि २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी त्यांचा वापर केला जावा’ असे त्याने सुधाजींना सांगितले.
मुलांना पैसे, दयाळूपणा, प्रेम शिकवणे खूप महत्वाचे आहे.
● कोणत्याही कामासाठी जबरदस्ती करु नका
एका मुलाखतीत सुधाजी म्हणाल्या होत्या, की पालकांनी आपल्या मुलाकडे सतत लक्ष देऊ नये. प्रत्येक गोष्टीत टॉपर होण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकू नये. त्याला काय हवे आहे आणि तो काय करू शकतो याचा त्याला स्वतःचा विचार करू द्यावा.
त्याला त्याचे छंद जोपासू द्या, तो त्याच्या आवडत्या क्षेत्रात नक्कीच प्रगती करेल. कोणत्याही गोष्टीसाठी त्याच्यावर दबाव टाकण्याऐवजी, त्या गोष्टी आधी स्वतः करा, ज्या मुलाने कराव्यात असे तुम्हाला वाटते. जर त्याला त्या गोष्टी पटल्या तर तो स्वतः हून त्या सवयी अंगीकारेल.
● त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या
सुधा मूर्ती सांगतात, की मुलांना त्यांचे निर्णय स्वतः घेऊ द्या, यामुळे त्यांची विचार करण्याची शक्ती वाढेल आणि त्यांना परिस्थिती चांगल्याप्रकारे समजेल. तसेच यामुळे त्यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे फायदे आणि तोटे कळतील आणि भविष्यात त्यांना हा अनुभव कामाला येईल.
जर मुलांना तुमचे निर्णय पटत नसतील, तर त्यांच्यासमोर अजून काही पर्याय ठेवा आणि त्यामधून त्यांना निर्णय निवडण्यासाठी सांगा.
या काही टिप्स सुधाजी यांनी मुलांच्या योग्य संगोपनासाठी आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी दिल्या आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.