' आज झाली बुल्स आणि बेअर्सची जोरदार फाईट; नीरज बोरगांवकर यांचं अचूक विश्लेषण – InMarathi

आज झाली बुल्स आणि बेअर्सची जोरदार फाईट; नीरज बोरगांवकर यांचं अचूक विश्लेषण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“Be Fearful When Others Are Greedy and Be Greedy When Others Are Fearful” वॉरेन बफे यांचं हे वाक्य आपल्याला बरंच काही शिकवून जातं.
याचा थोडक्यात अर्थ असा की, स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा लोकं घाबरलेली असतात तेव्हा हिंमत दाखवून फायदा घ्यायला पाहिजे, आणि जेव्हा मार्केट वर जातं, आणि इतर इन्वेस्टर्स चढ्या भावात खरेदी करत असतात, तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे, हा नियम जर पाळला तर तुम्ही दीर्घ कालावधीमध्ये चांगला फायदा कमवू शकता.

अर्थात हे म्हणणं सोपं आहे पण ते प्रत्यक्षात पाळणं, अंमलात आणणं कठीण आहे, याच करता तुम्ही विश्वासू इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट शोधला पाहिजे ज्याची मार्केटवर जबरदस्त पकड असते, तुम्हाला तो योग्य पद्धतीने पुढे नेऊ शकतो. असंच एक नाव म्हणजे नीरज बोरगांवकर! जाणून घेऊया, आज त्यांचं काय म्हणणं आहे…

neeraj borgaonkar IM

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज नेमक्या मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या, कोणत्या शेयरने बाजी मारली, मार्केट आज किती वधारलं आणि या काळात गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया बोरगांवकर यांच्या खास टिप्समधून!

===

दिनांक – ८ मार्च २०२२

निफ्टी – १६०१३.४५ (+१५०.३०)
सेन्सेक्स – ५३४२४.०९ (+५८१.३४)
बॅंकनिफ्टी – ३३१५८.१० (+२८६.८५)
गोल्ड – ५५२४०
यु एस डॉलर – ७६.९३

आजचे निफ्टी High Low – १५६७१.४५ – १६०२८.७५

 

nifty 50 IM

निफ्टीमधील टॉप गेनर्स – IOC , SUNPHARMA , TATACONSUM , CIPLA , TCS

निफ्टीमधील टॉप लूझर्स – HINDALCO , ONGC , TATASTEEL , JSWSTEEL , BRITANNIA

बुल्स आणि बेअर्सची फाईट!

शेअर मार्केटमध्ये आपण नेहमी “बुल्स” आणि “बेअर्स” हे शब्द ऐकत आलेलो आहोत. आज आपण शेअर बाजारामधील बुल्स आणि बेअर्सच्या युद्धाबद्दल बोलणार आहोत. शेअर बाजारामध्ये दोन प्रकारचे ट्रेडर्स किंवा प्रवृत्ती अस्तित्वात असतात. जे बुल्स असतात त्यांना नेहमी असे वाटते की शेअर बाजार वर जावा.

म्हणून ते सातत्यपूर्वक खरेदी करीत राहतात. आणि बेअर्स जे असतात त्यांना असे वाटते की शेअर बाजार खाली पडावा. म्हणून हे लोक सातत्यपूर्वक शेअर्सची विक्री करीत असतात.

या दोन प्रवृत्तींचे युद्ध हे बाजारामध्ये कायम सुरु असते. “बुल” म्हणजे बैल. आणि “बेअर” म्हणजे अस्वल. बैल लढाई करताना समोरच्याला शिंगाने वर उडवून लावण्याचा प्रयत्न करतो तर अस्वल हे समोरच्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करीत असते. यामुळे शेअर बाजारामधील प्रवृत्तींना “बुल्स” आणि “बेअर्स” अशी नावे मिळालेली आहेत.

 

bull vs bear IM

आज 8 मार्च रोजीचा बाजार (निफ्टी) जर बघितला तर आपल्याला या बुल्स आणि बेअर्सचे एक जबरदस्त युद्ध बघायला मिळाले. सकाळी बाजार सुमारे 15755 या पातळीवर उघडला. सध्या बाजारामध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे थोडेसे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गेले काही दिवस आपण या बेअर्सची सरशी झालेली बघत होतो.

आजदेखील दुपारी दीड वाजेपर्यंत हे बेअर्स युद्धामध्ये आघाडीवर होते. परंतु दीडनंतर अचानक बुल्समध्ये एक नविन शक्ती निर्माण झाली आणि सर्व बेअर्सना उधळून लावत शेअर बाजारातले बुल्स बाजार वर वर नेण्यामध्ये यशस्वी झाले. आणि अतिशय अनपेक्षितरित्या शेअर बाजार 16017 या पातळीपर्यंत वर जाऊन बंद झाला.

बुल्स आणि बेअर्सच्या या लढाईमध्ये पैसे मिळवण्याच्या भरपूर संधी दडलेल्या असतात. या संधी ओळखण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचे ज्ञान असणे हे अतिशय आवश्यक आहे. शेअर बाजारामधील सर्व चढ-उतार हे एका चार्टवर रेकॉर्ड होत असतात. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी, की या चार्ट्समधील पॅटर्न्स हे बरेचदा रीपीट झालेले आपल्याला दिसून येतात.

 

share market charts Im

 

या चार्ट्सवर गणितीय अभ्यास करुन काही इंडिकेशन्सदेखील मिळवता येतात. ही इंडिकेशन्स वापरुन आपण बाजारमधील या बुल्स आणि बेअर्सच्या युद्धामध्ये कोणाची सरशी होईल याचा अंदाज लावू शकतो. चार्ट्सचा अभ्यास करणे हे एक शास्त्र आहे. या शास्त्राला “टेक्निकल अ‍ॅनालिसिस” असे नाव आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून हे शास्त्र अस्तित्वात आहे.

टेक्निकल अ‍ॅनालिसिस करण्याच्या विविध पद्धती तसेच शेअर बाजारामध्ये काम कसे करावे याचे सविस्तर प्रशिक्षण मराठी भाषेमधून घेण्याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे.

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणार एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत युट्यूब वेबिनारचे आयोजन केले आहे. हा युट्यूब वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल. पुढील लिंकवर बरोब्बर रात्री 9 वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल.

वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा युट्यूब वेबिनार नक्की अटेंड करा.

युट्यूब वेबिनार बघण्यासाठीची लिंक – https://marathimarket.in/register

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?