यूपीमध्ये भाजपला बहुमत, पंजाबमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या इतर राज्यांचा अंदाज
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत दोनच विषयांची चर्चा होताना दिसून येते ते म्हणजे रशिया युक्रेन या दोन देशातील युद्ध आणि दुसरे म्हणजे भारतातील निवडणुका, गेल्या वर्षभरापासून देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले होते.
पंजाब, उत्तराखंड, गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर या पाच राज्यांचे मतदान नुकतेच पार पडले आहेत. निवडणुकांच्या वेळी कोरोनाचा धोका असताना देखील राजकीय मंडळींनी प्रचार सभा घेतल्याचं, त्यात फोडफोडीचे राजकरण होतेच. सगळ्याच पक्षांनी साम दाम दंड भेद वापरून निवडणुकांसाठी तयारी केली होती.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
ज्या प्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाच्या दिवशी टेन्शन असतेच त्याचप्रमाणे राजकीय मंडळींना देखील टेन्शन असतेच, पक्षाने सोपवलेली जबाबदारी, कार्यकर्त्यांचे अहोरात्र कष्ट, लावलेला पैसे या सगळ्या गोष्टींचे दडपण या मंडळींना असतेच. निवडणूका तर संपल्या आता एक्सिट पोलचे अंदाज पुढे येऊ लागले आहेत. ते नेमके काय सांगतात चला तर मग जाणून घेऊयात –
उत्तर प्रदेश :
भारतातील सर्वात मोठे आणि ज्या राज्यातून एकेकाळी देशाचे राजकारण बदलत असे अशा उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी म्हणजे भाजप सरकार बाजी मारणार असे एक्सिट पोल सांगत आहेत. उत्तर प्रदेशात एकूण तीन टप्प्यांमध्ये निवडणुकांचे मतदान पार पडले.
–
- लव्ह जिहादचा मुद्दा घेत UP निवडणूक, हिंदू-मुस्लिम भेद हाच भाजपचा गेम!
- काँग्रेसच्या ४० % महिला उमेदवारीच्या अजेंड्यावरून दिग्गज नेते पक्ष सोडत आहेत
–
झी न्युज, सिएनएक्स, एबीपी व्होटर, इंडिया टीव्ही या मंडळींनी केलेल्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधीक मत मिळतील, त्यांच्या खालोखाल सपा आणि त्याच्यानंतर बसपा आणि नंतर काँग्रेस. प्रियांका गांधीनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांची जबाबदारी घेऊन देखील काँग्रेस बहुदा मागे पडणार असे दिसत आहे.
मणिपूर :
भारताच्या ईशान्य भागातील एक महत्वाचे राज्य म्हणून मणिपूरकडे बघितले जाते. भाजपने या राज्यामध्ये देखील आपले पाय रोवले असल्याने यंदाही भाजपची सत्ता येणार अशी चिन्ह आहेत. एबीपीसी वोटर यांच्या एक्सिट पोलनुसार भाजपच्या जाग्या जास्त येतील असा अंदाज आहे, तर त्याखालोखाल काँग्रेसच्या जागा येतील.
पंजाब :
गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये राजकीय वातावरण अस्थिर झालेले आपल्याला दिसून आले, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यआ राजीनाम्यापासूनच राजकीय खळबळीला सुरवात झाली. जितकी या प्रदेशात सुबत्ता आहे तितकंच या भूमीला अस्थिरतेचा शाप आहे. भाजप आणि काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करून सुद्धा यावेळी आप बाजी मारणार आहे असे इंडिया न्यूजच्या एक्सिट पोलवरून दिसते आहे. तसेच अकाली दलाला देखील चांगल्या जागा मिळतील असे बोलले जात आहे.
उत्तराखंड :
उत्तराखंड हे राज्य वेगळे झाल्यापासून तिथे आळीपाळीने काँग्रेस आणि भाजपची सत्ता आली आहे, यंदाच्या निवडणुकांमध्ये इंडिया टुडेच्या एक्सिट पोलनुसार भाजपची सत्ता येणार असे दिसून येत आहे. भाजपच्या खालोखाल काँग्रेसच्या जाग येतील तसेच इतर पक्षांच्या वाट्याला १,२ जाग येतील असा अंदाज आहे.
गोवा :
मनोहर परिर्कर आणि गोवा असे समीकरणच बनून गेले होते. मात्र त्यांच्याच मुलाला भाजपने तिकीट नाकारल्याने गोवेकरांमध्ये एक प्रकारचे नाराजीचे वातावरण होते, इंडिया टुडेच्या एक्सिट पोलनुसार काँग्रेसला बहुमत मिळेल अशी शक्यता आहे. तर न्यूज एक्सच्या एक्सिट पोलनुसार भाजपला बहुमत मिळेल.
वरती नमूद केलेले एक्सिट पोल हे वेगवगेळ्या निष्कर्षातून काढलेले गेले असल्याने जेव्हा प्रत्यक्ष निकाल लागले तेव्हाच चित्र स्पष्ट होईल. या पाच राज्यांच्या निवडणूका संपत नाही तोवर तेलंगणा आणि राजस्थानसारख्या राज्यांच्या पुढच्या वर्षी येऊन ठेपल्या आहेत. २०२४ हे प्रत्येक पक्षाचे आज जवळजवळ टार्गेट बनले आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.