Site icon InMarathi

रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच शंभरी पार केलेले पेट्रोल आणखीन महागणार?

war featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

देश कुठलेही असू द्या, प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था एकमेकांमध्ये गुंतलेली आहे. जगात कुठलाही देश नैसर्गिक साधनांच्या बाबतीत परिपूर्ण नाहीये, त्यामुळे प्रत्येक देश एकमेकावर परावलंबी आहे. अशातच जगात कुठल्याही कोपऱ्यात एखादी घटना घडली की, त्याच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव सगळ्याच देशांवर होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

असेच काहीसे सध्या रशिया-यूक्रेन या दोन देशांच्या सीमेवर सुरु आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते, या विचाराने जगातील अनेक देश चिंतीत आहेत. या युद्धामुळे जागतिक चलनवाढीची भीतीही वाढली आहे, सोबतच या युद्धाचा प्रत्यक्ष प्रभाव कच्च्या तेलाच्या किमतींवरही होत आहे.

 

 

मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे आणि या कारणामुळे जगभरातील अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे भविष्याची चिंता करू लागले आहेत.

जागतिक बाजारपेठेत इराणी कच्च्या तेलाच्या संभाव्य पुरवठ्यात विलंब झाल्यामुळे तेलाच्या किमती २००८ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. याचबरोबर रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यामध्ये अजुन भर पडणार आहे.

रविवारी संध्याकाळी ब्रेंट चे क्रूड ऑईल $११.६७ म्हणजेच ९.९ % वाढून $१२९.७८ प्रति बॅरल झाले आहे, तर US West Texas Intermediate (WTI) चे क्रूड $१०.८३ म्हणजेच ९.४ %, $१२६.५१ एवढे वाढले आहे.

 

 

रविवारी ट्रेडिंगच्या काही मिनिटांमध्येच, दोन्ही बेंचमार्कने जुलै २००८ नंतरची सर्वोच्च पातळी $१३९ प्रति बॅरल गाठली आहे. या वाढत्या किमतीचा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थेवर, शेअर बाजार आणि उद्योगधंद्यांवर दिसू लागला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आता आणखीनचं हल्का होणार आहे.

रशिया-युक्रेन संकटामुळे कच्च्या तेलाची कमतरता होऊ नये यासाठी अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या सर्व ३१ सदस्य देशांनी त्यांच्या साठ्यातून ६० दशलक्ष बॅरल तेल काढण्याची सहमती दर्शविली आहे. परंतु असे असूनही कच्च्या तेलाची आजची किंमत १२५ $ च्या वर पोहोचली आहे. परंतु जगभरात एवढी किंमत वाढूनही भारतामध्ये तेलाच्या किंमती मागील ३ महिन्यांपासून स्थिर आहे आणि यामागचे कारण सांगितले जात आहे ते म्हणजे, ५ राज्यांमध्ये सुरु असलेल्या निवडणुका…!

 

तीन महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये तब्बल $२९ ची वाढ झाली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलने सांगितले आहे की, भारत खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलाची किंमत २ मार्च २०२२ रोजी प्रति बॅरल $११० पेक्षा जास्त झाली आहे. ही किंमत ऑगस्ट २०१४ नंतरची सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ८१.५ डॉलर होती. अशा प्रकारे, तीन महिन्यांत क्रूड ऑईलच्या किंमतीमध्ये तब्बल २९ डॉलर ने वाढ झाली आहे. काही दिवसांमध्ये भारतामध्ये पेट्रोल-डीजल च्या किंमतीमध्ये सुमारे १०-१५ रूपयांची वाढ होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

याचबरोबर रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया ३५-४०% टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो. भारत देखील रशियाकडून कच्चे तेल आयात करतो. जर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लावली तर या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील.

 

interaztv.com

 

आधीच पेट्रोलने शंभरी पार केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे त्यात या दोन देशांच्या युद्धामुळे नाहक इतर देशांना  देखील त्रास होत आहे, सरकार वाढत्या इंधन दरावर काही उपाययोजना करेल का हे काही दिवसात कळलेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version