एका स्टार्टअप कंपनीने मॅकडोनाल्डला दिला झटका ; नेमकी काय आहे भानगड
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्याकडे असं म्हणतात की शहाण्याने कधीही कोर्टाची पायरी चढू नये, कारण कोर्ट कचेरी आपल्याकडे खूप किचकट प्रकार आहे, कोर्टाची प्रकरणं अनेक वर्ष चालतात, अन्याय झालेली व्यक्ती न्याय मिळेपर्यंत पार झडून जाते. कोर्टात आज लाखाच्या वर केसेस पेंडिंग आहेत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
–
कोर्टात केवळ खून चोरीच्या केसेस नसतात तर फसवणूक, जमीन खरेदी मधील अफरातफर अशा केसेस देखील मोठ्या प्रमाणावर चालतात. देशातील केसेस तर आहेतच मात्र दोन देशातील वाद असतील तर तो वाद थेट आंतरराष्ट्रीय कोर्टात जातो.
–
- कुणाचं काय तर कुणाचं काय! ब्रँडचं उलटं नाव आकर्षित करतं कोट्यवधींचा रेव्हेन्यू!
- भलत्याच प्रॉडक्टची जाहिरात करण्याचा फंडा: या तंत्रामागील शास्त्र जाणून घ्या…
–
जिथे व्यक्तींमध्ये वाद संपत नाहीत तिथे बलाढ्य अशा कंपन्या देखील एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. गेल्या १०० वर्षांपासून ज्या ब्रँडने अनेकांची पोटं भरली, भारतीयांच्या हातातला वडापाव काढून त्याजागी बर्गर ठेवणारा मॅकडोनाल्ड सारखा ब्रँड एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे, नेमका काय आहे तो वाद चला तर मग जाणून घेऊयात….

Kytch नावाच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने मॅकडोनाल्डस्ला $९०० मिलियनचा फटका सुनावला आहे. ही कंपनी फोनच्या आकाराचे यंत्र बनवते जे मॅकडोनाल्डस्च्या आईसक्रीम यंत्रातले एरर शोधून काढते व दुरुस्तही करते. Kytch कंपनीला असे कळले की मॅकडोनाल्डस इमेल्सचा चुकीचा वापर करून खाजगी माहिती काढत आहे आणि नवीन आईसक्रीम मशिन जे टेलर नावाच्या सुप्रसिद्ध कंपनीचं आहे त्याला प्रमोट करत आहेत. टेलर आणि kytch च्या मशिनची वैशिष्ट्ये सारखीच आहेत.
Kytch कंपनीच्या सह संस्थापक मेलीसा नेल्सन यांच्या मते ‘या इमेल्स मुळे जगभरातील मॅकडोनाल्डस्ची आईसक्रीम मशिन्स बंद पडत गेली. ( ७ पैकी १ US मधील मशीन बंद होते हे McBroken.com मुळे कळले. असं झाल्यामुळे Kytch चे नाव बाजारात खराब झाले.
ग्राहकांच्या मनात त्यांच्यामुळे एक भीती बसली आणि त्यामुळे बिझनेसची वाट लागली. मॅकडोनाल्डसला हे चांगलेच माहीत होते की Kytch चं मशीन चांगलं आहे आणि त्यात काही अडचण नाही आणि म्हणूनच मॅकडोनाल्डसला याची भरपाई करावीच लागेल.’
मॅकडोनाल्डसमध्ये Kytch ची गॅजेट्स असून २०२० मध्ये त्यांचा खप वाढला. मॅकडोनाल्डस्ने इतर कंपन्यांच्या कानावरही माहिती घातली की Kytch चे गॅजेट्स वापरू नका! या कंपन्यांमध्ये Coca-Cola आणि Burger King देखील सामील होते.
McD मुळे Kytch चं काम बंद पडलं आणि म्हणून त्यांना कायद्यानुसार उत्तरं मिळवून त्यांची नुकसान भरपाई करून घ्यायची आहे. “सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं Kytch चे सह संस्थापक ओ’ सुलीवान म्हणाले.
मॅकडोनाल्डसारख्या महाकाय ब्रँडवर असे आरोप झाल्यावर कंपनीने याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की किचने केलेले दावे चुकीचे आहेत. आम्ही याला योग्य उत्तर देऊ.
आज सॉफ्टवेअर क्षेत्रात डेटा चोरी. सॉफ्टवेअर्सची चोरी करणे अशा गोष्टी होत असतात आणि पुन्हा एकदा पेटंटचा मुद्दा समोर येतो. गुगल मॅप या सॉफ्टवेअरवरून देखील जर्मनीमधल्या एका कंपनीच आणि गुगलचा वाद झाला होता आणि हा वाद कोर्टात देखील गेला होता.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.