' फॅशन नव्हे पुण्यकर्म: या तरुणासाठी एक कडक सॅल्युट व्हायलाच हवा – InMarathi

फॅशन नव्हे पुण्यकर्म: या तरुणासाठी एक कडक सॅल्युट व्हायलाच हवा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक सामान्य माणसात असामान्य कृती करण्याचे धाडस असते. जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हा जिद्दीने हे धाडस केले जाते. तुम्हालाही कधीतरी असा अनुभव आला असेल.  मात्र केवळ स्वतःपुरता विचार न करता समाजाचे ऋण फेडण्याचा विचार जे करतात, आणि हा विचार जे कृतीतून आमलात आणतात त्यांचे कौतुक केले जाते.

असेच एक अभिनव धाडस केले आहे पुण्याच्या थेरगाव येथिल राहुल भागवत सरवदे यांनी! राहूल यांनी नेमकं काय केलंय ज्यामुळे आज त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जातीय? जाणून घेऊयात, प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल अशी त्यांची कहाणी.

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आज प्रचंड फोफावताना दिसतो. घराघरात या रोगाची दहशत आहे. या रोगाने एखाद्याला आपल्या विळख्यात घेतले की केवळ तो रुग्णच नव्हे तर संपूर्ण कुटुंब होरपळले जाते.

 

cancer inmarathi 1

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कॅन्सरवर मात करण्याची शक्ती मिळाली असली तरी एकंदरित ही प्रक्रिया अत्यंत अवघड असते. किमो थेरेपी, रेडिएशन यांसारख्या टप्प्यांवर शरीराची हानी होतेच, मानसिक खच्चीकरणाला सामोरे जावे लागते. मात्र या दरम्यान गळणारे केस ही बाब सर्वात जास्त खेदजनक ठरते.

 

Cancer symptoms feature Image

 

औषधांचा परिणाम होत असताना झपाट्याने गळणारे केस पाहिल्यानंतर जगभरात दररोज लाखो डोळे अश्रू ढाळतात. मात्र त्यांचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न राहूल यांनी केला आहे.

थेरगाव येथिल रहिवासी राहूल भागवत सरोदे हे सुरुवातीपासून सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर आहेत. शहरातील नागरी समस्या सोडवतानाच त्यांना कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदनांची जाणीव झाली. या रुग्णांसाठी आपण काहीतरी करायला हवं ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र नेमके काय करावे हेही सुचत नव्हते.

अखेरिस मुंबई येथिल मदत ट्रस्टची माहिती मिळाल्याने त्यांनी जुलै २०१९ मध्ये पहिल्यांदा केसदानाचा निर्णय घेतला. आपल्या केसांमुळे केस गमावलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना थोडातरी दिलासा मिळेल या विचारांनी त्यांनी पहिल्यांदा केसदान केले.

एकदा हे दान केल्यानंतर समाधान मिळाले असले तरी आपली ही कृती अगदीच सुक्ष्म आहे या विचारांनी पुन्हा एकदा केसदान करण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात.

यावेळी देखील टाटा मेमोरिअल या संस्थेशी संलग्न असलेल्या संस्थेशी त्यांनी संपर्क साधला. सर्व नियम जाणून घेतले. नियमानुसार १० ते १२ इंचांपर्यंत केस वाढवणे गरजेचे असते. त्यानुसार अत्यंत मेहनत घेऊन त्यांनी केस वाढवले. या दरम्यान त्यांनी केसांची निगा राखली.

 

rahul im

अखेरीस योग्य प्रमाणात केस वाढल्यानंतर त्यांनी मन घट्ट करत पुन्हा एकदा केसांवरून कात्री फिरवली. जमा केलेले केस त्यांनी संस्थेकडे सुपुर्द केले.

 

hair im

 

या केसांचा वापर करत कॅन्सरग्रस्तांसाठी केसांचे वीग तयार केले जातात.

याबाबत राहूल सांगतात, ” कॅन्सरचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात लढले तरच ही लढाई जिंकता येईल. माझ्याकडून जे शक्य आहे ते मी केले आणि यापुढेही करत राहणार. एकदा कापलेले केस पुन्हा येतील मात्र कापलेल्या केसांचा फायदा अनेक रुग्णांना जगण्याचे नवे बळ देईल. व्यक्ती म्हणून हे माझे कर्तव्य आहे.”

राहूल यांचा हा विचार आणि कृती प्रत्येकालाच विचार करायला लावणारी आहे. समाजाप्रति असलेले आपले कर्तव्य निभावण्याची एखादी संधी जरी मिळाली तरी त्यातून आयुष्यभराचे समाधान गाठीशी बांधले जाऊ शकते.

राहूल यांची ही कृती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या परिचयात असे धाडस करणारा अवलिया आहे का? याची माहिती कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?